कुलकर्णी अतुलनीय : पत्रकार हेमंत जोशी

कुलकर्णी अतुलनीय : पत्रकार हेमंत जोशी 

दिनांक ७ मे २०१८, निमित्त होते पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे, आणि हेच औचित्य साधून अतुल यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात त्यांच्या ‘ बिन चेहऱ्याची माणसं ‘ या पुस्तकाचा दिमाखदार सोहळा घडवून आणला. माझे अतुलविषयी पुराव्यांसहित अनेक विचारभेद आणि मतभेद आहेत पण अमुक एखादी व्यक्ती तुम्हाला आठवण ठेवून बोलावते, आपण सारे मतभेद बाजूला ठेवून मोठ्या मनाने कौतुक बघायला त्या त्या व्यक्तींच्या आनंद सोहळ्यात सहभागी व्हायला जायचे असते. अर्थात हे असे संस्कार एकाच घरात आढळतात, असेही नाही, हाताची पाचही बोटे सारखी नसतात हेच नेमके सत्य आहे. अतुल कुलकर्णी यांनी ज्या पद्धतीने सदर समारंभ घडवून आणला त्यासाठी कौतुक करायला निदान माझ्याकडे तरी शब्द नाहीत एवढेच म्हणतो, त्यांना ढोपरापासून सलाम….


१९९५ च्या दरम्यान त्यावेळेचे बांधकाम मंत्री श्रीमान नितीन गडकरी यांना जेव्हा मुंबई पुणे चौपदरी रस्त्याचे काम सुरु करायचे होते, त्यादरम्यान अनेक परवानग्या दिल्लीतून घेतल्या जायच्या आणि हे काम त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोन्ही सचिवांनी म्हणजे तांबे आणि देशपांडे यांनी हि जबाबदारी लक्ष्मीकांत देशपांडे नामें उपअभियंत्यावर टाकलेली होती आणि दोन्ही सचिवांनी देशपांडे यांना सांगून ठेवले होते कि दिल्ली दरबारी आपले काम सन्मानपूर्वक व्हावे त्यासाठी तुम्ही स्वतःची ओळख मुख्यअभियंता अशी करवून दिली तरी चालेल, देशपांडे यांनीही दिल्लीत वेळोवेळी तेच सांगितले आणि परवानग्या मिळवून ते मोकळे झाले…लोकमतच्या दर्डा बंधुंवरून मला हा किस्सा आठवला. म्हणजे आपले वृत्तपत्र यशस्वी चालविण्यासाठी ते त्यांच्याकडं काम करणाऱ्यांना वाट्टेल ती उपाधी देऊन मोकळे होतील किंवा होतात म्हणजे पद मग ते संपादक असो उपसंपादक असो, सहसंपादक असो, अशा कितीतरी उपाध्या ते त्यांच्याकडे काम करणाऱ्या वार्ताहरांना देऊन मोकळे होतात पण पद नेमके कोणतेही असो त्या त्या मंडळींचे काम केवळ बातम्या जमा करणे म्हणजे वार्ताहारकी करणे एवढेच असते मग ते प्रवीण बर्दापूरकर असतील, यदु जोशी असतील, गजानन जानभोर असतील, अतुल कुलकर्णी, राही भिडे, मधुकर भावे, बंधुराज लोणे असतील किंवा आजवरचे अनेक मान्यवर आले असतील आणि गेले असतील. लिखाणातलया अशा साऱ्या मान्यवरांकडून दर्डा यांनी केवळ वार्ताहरकी करवून घेतली, करवून घेताहेत…


www.vikrantjoshi.com


येथे हा मुद्दा त्या अतुल कुलकर्णींमुळे अधोरेखित केला. अतुल यांनी मालकाच्या थोबाडात कसे मारायचे असते प्रकाशन समारंभात विजय व राजेंद्र दर्डा यांना त्यांच्याच साक्षीने दाखवून दिले. महत्वाचे म्हणजे अतुल कुलकर्णी यांच्या समव्यावसायिकांचे कडू काढा घेतल्यासारखे चेहरे यानिमीत्ते बघण्यासारखे होते. अतुल कुलकर्णी यांचा हा भव्य दिव्य पुस्तक प्रकाशन सोहळा बघून अनेकांचे डोळे दिपले आहेत कारण या सुखद सोहळ्याला राज्यातले पृथ्वीराज चव्हाण किंवा नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे असंख्य मान्यवर अनेक सरकारी अधिकारी, विविध मंत्री, बहुसंख्य पत्रकार विविध क्षेत्रातले मान्यवर उत्स्फूर्त आले आणि अडीच तास प्रकाशन समारंभ संपेपर्यंत बसून होते, जे दर्डा यांना जमले नाही, जमणार नाही ते मंत्रालयातल्या एका अति सामान्य वार्ताहराने, लोकमत दैनिकाच्या प्रतिनिधीने दाखवून दिले, अतुल यांचे लोकमत मधले पद कधीही लोकमत मध्ये काम करणाऱ्या इतरांप्रमाणे महत्वाचे नसते कारण वेळ आली तर हेच दर्डा लोकांना अतुल कुलकर्णी हे लोकमत दैनिकाचे खरे मालक आहेत आणि आम्ही साधे प्रतिनिधी आहोत, सांगून मोकळे होतील पण अतुलकडून किंवा अन्य कोणत्याही यदु जोशी किंवा राही भिडे यांच्या सारख्या मोठ्या ताकदीच्या स्टाफकडून कामे मात्र केवळ एक प्रतिनिधी म्हणजे वार्ताहर म्हणूनच कवरवून घेतील, थोडक्यात अमुक एखाद्याने मोठे होणे जणू त्यांना ते आवडणारे नसते जसे ज्या मधुकर भावे यांनी बाबूजी बाबूजी म्हणत म्हणत दर्डा कुटुंबासाठी आयुष्य वेधले ते भावे जेव्हा आमदारकी साठी स्पर्धेत आहे, लक्षात आल्या नंतर त्यांना खड्यासारखे उचलून बाजूला फेकले तेव्हा भावे वेडे व्हायचे तेवढे बाकी होते,हे अतुल कुलकर्णी यांचे होणार नाही कारण ते प्रत्येक बाबतीत दर्डा यांच्यापेक्षा सरस ठरले आहेत, ते काय कुलकर्णी यांना पगार देऊन दाबून ठेवतील याउलट अतुलचं त्यांना विचारून मोकळे होतील, तुम्हाला माझ्याकडून दरमहा वेतन हवे आहे का…? 


पत्रकार व लेखक अतुल कुलकर्णी हे तसे लोकमत दैनिकाचे अनेक वर्षांपासून केवळ मंत्रालय प्रतिनिधी पण त्यांनी दाखवून दिले कि ते मालकांपेक्षा कितीतरी मोठे आहेत, कारण दर्डा यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला नक्की त्या त्या वेळी राज्यातले अगदी देशातलेही मान्यवर हजेरी लावून मोकळे होत असतील पण त्या मान्यवरांचे तेथे जाणे नक्कीच मनापासून नसते किंवा नसावे, उगाच पंगा कशाला या भावनेतून असते पण अतुल कुलकर्णी यांच्या प्रकाशन समारंभाला माझ्यासारखे काही, त्याचे वैचारिक मतभेद असलेले देखील मनापासून कौतुक करायला आले होते…विशेष म्हणजे कुलकर्णी यांनी यदु जोशी यांना देखील दाखवून दिले कि ते यदु यांच्या पेक्षा लोकप्रियतेच्या बाबतीत कितीतरी पुढे आहेत, राजेंद्र आणि विजय दर्डा यांचे उतरलेले चेहरे त्यांच्या मनातली अस्वस्थता ते लपवू शकले नाहीत. यापुढे फारतर दर्डा कदाचित अतुल यांचे महत्व कमी करण्याचा पद्धतशीर डाव देखील टाकतांना मागेपुढे बघणार नाहीत पण पैशांच्याही बाबतीत केवळ वार्ताहारकीच्या भरवशावर नवश्रीमंत झालेल्या अतुल कुलकर्णी यांना केवळ पगारासाठी नोकरी ची गरज असेल, आहे, अजिबात नाही ते मात्र कदाचित यदु जोशी यांच्याबाबतीत घडू शकते म्हणजे पगाराच्या भरवशावर त्यांचे घर निदान आज तरी चालते त्यामुळे मालकाच्या पुढे जाणे म्हणजे गाढवांच्या मागे उभे राहून लाता खाणे निदान यदु यांना आजतरी ते शक्य असावे असे वाटत नाही, नेमकी वस्तुस्थिती त्या, साधा वार्ताहर असलेल्या चंद्रकांत शिंदे यांच्याशी बोलून सांगतो. प्रस्थापितांच्या विरुद्ध उभे राहून मोठ्या खुबीने मोठे होणारे हे असे मराठी वार्ताहर, त्यांचे कौतुक व्हायलाच हवे, प्रसंगी त्यांना त्यांच्या गुण दोषांसहित स्वीकारायलाच हवे…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *