स्मार्ट स्टाईलिश फ्रेश गिरीश : पत्रकार हेमंत जोशी

स्मार्ट स्टाईलिश फ्रेश गिरीश : पत्रकार हेमंत जोशी 

तुम्हाला सांगू कि नको सांगू कि नको याचा विचार करत होतो, एकदाचे ठरवले कि सांगूनच टाकावे. अलीकडे बांद्र्यातील एमटीएनएल इमारतीला आग लागल्यानंतर जो रोबो वापरण्यात आला त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी यासाठी करावी कि एकतर तो रोबो चायना बनावटीचा आहे आणि वास्तवात त्याची किंमत केवळ आठ लाख रुपये असतांना तब्बल एक कोटी रुपये देऊन मुंबई महापालिकेने तो विकत घेतला आहे. केवढी मोठी हि जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही का, ज्या कारणांनी आघाडी जनतेच्या मनातून उतरली ते तसे युतीचे होऊ नये असे जर त्यांच्या नेत्यांना वाटत असेल तर जरा लाज शरम ठेवून त्यांनीही पैसे खावेत. आता मुख्य विषयाला हात घालतो….


मंत्री म्हणून या पाच वर्षात गिरीश महाजन यांना कितींनी बघितले हा प्रश्न तुम्हाला विचारायचा अवकाश जळगाव धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकाचा हात क्षणार्धात वर जाईल आणि राज्यातले इतरही हात दुखेपर्यंत ताणून वर धरतील, हो, आम्ही बघितलंय, एकाचवेळी या राज्यातले करोडो आवाज एकसाथ म्हणतील, पायाला भिंगरी लागल्यागत ते या राज्यात फिरले आणि धुळे जळगाव जिल्ह्यात तर सतत वावरले, मुख्यमंत्र्यांचे एक बरे आहे त्यांना अमुक एखादा मंत्री सामाजिक हित समोर ठेऊन काम करत असेल तर ते त्याला मागे न खेचता उलट प्रोत्साहित करून मोकळे होतात पण अमुक एखादा मंत्री गडबड घोटाळे करणारा असेल तर ते एकतर त्याला थेट घरचा रस्ता दाखवतात किंवा मंत्रिपद कायम ठेवले तरी त्याचे पंख छाटून ठेवतात…


मला आठवते, पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदी करतांना घोटाळे करून ठेवले, पुढे काय घडले कदाचित तुम्हाला माहित नसेल पण मुख्यमंत्र्यांनी थेट खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे होतात म्हणून थेट खरेदी प्रक्रियाच त्यानंतर बंद केली. सतीश मुंडे यांच्यासारख्या दलालांचे त्यामुळे बऱ्यापैकी बारा वाजले. ज्यांचा हेतू प्रामाणिक आहे त्यांना पुढे जातोय म्हणून मागे खेचणे फडणवीसांना माहित नाही, त्यावर तुम्हाला चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, संजय कुटे इत्यादी मंत्री छातीठोकपणे भर चौकात माईक हाती घेऊन सांगतील, तोंडभरून फडणवीसांचे कौतुक करतील. महाजनांवर यावेळी एक मंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून मोठी जबाबदारी होती. पण एक बरे आहे त्यांना नियमित व्यायाम करण्याची, आपण तरुण असावे तरुण दिसावे, त्यात आवड असल्याने ते स्वतःला मस्त मेंटेन करून आहेत. फारसा ताण न घेता पडलेली जबाबदारी आनंदाने पार पडायची, त्यात यश मिळवायचे हे गिरीशजींचे स्वभाववैशिट्य, मी कित्येक वर्षांपासून अगदी जवळून बघत आलोय, त्यामुळे ते २४ तास फ्रेश असतात,त्यांना फ्रेश असण्याचा आणि तरुण दिसण्याचा, होणार मोठा फायदा, नको त्यावर येथे काही बोलूया, उगाच तुम्ही जेलस व्हाल…


चंद्रकांत पाटलांचे स्वतःकडे कधीही फारसे लक्ष नसते. हाती येतील ते कपडे घालून व पायात चप्पल घालून ते बाहेर पडतात. उद्या वेळेवर शर्ट पॅन्ट सापडली नाही तर ते आहे त्या कपड्यांवर बाहेर पडतील पण महाजनांचे तसे नाही. एकदम स्टाईलिश मंत्री. त्यांना पाठमोरे बघा, कोलॅजेतल्या मुली तर त्यांच्या वर्गातला एखादा हँडसम समजून भराभर पावले टाकून त्यांना गाठतील आणि स्माईल देऊन मोकळ्या होतील. आपण तरुण असावे आणि तरुण दिसावे याकडे महाजनांचे लक्ष असते त्यातून ते नियमित व्यायाम करतात आणि मिसेस महाजनांना अस्वस्थ करून सोडतात. नवरा पत्नीपेक्षा लहान दिसतो अशा कमेंट्स आल्या कि घरी केवढी बोलणी खावी लागतात, मी जातो आहे कि त्या संकटातून. महाजांनी होणार त्रास, रामेश्वर कडून नेमकी माहिती घेतो. फडणवीसांना जॅकेट छान दिसते हे जे त्यांच्या मनात कोणीतरी भरून ठेवले आहे त्या व्यक्तीला मी शोधतोय, भांडण्यासाठी. छान छान सूट्स घालायचे सोडून एकाचवेळी अनेक डझन विकत घेतलेले जॅकेट्स घालण्यात त्यांना आनंद होतो, आम्हाला वाईट वाटते. कधीकाळी हे महाशय मॉडेलिंग करायचे, त्यांनी सुटाबुटातच वावरावे….


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *