लाडके मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

लाडके मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 

देवेन्द्रजी तुम्ही हे करून दाखविले. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या योजनेंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंचाची निवड थेट निवडणूक पद्धतीने करण्याचा महत्वाचा निर्णय तुम्हीच घेतला आहे. गावपातळीवरचे नियोजन स्थानिक लोकांनी करावे, कामाचे प्राधान्यक्रम त्यांनीच ठरवावेत, त्याची अंमलबजावणी आणि लोकसहभाग देखील त्यांच्याच हाती ठेवावा विशेष म्हणजे शासनाने केवळ निधी उपलब्ध करून देण्यापुरते आपले अस्तित्व ठेवावे या वेगळ्या विषयावर घेतलेला निर्णय किंवा त्याच पद्धतीचे लोकोपयोगी सामाजिक निर्णय राज्यातल्या जनतेला खुश करून गेले. तुमचे तेथल्या तेथे निर्णय घेणे  कारण निर्णय घेण्यामागे काही मिळविणे किंवा राजकारण करणे असे काहीही तुमच्या मनात नसते. सामान्य माणसे शासकीय किंवा प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उद्योगपती समाजसेवक राज्यातले विविध क्षेत्रातले मान्यवर विविध संघटना विविध विरोधी पक्षातले नेते कार्यकर्ते साधू संत मुल्ला धर्मगुरू कलावंत खेळाडू विद्यार्थी गरीब मध्यमवर्गीय श्रीमंत नोकरदार शेतकरी शेतमजूर शहरातले ग्रामस्थ  इत्यादी सर्वांना तुमचे वागणे बोलणे अत्यंत आश्वासक वाटत असल्याने तुमची लोकप्रियता वाढत गेल्याचे दिसते…

जे शरद पवारांनी ऐनवेळी गमावले ते देवेंद्र फडणवीस यांनी कमावले म्हणजे असे वाटले होते कि पवार दिल्लीत मराठींचा झेंडा रोवून मोकळे होतील पण ते घडले नाही पवारांचे घोडे येथेच थांबले पुढे गेले नाही. फडणवीसांची मात्र सुरवात छान झाली आहे त्यांना दिल्लीत मान आहे व त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. येथे डरकाळ्या फोडणारे नेते तेथे मांजरीसारखे भासतात पण फडणवीसांचे तसे अजिबात नाही त्यांना जे केंद्राकडून करवूंन घ्यायचे असते ते सहजशक्य होते. समृद्धी महामार्ग झपाट्याने सुरु होणे समृद्धीचे काम पूर्णत्वाकडे झुकणे सहज शक्य झाले कारण फडणवीस यांनी जे जे मागितले ते ते त्यांना मोदी आणि केंद्र सरकारने पटापट दिले. जे काय करायचे असते ते राष्ट्र आणी राज्य हित नजरेसमोर ठेवून त्यांनी केलेले असते हे केंद्राला आणी मोदी यांना नेमके माहित असल्याने तेथे कोणतीही अडचण येत नाही. फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा अशावेळी उपयोगी ठरते…


www.vikrantjoshi.com

आराम त्यांना माहित नाही. आळस त्यांच्या रक्तात नाही. शिकता शिकता काम करायचे आणि काम करता करता शिकायचे हे असे त्यांचे व्यस्त जीवन मी बघत आलो आहे. संघ शाखेवर नियमित जाणारे स्वयंसेवक ते विद्यार्थी परिषदेचे काम बघणारे तरुण नेते त्यानंतर लगेचच अति लहान वयात फडणवीस जसे नगरसेवक झाले त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. नागपूर भाजपाचे पदाधिकारी आक्रमक युवा नेते अत्यंत लहान वयात नागपूरचे महापौर जगभरात विविध चर्चासत्रात भाग घेणारे विद्यार्थी नेते ते आजचे लाडके मुख्यमंत्री हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही शिवाय अतिशय लहान वयात पितृछत्र हरविले त्यामुळे सारे निर्णय जवळपास एकट्याने घ्यायचे पण संघवाल्यांचे एक बरे असते ते अमुक एखाद्या संघाशी संबंधित कुटुंबाला एकटे वाऱ्यावर सोडून मोकळे होत नाहीत त्यामुळे जरी गंगाधरराव लवकर गेले तरी अनेक बुजुर्ग अगदी त्या त्या वेळेचे सरसंघचालक देखील देवेंद्र यांच्यापाठीशी भरभक्कमपणे उभे राहिले. देवेंद्र हे भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरचे आधी अध्यक्ष झाले नंतर लगेच राज्य आणि राष्ट्र पातळीवर देखील त्यांनी युवा पदाधिकारी म्हणून काम सांभाळले. पुढे ते याच अनुभवाच्या जोरावर थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष आणी मुख्यमंत्री झाले. तोडपाणी करणे रक्तात नसल्याने ते संस्कार त्यांच्यावर न झाल्याने मला आठवते, जेव्हा ते केवळ आमदार म्हणून विरोधी बाकावर बसायचे, भल्या भल्यांना घाम फुटायचा. नाशिक मिलिटरी स्कुल मध्ये खऱ्या अर्थाने मोठी शिस्त लावली ती फडणवीसांनी जेव्हा ते तेथेही ऍक्टिव्ह होते. थोडक्यात ते जेथे जेथे ज्या ज्या पदावर काम करतात वेगळी छाप पाडून मोकळे होतात. कारण त्यांना नेमके काम करून दाखवायचे असते. पैसे मिळविणे भानगडी करणे चारित्र्यला डाग पाडून घेणे त्यांना ना कधी जमले ना कधी जमेल. पुढल्या पाच वर्षात हे राज्य नेमके कशा पद्धतीने चालवायचे आहे, सारे काही त्यांनी आधीच नियोजन केले असल्याने, माझ्या पत्रकारितेच्या या प्रदीर्घ वाटचालीत पहिल्यांदा मला असे वाटले कि या नेत्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे. अर्थात ती जबाबदारी तुमचीही,मतदान करण्याची, लाडक्या नेत्याला संधी देण्याची…


ते चतुर आहेत पण कपटी नाहीत. ते राजकीय नेते आहेत पण कावेबाज नाहीत, ढोंगी नाहीत दुटप्पी नाहीत. लुटणारे लुबाडणारे नाहीत. त्यांना कधीतरी राजकीय डावपेच खेळावे लागतात पण केवळ तेच करत राहणे स्वभावात नाही. कपट कारस्थान करून एखाद्या विरोधकाला संपविण्यापेक्षा आव्हान देऊन ऑन मेरिट अमुक एखादी राजकीय लढाई जिंकायला त्यांना अधिक भावते. हसून प्रेमाने बोलणे किंवा तेथल्या तेथे नाही सांगून एखाद्याला मोकळे करणे त्यांना आवडते. फेऱ्या मारून झुलवत ठेवायचे नंतर नाही सांगुन शाप घेणे त्यांच्या स्वभावात ते कधीही बसणारे नाही. अमुक एखादा सामाजिक हिताचा निर्णय घेतांना समोर कितीही प्रभावी विरोधक असला तरी ते आपल्या घेतलेल्या निर्णयापासून विचलित न होणारे स्वयंभू नेते आहेत. ते शब्दप्रभू भाषाप्रभू आहेत. जेव्हा ते इंग्रजी बोलतात त्यांचे ते बोलणे ऐकत राहावे वाटते आणि हिंदी व मराठीवर त्यांचे तर प्रभुत्व आहेच. त्यांची भाषणे कंटाळवाणी नसतात आश्वासक असतात सभा जिंकणारी असतात. पोटतिडकीने भाषण करणे त्यांच्या स्वभावात आहे आपल्याला त्या त्यांच्या मोठ्यांदा बोलण्याची एक हितचिंतक म्हणून भीती वाटते पण मुद्देपटवून सांगणे त्यांना आवश्यक वाटते त्यामुळे त्यांचे भाषण बेंबीच्या देठापासून असते… 


मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय चातुर्य, प्रशासनावरील पकड, दिल्लीतील उत्तम संपर्क आणि प्रभाव तसेच विकासाची दूरदृष्टी याच्या जोरावर महाराष्ट्राची देशात आणि दिल्लीत सतत चांगली चर्चा सुरु असते. देशात ज्याच्या त्याच्या तोंडी फडणवीस व महाराष्ट्र्रहे विषय असतात ज्यावर सारे अनेकदा मोठ्या अभिमानाने एकमेकांना कौतुकाने सांगत असतात. पायाभूत सुविधा, समृद्धी सारखे रस्त्यांचे महामार्गांचे प्रोजेक्ट्स, मेट्रो, शेतकर्यांचें प्रश्न, जलयुक्त शिवार योजना, शाश्वत जलसंधारण, सौरऊर्जा इत्यादी एक ना अनेक जणू दरदिवशी राज्याच्या लोकांच्या भल्यासाठी सतत काहीतरी वेगळे करत राहणे, विशेष म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्यापद्धतीने निर्णय घेणे आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे सारे मोठ्या झपाट्याने फडणवीसांनी करून दाखविले आहे त्यामुळेच प्रत्येक मतदार ज्यालात्याला सांगत सुटलाय पुन्हा युतीचे राज्य येणार आहे, पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री चतुर आहेत अभ्यासू आहेत चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने आज पर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांचे ते ते चांगले गूण त्यांनी आत्मसात केलेअसल्याचे स्पष्ट दिसते म्हणजे ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे पारदर्शी आहेत, सुधाकरराव नाईक यांच्यासारखे निधड्या छातीचे आहेत, शरद पवारांसारखे विरोधकांना पुरून उरणारे आहेत, बाबासाहेब भोसले यांच्यासारखे त्यांना उत्तम कायद्याचे ज्ञान आहे, नारायण राणे यांच्यासारखी त्यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे. मनोहरपंतांसारखे ते स्त्रियांशी बोलतांना सभयता पाळतात आणि मितभाषी तर ते आहेतच… 


विलासराव देशमुख यांच्यासारखे ते मोठ्या मनाचे आणि मित्रांसाठी धावून जाणारे नेते आहेत. ते अब्दुल रहमान अंतुले यांच्यासारखे तेथल्या तेथे निर्णय घेऊन मोकळे होतात. यशवंतराव चव्हाण जसे राष्ट्रभक्त देशभक्त होते त्यांच्यात कायम यशवंतराव झळकत असतो. शिवाजीराव निलंगेकर यांच्यासारखा त्यांना मराठवाड्यातील विविध समस्यांचा नेमका अभ्यास आहे. अशोक चव्हाण जसे मुख्यमंत्री असतांना उत्तम ड्रेसअप व्हायचे तेच यांचे आहे पण त्यांचा शिवराज पाटील झालेला नाही 

म्हणजे दिवसातून दहा वेळा अंडरवेअर देखील बदलायची, कपडे बदलण्यावर वेळ खर्च करायचा,असे त्यांचे फाजील वागणे नाही. सुशीलकुमार शिंदे यांचे डोळे घारे असल्याने तयाचें रोखून बघणे नंतर रेटून बोलणे जसे प्रभावित करायचे ते तसेच फडणवीस यांचे देखील म्हणजे त्यांच्या केवळ डोळ्यातून नजरेतून त्यांचा खरेपणा लोकांना आणि भेटणाऱ्यांना जाणवतो एक नेता म्हणून माणूस लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवतो. केवळ काही वाक्यात त्यांचे माजी मुख्यमंत्र्यांशी साधर्म्य साधने 

अशक्य आहे, पुन्हा केव्हातरी…


हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *