चव्हाण आणि मुसलमान : पत्रकार हेमंत जोशी
पादण्याचा घाण वास किंवा एखाद्या उदबत्तीचा सुवास क्षणभर जाणवतो, नंतर जैसे थे, वातावरण असते. केवळ एक नांदेड महापालिका जिंकली म्हणून राज्यातल्या काँग्रेसने विशेषतः पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी हुरळून जाण्याचे अजिबात कारण नाही आणि भाजपा नेत्यांनी अस्वस्थ विचलित होण्याचेही कारण नाही पण भाजपा नेत्यांना नक्कीच विचार करायला लावणारी हि निवडणूक आहे. विशेष म्हणजे या देशातले मुसलमान तसेही एखाद्याचे होत नाहीत त्यामुळे ते धर्माच्या नावावर काढलेल्या धर्मांध मुस्लिम पक्षांचे आणि त्यांच्या जहाल नेत्यांचीही झाले नाहीत पण मुस्लिमांनी यावेळी नांदेड महापालिकेत घेतलेला निर्णय नक्कीच शहाणपणाचा म्हणावा लागेल, देशातल्या मुसलमानांची भूमिका मशिदीत ठरत असते, म्हणजे नांदेड मध्ये घेतलेली त्यांनी काँग्रेस ला मतदान करण्याची घेतलेली भूमिका हि केवळ नांदेड च्या महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित नाही किंवा नव्हती तर राज्य आणि देशपातळीवर त्यांनी त्यांची हि घेतलेली भूमिका आहे अशी माझी पक्की माहिती आहे. भाजपाला यापुढे कायमस्वरूपी मुसलमानांचा विरोध असेल आणि हा विरोध रिझल्ट ओरिएण्टेड ठरण्यासाठी भाजपा बिरूद्ध प्रबळ ठरू शकतो अशा काँग्रेस पक्षाला मतदान करणे हेच या देशातल्या मुसलमानांचे पुढील काही वर्षे धोरण असेल, तीच त्यांची भूमिका असेल कारण प्रादेशिक किंवा जात्यंध मुस्लिम संघटनांना किंवा राजकीय पक्षांना मदत मतदान करून आपले भले साधल्या जाणार नाही हे त्यांच्यातल्या चाणाक्षांनी ओळखल्यानंतर अख्य्या मुस्लिम कोमने घेतलेला हा निर्णय आहे थोडक्यात पूर्वी म्हणजे राजीव गांधी होते तोपर्यंत जशी मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळायची, यापुढे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे, आणि हेच भाजपाचे मोठे अपयश आहे, त्यांना या देशातल्या मुसलमानांची मते आणि सहानुभूती मिळविणे शक्य झालेले नाही अर्थात भाजपा नेत्यांनी त्यावर वाईट वाटून घेण्याचेही कारण नाही, देशातला राज्यातला मुस्लिमांचा वाढता प्रभाव आणि चढता त्रास याशी कंटाळून सारे हिंदू मोठ्या प्रमाणावर एकत्र आले आणि त्यांनी देशात, विशेषतः या राज्यात कडव्या हिंदुत्ववादी शिवसेनेला आणि भाजपाला गादीवर बसविले. दुर्दैव हेच कि एकवटलेले हिंदू आणि मराठी युतीपासून झपाट्याने दूर जाताहेत, हे चित्र अतिशय गंभीर आहे…
विशेषतः ज्या हिंदूंनी मराठींनी सेना भाजपाला येथे या राज्यात सत्ता दिली, हि सत्ता म्हणजे माकडांच्या हाती कोलीत दिले, पुन्हा एकदा मागचेच यांनीही पुढे नेण्याचे काम केले किंवा करताहेत हे जे आज सेना भाजपा युतीच्या मंत्र्यांकडून चित्र किंवा कार्य बघायला मिळते आहे, त्यामुळे नक्कीच हळूहळू राजकीय वातावरणात बदल घडतोय, पूर्वीचेच बरे होते, हे लोण धीरेधीरे पसरू लागलेले आहे, जे चित्र नक्कीच नजीकच्या भविष्यात सेना आणि भाजपाला त्रासदायक ठरणार आहे, ठरू शकते.तातडीने आत्मचिंतन करणे सेना आणि भाजपाच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना अत्यंत अत्यंत गरजेचे आहे, आवश्यक आहे. विशेषतः राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी या राज्यात रस्त्यावर हागुन ठेवलेहोते त्याच पद्धतीने सेनाभाजपाच्या बहुतेक मंत्र्यांनी हागुन ठेवायला सुरुवात केली तर तेच, मी जे वर सांगितलेय म्हणजे पूर्वीचेच बरे होते,मतदार म्हणतील आणि नांदेड ची पुनरावृत्ती या राज्यात सर्वत्र होण्यास फारसा वेळ लागणार नाही. थोडक्यात जे बबनराव पाचपुते किंवा विजयकुमार गावित यांनी त्यांच्या खात्यात दर दिवशी घाण पाद मारून घाणेरडे हागुन ठेवले त्याच पद्धतीने विष्णू सावरा यांचेही घाण हागुन ठेवणे आणि घाण पाद मारणे सुरु आहे, तेच धोकादायक नक्की ठरणारे आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी सर्वात मोठी केलेली चूक म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी आघाडीच्या मंत्र्यांशी इमान राखून त्यांना अमाप कमाई करून दिली आणि आपणही नवश्रीमंत झाले तेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा त्याच मोक्याच्या पदावर फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खुबीने बेवकूफ बनवून यांच्या सभोवताली जमा झालेले आहेत, विशेष म्हणजे या तमाम दलालांची अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची लॉयल्टी अजिबात फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी नाही त्यांची शंभर टक्के लॉयल्टी फक्त आणि फक्त आघाडीच्या नेत्यांशी असल्याने युतीचे कोणतेही रहस्य पुढल्या पाच मिनिटात शरद पवार किंवा अजित पवारांकडे पोहोचलेले असते, भयंकर प्रकार म्हणजे हे सारे आघाडीच्या काळात या राज्याला लूट लूट लुटत होते आणि आजही तेच पुढे सुरु आहे, दुर्दैवाने युतीला हा भ्रष्टाचार अजिबात रोखता आलेला नाही, युतीचे सारेच मंत्री आणि मुख्यमंत्रीही पार उल्लू बनलेले आहेत. आहे का हिम्मत आजही या झारीतल्या शुक्राचार्यांनी दूर करण्याची युती सरकारमध्ये, माझ्याजवळ त्या तमाम मंडळींची यादी तयार आहे, हाकला या अशा बदमाशांना दूर आणि लावा त्यांच्या पाठी चौकशीचे लोढणे…
अशोक चव्हाण हे काय लायकीचे नेते आहेत, हे या भ्रष्ट आणि लफडेबाज नेत्याचे यश नाही किंवा ज्या केवळ नांदेड शहरात त्यांचे काम आहे ती महापालिका जिंकणे म्हणजे अशोक चव्हाण इज ग्रेट म्हणणे म्हणजे एखाद्यावेळी महागडा मेकअप करून छान दिसलेल्या तरुणीला मधुबाला म्हणण्यासारखे. नशीब बलवत्तर भ्रष्ट अशोक चव्हाणांचे, त्यांनी नांदेड महापालिका निवडणूक जिंकली अन्यथा पुढल्या काही दिवसात त्यांच्याही ढुंगणाखाली फटाके लागणार होते, त्यांचे अध्यक्षपद हिसकावून घेणे हि काळ्या दगडावरची रेघ होती, पक्षश्रेष्ठी पर्याय शोधायला लागले होते, या विजयामुळे चव्हाणांची प्रदेशाध्यक्षवरून हकालपट्टी तूर्त टाळली असे फारतर म्हणता येईल. एक मात्र नक्की नांदेड मध्ये समस्त मुसलमान एकवटले वरून सेना भाजपा युतीच्या कारभारावर मोठ्या प्रमाणावर नाराज झालेले हिंदू देखील येथे काँग्रेसकडे झुकले आणि सेना भाजपाने नांदेड मध्ये स्वतःला अपमानित करून घेतले…
रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडणे तेवढे बाकी आहे, एवढे टोकाचे मतभेद सेना भाजपा नेत्यांमध्ये आहेत, सामान्य कार्यकर्त्यांना हि युती अगदी मनापासून आवडते पण वाट्यावरून आपापसात भांडणारे सेना भाजपा नेते, त्यांचे हे टोकाचे मतभेद देखील जसे नांदेड मध्ये वाटोळे होण्यास कारणीभूत ठरले आहे हे असेच पुढे सुरु ठेवले तर राज्याचेही नांदेड होण्यास वेळ लागणार
नाही, वाट्टोळे होईल…
एक चुटका सांगतो. एका उमेदवाराला कुठल्याशा निवडणुकीत फक्त तीन मते पडतात. निकाल बघून तो शासनाकडे झेड प्लस सुरक्षेची मागणी करतो.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्याला विचारतात, तुम्हाला फक्त तीन मते मिळाली आहेत, तुम्हाला झेड प्लस सुरक्षेची आवश्यकता का…? उमेदवार त्यावर म्हणतो, विचार करा साहेब, ज्या शहरात माझ्या विरोधात एवढे लोक असतील तेथे मला सुरक्षेची आवश्यकता आहेच…अशोक चव्हाण यांचे या नांदेड महापालिका निवडणुकीतील मिळालेल्या यशाने चुटक्यातल्या उमेदवारासारखे झाले आहे, मी केवढा मोठा, त्यांना वाटू लागले आहे, हे महाशय स्वतःला विनाकारण या राज्यातले आदर्श समजू लागले आहेत….
पत्रकार हेमंत जोशी