राज्यातले अराजक : पत्रकार हेमंत जोशी
आमच्या घरी पुढल्या काही दिवसात एक कार्य ठरले आहे, ते एकदाचे आनंदात पार पडले कि आयुष्याची पत्रकारितेतली जी मी शेवटची इनिंग खेळायला घेणार आहे ती फार हटके असेल, अनेक वादळं त्यातून येतील, निर्माण होतील, पुढले महिने दोन महिने काहीसे मिळमिळीत मांडेल, खपवून घ्या, वाचून मोकळे व्हा. एवढेच सांगतो, जे काय तुम्ही विविध वाहिन्या किंवा वृत्तपत्रातून छापून आलेले बघता वाचता ते मला कित्येक दिवस महिने आधीच सपुरावा माहित असते, ठाऊक असते. ज्यांच्या हातून ते घडत असते त्या त्या अधिकाऱ्याला मंत्र्याला पुढाऱ्याला दलालांना आमदाराला किंवा पत्रकारांनाही अगदी वैयक्तिक भेटून किंवा फोनवर सांगत असतो कि हे असले तुमचे धंदे बंद करा अन्यथातो दिवस फार दूर नाही ज्या दिवशी या अशा काळ्या कमाईतून तुम्ही आणि आणि तुमचे कुटुंब उध्वस्त होणार आहे, होत्याचे नव्हते होणार आहे. पुढल्या काही दिवसात प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यापासून आता अनेक दूर पळतील पण आम्ही बाप बेटे त्यातले नाही कि मित्रावर संकटे ओढवलीत कि त्यांच्यापासून ढुंगणाला पायलावून दूर पळत सुटायचे. प्रशासकीय अधिकारी श्री राधेश्याम मोपलवार हे माझे, मी आणि ते दोघेही एकाचवेळी मुंबईत आल्यापासूनचे मित्र. सारे काही ठाऊक असूनही ना कधी मी त्यांचा गैरफायदा किंवा फायदा घेतला ना त्यांनी कधी माझा, अर्थात ते उची हस्ती आहेत त्यामुळे आम्हापामरांची त्यांना ती काय गरज भासेल…
पण सुरुवातीपासून त्यांना आग्रहाने हेच सांगत आलो, पचेल तेवढेच मिळवा, अपचन होईल त्रास होईल असे काहीही करू नका, पण त्यांनी ते ऐकले नाही, काही सांगायला गेलो कि त्यांना राग यायचा, मग काय, भेटायचे, गप्पा मारायच्या, निघून यायचे. पण नको ते का घडले, चौकशांचा ससेमिरा का सुरु झाला, मी म्हणालो तेच घडले, त्यांच्या घरातल्यांनीच त्यांना रस्त्यावर आणले, त्यांच्या घटस्फोटित पत्नीने म्हणजे श्रीमती मनीषा मोपलवार यांनीच त्यांना अडचणीत आणले आहे. आपल्या लायकीपेक्षा कितीतरी अधिक सुख ज्या राधेश्याम यांनी पायाशी आणून सोडले, त्या नवऱ्याशी ज्या खालच्या पातळीवर उतरून मनीषा यांनी मोपालवारांना त्रास देणे सुरु केले आणि सुरु ठेवले, ते योग्य नाही, योग्य नव्हते असे मला वैयक्तिकरित्या वाटते. जमले नाही म्हणून तुम्ही वेगळे झालात ना, वेगळे होतानाही, तुम्हाला अगदी घरबसल्या नवऱ्याने सारी तुमची तजवीज करून सोडले मग असे असतांना पुन्हा आगीत तेल ओतण्याचे काम मनीषा यांनी करायला नको होते…
अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात मला एकट्याला तुरुंगात जावे लागले आणि माझ्याएवढेच दोषी असलेले भुजबळ काका पुतणे आणि मोपलवार दोघेही बाहेर राहिले, हे शल्य आमदार अनिल गोटे यांना कायम बोचत आले होते, बोचत आले आहे, त्यामुळे संधी आणि पुरावे मिळतील त्या प्रत्येक ठिकाणी अनिल गोटे यांनी भुजबळ काका पुतण्या आणि मोपलवार यांना सोडले नाही, हिंदी सिनेमातल्या एखाद्या हिरोसारखे गोटे या तिघांशी सतत लढत आलेले आहेत, भुजबळ काका पुतणे शेवटी आत गेले, मोपलवार मात्र गोटे यांना पुरून उरात होते पण आता मात्र आमच्यासारख्या मित्रांना भीती वाटायला लागली आहे कि मोपलवार यांचाही भुजबळ होतो कि काय, कारण गोटे यांच्या मदतीला गेल्या चार पाच वर्षांपासून मोपलवार यांच्या घटस्फोटित पत्नी मनीषा पोटच्या मुलीसहित उतरल्याने प्रकरण गंभीर होत गेले, उद्या किरण कुरुंदकर यांच्यासारखे त्यांचे फंटर जर ढुंगणाला पाय लावून मोपालवारांपासून दूर पळालेत तर एकाकी पडलेले मोपलवार अधिक कठीण प्रसंगातून जातील, पण आज तरी हेच वाटते धाडसी मोपलवार साऱ्यांना नक्कीपुन्हा एकदा पुरून उरतील…
आज तरी हेच सांगतो, मोपालवारांच्या घरातल्यांनी आणि त्यांच्या एकेकाळच्या मित्राने म्हणजे अनिल गोटे यांनी जणू खुन्नस काढली आहे, हा धमाल माणूस, हे बिनधास्त व्यक्तिमत्व, अतिशय अघळ पघळ बोलणारा हा कलंदर आज नक्कीच मोठ्या काळजीत पडला आहे, पुढले काही दिवस त्यांना कठीण अशा परीक्षांना त्यांच्यासाठी तोंड द्यावे लागणारे ठरणार आहेत पण माझे वाक्य लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची त्यांना अगदी तरुण वयापासून सवय आहे, प्रसंग मग तो कितीही कठीण असो, सुरुवातीच्या आयुष्यात त्यांनी पत्रकारिता केलेली असल्याने, तावून सुलाखून प्रत्येकवेळी सहीसलामत बाहेर पडणे त्यांना फारसे कठीण नाही, कठीण नसते…
मोपालवारांचे बाहेर आले, पण असे सारेच अनेक आहेत, ज्यांच्या घरातले वातावरण गढूळ आहे. शहा आडनावाचे एक गृहस्थ माझे मित्र आहेत, पूर्वी ते सामान्य होते, फक्त खाऊन पिऊन सुखी होते, नंतर ते विविध व्यवसायात उतरले, बांधकाम क्षेत्रातही आले, मग मारुती ८०० जाऊन त्यांच्याकडे थेट मर्सिडीज आली म्हणजे पैसे आले पण घरातला आनंद निघून गेला आणि जे घडायचे जे घडते तेच घडले, एकुलता एक मुलगा त्यांच्यापेक्षा अधिक शिकला असल्याने स्वतःला न्यायधीश समजू लागला, सारी अक्कल फक्त मला, हे त्यांच्याही घरात घडले, मुलगा बापाला सेक्स कसा करतात जणू शिकवू लागला, जन्मदात्या आईला पायाशी ठेवून तिला अद्वातद्वा बोलू लागलाय, हे का घडले, कारण शाह यांनी नको तेवढे पैसे मुलांना दाखविले, त्यातूनच घरातले वातावरण बिघडले. आज पैसे आहेत पण घरी गेल्यानंतर वातावरण आनंदी नाही, हे त्या साऱ्यांच्याच घरी घडते आहे ज्यांच्या घरी त्या परमेश्वर किंवा झेंडे सारखे न मोजता येणारे पैसे आले आहेत. चौकशा करणारे आपलेच त्यामुळे अनेक झेंडे चौकशांच्या ससेमिऱ्यातून अलगद बाहेर पडतात पण परमेश्वराची काठी आम्हा सर्वांना अशी बसते कि मग उठून बसने फार दूर, अशी माणसे नेहमीसाठी आयुष्यतून उठतात, कायमस्वरूपी. त्या सहकार खात्यातल्या विकास रसाळ चे देखील तेच झाले, त्याच्या बॅगेत विमानतळावर ५० लाख नव्हेत तब्बल ६५ लाख रुपये सापडलेत. आणि विविध ठिकाणी त्याने कशा गुंतवणुकी केल्यात, तेही आयकर खात्याला सांगून टाकले त्यात पार्ल्यातल्या एका पारेख आडनावाच्या ज्वेलर्सचा देखील संबंध आहे, या पारेख कडे रसाळ याने कसे तब्बल सहा कोटी रुपये जमा केले आहेत, ते ऐकून आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांचेही मस्तक चक्रावून गेले, पण पैसा काम करता है, रसाळ देखील या अशा चौकशांमधून नक्की सहीसलामत बाहेर पडेल, अशी माझी आजची माहिती आहे. त्याच्या बाबतीत जे जसे पुढे पुढे घडेल, नक्की तुम्हाला सांगून मोकळा होईल…
पत्रकार हेमंत जोशी