वागळे कि दुनिया : पत्रकार हेमंत जोशी
पत्रकार निखिल वागळे हल्ली हल्ली असे मुतखडा झालेल्या रोग्यासारखे का वागताहेत कळत नाही म्हणजे मुतखडा झालेल्या माणसाला जशी थेम्ब थेम्ब लघवीला होते तसे वागळे आपल्या फेसबुकवरून मनातला त्रागा थेम्ब थेम्ब व्यक्त करताहेत, मुतखडा झालेल्याला लघवीला वारंवार जावेसे तर वाटते पण लघवी थेंबे थेंबे तीही थांबून थांबून होते, वागळे यांचेही तेच म्हणजे त्यांना एका वाहिनीवरून काढल्याच्या संदर्भात खूप खूप लिहावेसे वाटत असावे, ते लिहायला बसत देखील असावेत पण लिहिणे होत नाही म्हणून दोन चार वाक्ये खरडून आणि फेस बुक वर टाकून ते मोकळे होताहेत, वास्तविक एकदाचे काय ते त्यांनी मनात साचलेले, टी व्ही ९ वाहिनीवरून का काढले किंवा नेमके काय घडले सर्वांना सांगून मोकळे व्हावे.कारण त्यांच्या वतीने वागळे हेच नेमके कसे योग्य, सांगणारे असे कोणी त्यांच्याकडे आता उरले वाटत नाही, कारण जे त्यांच्या जवळ आले होते ते वागळेंच्या बायकोसहित काळाच्या ओघात दूर गेले, अशा मंडळींना मग ते आबा माळकर असोत कि कपिल पाटील, मीना कर्णिक असोत कि युवराज मोहिते, बंधुराज लोणे असोत एखादी ज्ञानदा, आयुष्यात त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी एखादी तरुणी, हे असे अनेक त्यांना घट्ट चिकटले होते पण निखिल वागळे यांनीच कंडोम फेकून देतो तशा या शिड्या यापुढे उपयोगाच्या नाहीत, मग नवनवीन शिड्याच्या शोधात त्यांनी या आधीच्या बाजूला ढकलून दिल्या. म्हणून सांगतोय, आता तेच त्यांचे राज कपूर किंवा मनोज कुमार, सबकुछ ते एकटेच, म्हणून सांगतोय आता त्यांनीच मनातले नेमके आणि घडलेले जसेच्या तसे सांगून मोकळे व्हावे….
तडजोड तोडपाणी न करता पत्रकारिता करणारे या मुंबईत फारच कमी, वाहिन्यांवर तर असे डॉ. निरगुडकर अगदीच अभावाने, पत्रकारितेतही भाऊ तोरसेकर, गिरीश कुबेर अभावानेच त्यात एक नाव निखिल वागळे हेही पण आपण तेवढे चांगले आणि अख्खे जग केवढे वाईट, अशी मनाची समजूत करून घेतली कि माणसाचा निखिल वागळे होतो, माणूस तसा चांगला पण या अशा वेड लागल्यागत स्वभावातून आयुष्यात पुढे एकटा पडत जातो. मधुकर भावे यांचे हे असेच वागळे यांच्यासारखे झाले म्हणजे ते देखील लोकमत मधून बाहेर पडल्यानंतर चारी धाम यात्रा करून आले, कधी लातुरात विलासराव देशमुखांच्या दैनिकात होते तर कधी रामशेठ ठाकूरांच्या रामप्रहर मध्ये तर कधी नारायण राणे यांच्या प्रहार मध्ये, पण टिकले कुठेच नाही, एकदा का हा माणूस आपले वृत्तपत्र किंवा आपली वाहिनी स्वतःसाठी वापरून घेतो, मालकांच्या लक्षात आले कि हे असे भावे किंवा वागळे यांच्यासारखे होते, दर्डा यांच्या ते कधी कधी लक्षात येत नाही कि ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात कळत नाही पण दर्डांनी जेवढे, काही मंडळींना आपल्या वृत्तपत्रात वापरून घेतले नसेल तेवढे दर्डांचे लोकमत आपल्या प्रचंड फायद्यासाठी मोठ्या खुबीने वापरून घेणारे जोशी कुलकर्णी भावे ह्या तिन्ही ब्राम्हणांचे करावे तेवढे कौतुक कमी. एक उदाहरण सांगतो, मी आणि आमचे बंधुराज यदुजी, आमच्या दोघांचा आमच्याच गावातला देशपांडे आडनावाचा एक मित्र होता, त्याची बायको सुंदर होती, पण हा व्यसनातून कर्जबाजारी झाल्यानंतर त्याला त्याचाच एक वकील मित्र मदतीला धावायचा, या कर्जबाजारी व्यसनी देशपांडेला वाटायचे, या येड्या वकिलाला बघा आपण कसे वापरून घेतो, पण ते तसे नव्हते, पुढे देशपांडे अचानक अकाली मृत्यू पावल्यानंतर त्याच्या पश्चात म्हणा फारतर, त्या वकिलाने देशपांडेच्या बायकोशी लग्न तर केलेच पण बायकोची संपत्ती देखील पदरात पडून घेतली. जेव्हा देशपांडेला वाटायचे आपण या वकील मित्राला वापरून घेतो, तेव्हाही त्याचा तो केवळ एक भ्रम होता, माणसाने पावलोपावली सावध असावे, कोण कोणाला केव्हा वापरून मोकळा होईल, सांगता येत नाही. सभोवताली माणसे फार हरामखोर असतात. दर्डा यांच्या लोकमत वरून हे उदाहरण आठवले कि आजपर्यंत हे लक्षातच आलेले नाही कि हे तिन्ही ब्राम्हण लोकमतला आपल्या फायद्यासाठी वापरून मोकळे झालेत, होताहेत कि दर्डांना वाटते आपण यांना वापरून घेतो, अर्थात बाबूजींच्या पुण्यतिथी ब्यतिरिक्त मधुकर भावे यांना ते लोकमत मधून निवृत्त झाल्यानंतर दर्डा कुटुंबाने कधी फार जवळ केल्याचे दिसले नाही, राजेंद्र दर्डा यांना विधान परिषदेवर जायचे होते तेव्हा त्यांना लोकमत परिवारातलेच मधुकर भावे आड यायला लागले, भावे हे विलासरावांच्या माध्यमातून विधान परिषदेवर येण्यासाठी जेव्हा प्रचंड आटापिटा करीत होते तेव्हाच दर्डांना जवळून ओळखणाऱ्यांच्या ते लक्षात आले होते कि निवृत्ती नंतर दर्डा यांचे ‘ भावेसाहेब’ आमदार होणे तर फार दूर पण लोकमत पासून देखील ते दूर गेलेले असतील. एक मात्र नक्की जोशी, भावे, कुलकर्णी या तिन्ही ब्राम्हणांचे करावे तेवढे कौतुक कमी, कोण कोणाला वापरून घेतो, अजिबात ते कळत नाही…
क्रमश: