फडणवीसांची प्रेयसी : पत्रकार हेमंत जोशी
आपण भारतीय प्रेम करण्याच्या बाबतीत तसे खूप भावुक आहोत, केलेले प्रेम एखादा प्रियकर किंवा प्रेयसी सहजासहजी विसरू शकत नाही. तू नही तो और सही, हे परदेशात चालते, आपल्या देशात नाही कारण आजही अगदी सहजासहजी भारतीय पोरगी एखाद्याच्या सहजासहजी प्रेमात पडत नाही त्यामुळे येथे प्रेमाचे महत्व वेगळे आहे, ग्रामीण भागात तर हा प्रकार अधिक कठीण आहे, तेथे चुकून रस्त्याने जाताना एखादी पोरगी गावातल्या तरुणाकडे बघून साधी हसली तरी आजही गावभर टवाळकी होते. विशेष म्हणजे ग्रामीण कुटुंबे तर इतके संशयी आणि रुढीला चिटकून आहेत कि घरात नव्याने येणाऱ्या वधूला मधुचंद्राच्या राती नवऱ्याकडून तपासून बघितल्या जाते कि माल कोरा आहे किंवा नाही, स्वतः मात्र असे संशयी तरुण शंभर रांडांकडे विवाहापूर्वी जाऊन आलेले असतात…..
प्रेमभंगाचे शल्य, दुःख भारतीय सहजासहजी खरोखरी पचवू शकत नाही, आपली प्रेयसी, आपली पत्नी आपला पती आपला प्रियकर आपल्याला फसवून दुसऱ्याच्या बाहुपाशात अडकलाय, दुसऱ्याच्या कुशीत विसावलाय हे जेव्हा अमुक एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या लक्षात येते, ते दुःख त्यांच्या हृदयाला भोक पडते, स्त्री किंवा पुरुष अतिशय अस्वस्थ होतात, त्यातले कित्येक पुढे नाईलाजाने मानसोपचार तज्ज्ञाकडे जातात, त्यांची अवस्था खरोखरी वेड्यागत होते, पुरुष किंवा स्त्री वेड्यागत होतात. अहो, तुम्ही स्वतः कल्पना करा कि तुमची पत्नी किंवा तुमचा पती, तुमचा प्रियकर किंवा तुमची प्रेयसी आता याक्षणी दुसऱ्या कोणाच्या तरी बाहुपाशात अडकलेले आहेत, झालात ना अस्वस्थ, प्रेम हे असे वेडे असते. प्रेयसीला सोडून जाणारे अनेक लबाड भारतीय आहेत, त्यांना त्या विकृतीतून गम्मत वाटते, पण एक सोडून दुसरीला पटवणाऱ्या तमाम भारतीय पुरुषांनो, हा विकृत आनंद क्षणिक असतो कारण ज्या प्रेयसीला तुम्ही सोडून मोकळे होता, त्यावेळी निघणारे शाप तिच्या हृदयातून असतात, त्या प्रेमभंगाची मोठी किंमत तुम्हाला एक दिवस येथेच मोजावी लागते…
च्यायला, अलीकडे माझे हे असे का होते कळत नाही म्हणजे राजकारण हा माझ्या लिखाणाचा मुख्य विषय, मग माझा व. पु. का झाला किंवा का होतोय हेच माझ्या लक्षात येत नाही, बरे असेही नाही कि माझाही प्रेमभंग झालाय म्हणून मी एखाद्या शुक्ल बाईसारखा प्रेमभंगावर कविता करीत सुटलोय. अरे हो, माझ्या लक्षात आले कि मी याठिकाणी प्रेमभंगावर का लिहितोय ते, येस, त्या राजू शेट्टी यांचा प्रेमभंग झालाय, त्यांची प्रेयसी खट्याळ देवेंद्र फडणवीस यांनी पळविल्यामुळे राजू शेट्टी हे राजू शेट्टी राहिले नसून ते आता धडकन सिनेमातले सुनील शेट्टी झाले आहेत, पेटून उठलेले ते प्रेमवीर आहेत, त्यांची शिल्पा फडणवीसांनी पळवली आहे, शेट्टी आता वेडेपिसे झालेले प्रियकर आहेत, त्यांच्या प्रेमभंगात सीएम देवेंद्र फडणवीस खलनायक ठरले आहेत, हो, हे त्रिवार सत्य आहे, राजू शेट्टी यांची प्रेयसी स्वतःहुन देवेंद्र यांना कचकन डोळा मारून त्यांच्या कुशीत सध्या टेम्पररी विसावल्याचे जरी चित्र असले तरी ती फडणवीस यांच्या आता एवढ्या प्रेमात गुंतली आहे, अडकली आहे कि यापुढे ती पुन्हा राजू शेट्टी यांच्याकडे परत येईल, वाटत नाही, पण जी प्रेयसी शेट्टी यांनीही टाकून द्यावी या अशा लायकीची होती, चतुर सिलेक्टिव्ह फडणवीस अगदी सहज तिच्या प्रेमात का अडकले, कळत नाही, प्रेमात पडून देवेंद्र यांनी मोठी चूक केली असे मी अगदी छातीठोकपणे याठिकाणी जाहीर सांगून मोकळा होतो, शी…अलीकडे ना मुख्यमंत्री झाल्यापासून त्या शक्ती कपूर सारखे देवेंद्र उठसुठ कोणाच्याही प्रेमात पडून मोकळे होतात, अमृता वाहिनी, काळजी करू नका, आम्ही सिनेमातल्या प्रदीपकुमार, अलोकनाथ सारखे अगदी शुष्क चेहऱ्याने, मोठ्या भावासारखे तुमच्या पाठीशी आहोत, परवाच मला भाजपाचे कुलकर्णी म्हणाले, आम्ही आता ठरलोत जुन्या प्रेयसीसारखे, म्हणजे आम्ही बाहेर उभे राहून केव्हा मुख्यमंत्री आत बोलावून जवळ घेतात, बाहेर तिष्ठत वाट पाहत असतांना हिशेबी लाड मात्र दरवाज्यावरच्या पोलिसांकडे लाडे लाडे बघून थेट आत निघून जातात…एक मात्र नक्की, मुख्यमंत्री होण्याआधी देवेंद्र कधीही कोणाच्या प्रेमात अडकले नव्हते, त्यांची आई म्हणाली, अमृता मला पसंत आहे, त्यावेळेचे आज्ञाधारक देवेंद्र अंतरपटासमोर उभे राहून मोकळे झाले आणि हसून बघणारे देवेंद्र आपले झाले नाही म्हणून त्याकाळी चेहऱ्यावर सतत म्हाताऱ्या आजीसारखे भाव ठेवून वावरणारी तरुण वयातही पोक्त दिसणारी एक महिला पत्रकार तेवढी दुख्खी झाली होती, पण देवेंद्र यांचा तो स्वभाव आहे, ते प्रत्येकाशीच हसून बोलतात, आणि बघून हसतात याचा अर्थ यदु जोशी असा घेत असतील कि ते त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत, तर ते साफ चुकीचे ठरावे….
देवदेन्द्रजी, जी प्रेयसी तुमच्याकडे येऊ नये, राजू शेट्टी यांना मनापासून वाटत होते, त्या कामाच्या ना धामाच्या प्रेयसीला तुम्ही विनाकारण पटवून त्या शेट्टी यांचे अगदी उघड शत्रुत्व ओढवून घेतले. शेतकऱ्यांवर अन्याय या उद्वेगातून नव्हे तर प्रेयसीला पळवून नेऊन तुम्ही तिला जो अचानक पट्टराणीचा दर्जा दिला, त्या अस्वस्थतेतून राजू निराश झाले आणि त्यांनी हे आंदोलन पुकारले असे आत्ता याक्षणी तरी मम् भोळ्या मनाला वाटते….आणि तुम्ही पेटवलेली हि प्रेयसी लायकीची कशी नाही, किंवा अलीकडे ज्या ज्या प्रेयसींच्या प्रेमात तुम्ही आकंठ बुडाला आहेत मग ते दरेकरांचे घर असो कि लाडांचे, तुम्ही नेमके कसे चुकलात, त्यावर माझे पुढले लिखाण असेल….
क्रमश: