धक्कादायक धोकादायक : पत्रकार हेमंत जोशी

धक्कादायक धोकादायक : पत्रकार हेमंत जोशी 

मला कायम वाटत आले आहे कि चला हवा येऊ द्या कार्यक्रमातल्या नेहमीच्या कलावंतांनी कार्यक्रमातून बाहेर पडावे अन्यथा अभिनयात तोच तो पांचटपणा,पुढे भविष्यात या कलावंतांना अन्यत्र कोणी कामच देणार नाही. मला हेही वाटत आलेले आहे कि पत्रकार यदु जोशी यांनी दैनिक लोकमत मधून आणि पत्रकार उदय तानपाठक यांनी दैनिक पुढारी मधून बाहेर पडावे ते दोघेही आणखी मोठे होतील. ते तेथून बाहेर पडले कि त्यांनी माझे म्हणणे सांगणे ऐकले असा त्यातून तुम्ही अर्थ काढून मोकळे व्हावे. जसे मला नेहमी नेहमी हेच वाटायचे कि राज ठाकरे यांनी घराबाहेर पडावे महाराष्ट्रात फिरावे सामान्यांना भेटावे त्यांना भेटून आपल्या मनातले त्यांना सांगावे आणि त्यांचेही ऐकून घ्यावे. ते घडले, सध्याच्या घटकेला राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या रांगेत अलगद येऊन बसले आहेत याच रांगेत एक दिवस दिवंगत आप्पासाहेब पवारांचे नातू रोहित येऊन बसल्यास फारसे आश्चर्य वाटून घेऊ नये. पवारांच्या घराण्यात शरद पवार यांच्यानंतर नेतृत्व म्हणून क्रमवारी अशीअसेल, रोहित पवार, सुप्रिया पवार शेवटी अजित पवार…


मुंबईत मसाज पार्लर मध्ये जाऊन हॅपी एंडिंग करवुन घेणाऱ्या शौकीन पुरुषांची संख्या फार मोठी आहे. पार्लर मध्ये मसाज करणारी त्यांची नेहमीची चिनी नाकाची ठरलेली असते पण समजा अधून मधून ती मणिपूर दार्जिलिंग भूतान थायलंड इत्यादी ज्या भागातून ती आलेली आहे, काही दिवसांसाठी निघून गेली कि या शौकीन पुरुषांचे फारसे अडत नाही त्यांनी दुसरा पर्याय आधीच निवडून ठेवलेला असतो. यावेळच्या विधान सभा निवडणुकीत देखील नेमके हेच घडणार आहे. शिवसेना किंवा भाजपमधून निवडून येऊ शकणार्या अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळेलच याची खात्री नाही म्हणून या अशा सावध मंडळींनी आधीच मनसे हा पर्याय निवडून ठेवलेला आहे. सेना भाजपा मधून अनेक बाहेर पडले आणि मनसे च्या रांगेत उभे राहिले हे दृश्य तुम्हाला विधानसभा निवडणुकी दरम्यान या राज्यात मोठ्या प्रमाणावर दिसेल हे आजच माझे वाक्य तुमच्या डायरीत नोंदवून ठेवा…


शिवाय शरद पवारांची ती नेहमीची स्टाईल आहेच म्हणजे ते आपली अनेक माणसे दुसरी कडून उभे करण्यात तरबेज आहेत ज्याला आम्ही पवारांची सरोगसी स्टाईल असे नेहमीच गमतीने म्हणतो. थोडक्यात पवारांचे समर्थक यावेळी मनसे मधून निवडणूक लढवतील. या सार्या प्रकाराचा फायदा राज ठाकरे आणि मनसेला नक्की होईल, पुढल्या विधान सभेत त्यांच्या आमदारांचे संख्याबळ नजरेत भरणारे असेल, ठरेल. मनसे आणि राज ठाकरे दोघांना चांगले दिवस आले म्हणून शिवसेना आणि उद्धव ठाकरे मागे पडले असे बोंबलायला काही मंडळी तयार होतील पण त्यालाही फारसा अर्थ नाही. मनसे हे तर किरकोळ राजकीय संकट सेना व उद्धव ठाकरेंवर आहे पण जेव्हा केव्हा फार मोठ्या नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, भास्कर जाधव, गुलाबराव गावंडे, इत्यादी प्रभावी नेते मोठ्या प्रमाणावर नेते सेनेतून बाहेर पडले तेव्हा देखील असे काही घडले नाही उलट शिवसेना होती त्यापेक्षा दुप्पट वेगाने मान वर करून वर आली पुढे गेली हे असे शिवसेनेच्याबाबतीत अनेकदा घडलेले आहे आणि पुढेही घडणार आहे त्यामुळे शिवसेना आता संपली पुढले दिवस राज ठाकरे यांचे असाही बिनडोक बिचार डोक्यात घालून नेते मंडळींनी स्वतःचा शिशिर शिंदे करवून घेऊ नये. राज्यातली काँग्रेस आणि शिवसेना नक्की सहजासहजी संपणारी नाही…


अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसे मध्ये सध्या जर काही वेगाने घडणारे असेल तर ते आहे फडणवीस मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी केलेल्या भानगडींची जंत्री यादी पुराव्यांसहित जमा करणे. अगदी अलीकडे राष्ट्र्वादीतल्या एका ज्येष्ठ नेत्याने मला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना हाताशी धरून त्यांचा थेट धृतराष्ट्र करून त्यांच्या भूषण नावाच्या मुलाने व गिरीश पवार नावाच्या साथीदाराने उद्योग खात्यात जे विविध उद्योग करून ठेवले आहेत ते जे कारनामे वाचून दाखविले, ते वाचून मी जागच्या जागी अक्षरश: थबकलो. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्यांना आपण लाडाने ‘ अण्णासाहेब ‘ म्हणावे अशा कितीतरी अधिकाऱ्यांनीच राष्ट्रवादीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडेही सुभाष देसाई आणि कंपूचे कारनामे सोपविलेले असल्याने त्यात काहीही खोटे नाही याची मनोमन खात्री पटली. विशेष म्हणजे गिरीश पवार यांची उद्योग खात्यात असलेली दहशत डोक्याला झिणझिण्या आणणारी आहे. गिरीश पवार यांचे अतिशय बारकाईने टिपलेले किस्से मला वाटते, पुढल्या काही दिवसात निदान मिलिंद नार्वेकर यांच्या तरी कानावर घालावेत, सारखे वाटायला लागले आहे अन्यथा उद्धव यांचीच विधानसभा निवडणुकीत मोठी बदनामी होऊ शकते, जे योग्य नाही…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Comments 2

  1. Avatar Baban Harne says:

    गिरीश नारायण पवार,लटके ,अविनाश अशी सर्व लिंक ही भूषण देसाई यांच्या सोबत काम करते ,ते अधिकारी आणि मंत्रीपुत्राची सर्व प्रकारची सोय करून ब्लॅकमेल करतात आणि मग बोगस कंपनी आणि अर्ज करून midc चे plot घेऊन ते 100पट अधिक दराने उद्योजकना देतात ..5-6वर्ष पूर्वी हलाखीची परिस्थिती असलेला GNP शेकडो कंपनी करून आणि बोगस कामे करून अब्जाधीश बनला आहे ,परदेशात अधिकारी आणि मंत्रिपुत्रासाठी हॉटेल बुक असतात त्याचे ,अधिक सर्व प्रॉपर्टी डिटेल्स आणि बोगस कारनामे आणि त्याच्या कंपन्यांचे पेपर काढायचे काम चालू आहे ….!

  2. Avatar Baban Harne says:

    महाड ,रोहा, नानार आणि आता नव्याने शहापुर तालुक्यात होत असलेल्या खर्डी येथील MIDC मध्ये जमिनी खरेदी करणारे बहुतेक शेतकरी हे एकच असून हे सर्व दलाल GNP साठी काम करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *