बदललेले राजकारण १ : पत्रकार हेमंत जोशी

बदललेले राजकारण १ : पत्रकार हेमंत जोशी 

कुठेतरी छान वाचण्यात आले, शेअर करतोय, तुम्हालाही आवडेल, रेल्वेच्या खिडकीत बसून प्रवास करणारा २२ वर्षांचा मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला, पप्पा बघा झाडे मागे मागे पळताहेत. वडील त्याच्याकडे पाहून हसले. त्यांच्यासमोर एक जोडपे बसले होते. त्यांना तो मुलगा ऍबनॉर्मल वाटला. इतक्यात तो मुलगा परत ओरडला, पप्पा ढग आपल्याबरोबर पळताहेत. न राहवून समोर बसलेले जोडपे मुलाच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डॉक्टरकडे दाखवा कि…त्यावर वडील हसले, आम्ही आत्ता इस्पितळातूनच येत आहोत. माझा मुलगा जन्मतः अंध होता. त्याला आजच डोळे मिळाले.

मला नेमके तेच सांगायचे आहे कि प्रत्येकाची वेगळी कथा असते. समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय, पटल्याशिवाय मत बनवू नये कारण सत्य हे बहुतेकवेळा आश्चर्यकारक असू शकते, वेगळे असू शकते…ज्यांना विनाकारण वाटले होते किंवा माहिती न घेता जे बरळत होते कि भाजपामध्ये जाऊन पुसदचे निलय नाईक आणि शिवसेनेत येऊन मनीषा कायंदे हे दोन भिन्न व्यक्तिमत्वे संपले आहेत, आता त्यांचे काही खरे नाही, म्हणजे नेमके त्यांच्याविषयी जाणून न घेता त्यांना जवळून ओळखणारे जे बरळत होते त्यांच्या गालावर या दोघांच्या विधान परिषदेवर जाण्याने एक सणसणीत थप्पड बसलेली आहे…

एक मात्र नक्की राजकारणाचे काही खरे नसते, अकस्मात कोणाचे भले होईल आणि तडकाफडकी कोण बाजूला पडेल येथे काहीही खरे नसते. म्हणून सत्तेत आल्यानंतर देखील जमिनीवर चालायचे असते. मध्यंतरी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुंबईतील उदघाटनपर दिमाखदार सोहळ्यात दादरच्या सावरकर सभागृहात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले ते १०० टक्के सत्य आहे, माणूस चांगल्या कामांनीच ओळखल्या जातो अन्यथा असे कितीतरी आहेत कि जे पूर्वी मंत्री होते, आज मंत्रालयात जवळून जरी गेलेत तरी त्यांना ओळख दिल्या जात नाही किंवा वाट वाकडी करून आम्ही पुढे निघून जातो, खरे आहे सुधीरभाऊ. कालपर्यंत शिवसेनेचे दीपक सावंत आणि माणिकराव ठाकरे दोघेही सत्तेत होते पुढले आणखी काही महिने ते सत्तेत असतीलही म्हणजे दीपक सावंत आरोग्य मंत्री आहेत तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव विधान परिषदेचे उपसभापती आहे पण या दोघांच्याही बाबतीत एका क्षणात सारे बदलले आहे कारण दोघांनाही त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी परिषदेवर डावलल्याने त्यांना यापुढे सत्तेत सहभागी होणे त्या त्या पदावर काम करणे अशक्य आहे..

माणसे सत्तेत आल्यानंतर का बदलतात, कळत नाही. तिकडे शहाद्याचे राजकुमार रावल निवडून यावेत आणि त्यांच्यासमोर उभे असलेले संदीप बेडसे पराभूत व्हावेत एकेकाळी मनापासून वाटायचे आणि ते घडलेलंही पण रावळ मंत्री झाल्यानंतर वाटायला लागले कि बेडसे त्यांच्यापेक्षा नक्की सरस होते, पैसे खातांना त्या रावळ यांनी पर्यटन खात्यात किंवा त्यांच्या भागात जमिनी लाटताना एवढी लाज सोडलेली आहे कि राज्याची मान खाली जावी. तिकडे त्या बांद्रा सी लिंकवर जहाज बुडविल्या जाते आणि त्याची केवळ थातुरमातुर चौकशी होते, काय म्हणावे किंवा त्या पर्यटन खात्यात आता रावळ यांना नको ते करण्यासाठी रोखणारे प्रशासकीय पद देखील नको आहे, त्यांच्या भानगडीत विरोध करणाऱ्या आमचे मित्र विजय वाघमारे यांची बदली घडवून आणल्यानंतर वास्तविक मुख्यमंत्र्यांनी आशिष कुमार सिंग यांच्यासारखे करप्ट मंडळींची अगदी तोंडावर आई बहीण घेणारे पर्यटन खात्यात एखादे त्वरेने शिस्तीचे प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी संचालक म्हणून तातडीने पाठविण्याची गरज आहे पण हे पद मुद्दाम, जाणून बुजून रिक्त ठेवल्या गेले आहे, रावळ यांना खाण्यासाठी मोकळे रान मिळावे म्हणून, माणसे हि अशी बदललीत कि वाईट वाटते, राजघराण्यातले राजकुमार गरज नसतांना जेव्हा मंत्री म्हणून नको ते उद्योग करतात तेव्हा त्या भागातून येणारे विजयकुमार गावित असोत कि सुरूपसिंग नाईक किंवा हे आजचे रावळ, सारेच हे असे हलकट आणि करप्ट, बघून वाईट वाटते, राजकुमार पुन्हा मंत्री होऊ नयेत असेच आता त्यांना जवळून ओळखणाऱ्या सर्वांना वाटू लागलेले आहे…

ज्यांनी आजतागायत माझ्या आठवणीत विरोधी बाकावर बसून विधान परिषद दणाणून सोडलेली आहे त्यात एक दीपक सावंत होते पण मंत्री झाले आणि त्यांचा देखील ‘ प्रमोद नवलकर ‘ झाला, म्हणजे दिवंगत नवलकर किंवा सावंत यांच्या सारखी अनेक मंडळी विरोधी बाकावर असतांना राज्य आणि सभागृह दणाणून सोडतात, सोडायचे पण तीच मंडळी सत्तेत मंत्री म्हणून बसली, आली कि फेल्युअर ठरतात, असे का घडते, लक्षात येत नाही. अकार्यक्षम ठरले म्हणून सावंत यांचे विधान परिषदेवर पुन्हा जाणे रद्दकरण्यात आले यासारखे दुसरे दुर्दैव नाही, एवढा अभ्यासू नेता, मंत्री म्हणून अपयशी ठरणे, हसावे कि रडावे कळत नाही. ज्यांनी विरोधी बाकावर बसून राज्य आणि सत्तेतले हलवून हादरवून सोडलेले असतात वास्तविक असे नेते मंत्री झाल्यानंतर त्यांनी आणखी मोठे होणे आणि अत्यंत यशस्वी 

ठरणे अपेक्षित असते पण ते घडले नाही कि वाईट वाटते. अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते मात्र ना विरोधात हवेत ना सत्तेत, राज्य अशांच्या मोठ्या होण्याने अति वेगाने रसातळाला जाते, चांगली माणसे सभागृहाची गरज असते पण हे प्रमाण अगदीच अल्प असते, फारच थोडे असते…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *