कोण कसे : भाग ३ : पत्रकार हेमंत जोशी
माझी एक मैत्रीण आहे, तशा मैत्रिणी अनेक आहेत, तुमची नजर आणि नियत साफ असली कि आपोआप मैत्रिणी मिळतात, मैत्रीही टिकून राहते. पण हि खास मैत्रीण आहे, माझी मैत्रीण असल्याने ती सुंदर, सुस्वरूप, बुद्धिमान, स्टायलिश, भाषाप्रभू नक्कीच असेल हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. ती या देशातल्या एका टॉपमोस्ट उद्योग पतीच्या थेट फ्लोअरवर काम करते, ती जेवढे त्या उद्योगपतीला सतत आणि समोरासमोर बघते तेवढे तर आपण घरातल्या मोलकर्णीकडे देखील बघत नाही. ती डोंबिवलीवरून लोकल पकडते, चर्चगेटला उतरते, नुकतीच आषाढी एकादशी आटोपली. नेक्स्ट डे मला ती म्हणाली, एरवी नेहमीच्या बायका मुली तिच्याजवळ बसायला लोकलमध्ये धडपडत असतात पण आषाढी एकादशीच्या संध्येला कोणीही तिच्याजवळ बसायला तयार नव्हते, उलट ज्या बसल्या होत्या, त्यादेखील उठून गेल्या आणि कोपऱ्यात उभ्या राहून गालातल्या गालात हसत होत्या, असे रे का झाले असेल, तिने मला विचारले. मी तिला विचारले, आईने डब्यात काय काय दिले होते, ती म्हणाली, फार काही नाही, उकडलेले शेंगदाणे, साबुदाण्याची खिचडी, वेफर्स, बटाट्याची भाजी, तळलेले साबुदाण्याचे पापड आणि संध्याकाळी परततांना खाण्यासाठीच भगर आणि आमटी, केळीचे वेफर्स, बस, एवढेच. तू हे संपवलेस का, ती म्हणाली हो, निघतांना मिल्क शेक पण पिऊन निघाले. मी म्हणालो,हे पदार्थ खावडल्यानंतर, बायकाच काय पण सडलेले बोकड देखील उठून जाईल.
राजकारणातही तेच, एखाद्या नेत्याने खाण्यापेक्षा वाटण्याचे किंवा जोडण्याचे काम केले तर जवळ आलेली माणसे तुम्ही सत्तेत नसलात तरी टिकून राहतात. अलीकडे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी गप्पा मारण्याच्या ओघात ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदावरून पाय उत्तर झाले आणि त्यांचे जणू सारे अस्तित्व संपले, जेव्हा केव्हा ते सार्वजनिक ठिकाणी दिसतात, काळे कुत्रे देखील त्यांच्या आसपास दिसत नाही, ते समोरून गेलेत तरी आम्ही मान वाळवून पुढे जातो, मी राजकारणात आलो तेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते, आज ते हयात नाहीत, मी कधीही त्यांच्या पक्षात नव्हतो, पण त्यांची अनेकदा हमखास आठवण येते, होते, तेच देवेंद्र फडणवीस यांचेही, ते सत्तेत नव्हते तरी कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या घोळक्यात असायचे आणि उद्या पायउतार झालेत तरी फरक पडणार नाही, त्यांच्या सभोवतालची गर्दी कमी झालेली नसेल. लागोपाठ दोन वेळा मी अपक्ष म्हणून निवडून आलो, पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मंगल पुढला कोणताही विचार न करता, फडणवीसांना थेट गाठून मी म्हणालो, माझा पाठिंबा तुम्हाला, आणि हा पाठिंबा बिनशर्त आहे, कोणत्याही अपेक्षा मला तुमच्याकडून नाहीत, मला तुमच्यातले नेतृत्व भावले आहे, मनापासून आवडले आहे, म्हणून हा पाठिंबा आहे….
फडणवीस मंत्रिमंडळातील कोण कसे हा विषय हाताळतांना झपाटलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक करतांना मनातून आनंद यासाठी कि हा मंत्री त्या वृक्ष लागवडीसाठी किंवा वृक्षारोपण करून ती झाडे जगवण्यासाठी ज्या पद्धतीने कार्यमग्न होतो, आधीच्या स्वरुपसिंग नाईकांसारख्या वनमंत्र्यांना हि सुबुद्धी का झाली नाही याचे आश्चर्य वाटते, उलट आधीच्या बहुतेक वन मंत्र्यांनी ज्या पद्धतीने राज्यातले वृक्ष तोडून खाल्ले, मनात विचार येतो, या अशा नालायक माजी वनमंत्र्यांना अक्षरश: जोड्यांनी भर चौकात हाणले पाहिजे. वृक्षारोपणाचे नाटक तर कोणीही करेल हो, पण लावलेली रोपटे ज्या पद्धतीने हा सुधीरभाऊ त्यांचे छोट्या बाळाच्या आईसारखे संगोपन करतोय, सुधीरभाऊ भलेही तुम्ही शंभर वर्षे जगावे, पण भटजी म्हणून भविष्य सांगतो, तुमची स्वर्गात जागा फिक्स आहे….
एक अत्यंत महत्वाचे सांगतो, सुधीर मुनगंटीवार यांना न विचारता सांगतो, तुमच्यातल्या अनेकांना वृक्षारोपण करावे, वृक्ष जोपासावेत, मनापासून वाटते, तुम्हाला जर वृक्षारोपण करतांना किंवा वृक्षांचे जतन करतांना, कुठलीही अडचण येत असेल किंवा सहकार्य हवे असेल, सुधीरभाऊ यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे, ९८२२२२३१०२ आणि त्यांच्या खाजगी सचिवांचा म्हणजे श्रीमान अरुण दुबे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे, ९८३३८८२४८९. सुधीरभाऊ, हा लेख संपवितांना, ज्या पत्रकाराने आर आर पाटलांसारख्या नेत्याला, सज्जन मंत्र्याला उलटसुलट सांगून लूट लूट लुटले, धनंजय मुंडे नंतर तो अलीकडे वित्तमंत्री म्हणून तुम्हाला चिटकलाय, या भामट्याला त्वरित दूर करा, हाकलून लावा, भामटे पत्रकार तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, त्याची काळजी नको, पण दरोडा टाकणाऱ्यांच्या वृत्तपत्रातला हा महाचोर वार्ताहर जर एका पानावर तुमची मुलाखत छापत असेल आणि पुढल्या पानावर फडणवीसांच्या विरोधात विनाकारण लिहून मोकळा होत असेल तर त्याला हि सुपारी तुम्ही दिली असा त्यातून सरळ सरळ अर्थ निघतो, आणि नेमके तेच अलीकडे घडतेही आहे, फडणवीस आणि तुमच्यात दारी वाढते आहे, सुधीरभाऊ तुम्हाला सतत पाण्यात पाहतात, हा निरोप अमुक एखादे काम मुख्यमंत्री कार्यालयातून करवून घेतांना हा दलाल पत्रकार तुमच्याविषयीही हे असे पसरवतो आहे, हे असे अजिबात घडायला नको, तुम्ही त्याजकडे मुख्यमंत्र्यांविषयी जे बोलता तो ते सारे जसेच्या तसे बाहेर सांगून तो मोकळा होतो, असे अजिबात घडता कामा नये, अशा भडव्या दलाल पत्रकारांच्या ढुंगणावर वेळीच लाथ मारून त्यांना बाहेर घालवावे, भविष्यातले राजकीय वातावरण चांगले राहते, आपला एकनाथ खडसे होत नाही…