गडकरी बावनकुळे फडणवीस तिघे एकमेकांसाठी कासावीस —पत्रकार हेमंत जोशी

गडकरी बावनकुळे फडणवीस

तिघे एकमेकांसाठी कासावीस 

—-पत्रकार हेमंत जोशी 

नागपुरात नाना पटोले यांनी लोकसभेला नितीन गडकरी यांच्यासमोर निवडून येण्यासाठी यावेळी जंग जंग पछाडले, उपयोग फारसा झालेला नाही कारण नितीन गडकरी निवडून येतील खासदार होतील, त्यांचे सरकार सत्तेत आले तर मंत्रीही होतील. गडकरी पराभूत होतील पटोले विजयी ठरतील हा जो कांगावा केल्या जातो तो खरा नाही, गडकरी नक्की पराभूत होणार नाहीत. यावेळी ज्या अनेक अफवा गडकरी निवडून न येण्यासाठी नागपूर लोकसभा मतदार संघात पसरविण्यात आल्या त्यातली मोठी अफवा होती कि नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आपापसात अजिबात पटत नाही त्याचा मोठा फटका गडकरी यांना बसणार आहे ते त्यातून लोकसभा घालवून बसणार आहेत. प्रभावी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गडकरी यांचे हनुमान आहेत त्यामुळे फडणवीस यांना त्यांच्याविषयी मनात अस्वस्थता आहे काहीसा राग आहे अशी देखील अफवा पटोले यांच्या गोटातून पसरविण्यात आली होती…असे अजिबात नाही. गडकरी यांना फक्त एकाच त्रास आहे तो त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा. त्यांना दगदग हल्ली फारशी सहन होत नाही, गडकरी अकाली थकल्यासारखे झाले आहेत, अधिक दगदग झाली कि लगेच त्यांना भोवळ येते. राजकारणात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल किंवा जेव्हा तुम्हाला आयुष्यात वेगळे काहीतरी अचिव्ह करायचे असते तेव्हा तब्येत नक्की जपायची असते त्याकडे ते दोघेही दुर्लक्ष करतात म्हणजे गडकरी आणि फडणवीस देखील. देवेंद्र फडणवीस वयाने तरुण आहेत म्हणून सहन करतात पण त्यांचाही गडकरी होता काम नये अन्यथा यशाचे अत्युच्च शिखर हाताशी आणि देह अंथरुणावर असे 

घडता काम नये. गडकरींच्या बाबतीत एक महत्वाचे सांगायचे झाल्यास ते प्रत्येक व प्रत्येकाविषयी आलेला राग उगाचच कायमस्वरूपी मनात ठेवतात त्यामुळे होते काय त्याचा विपरीत परिणाम प्रकृतिस्वास्थ्यावर होतो शुगर वाढते आणि गडकरी घेतलेल्या सततच्या टेन्शन मधून जागच्या जागी कोसळतात…


www.vikrantjoshi.com


उरला सवाल गडकरी आणि फडणवीस यांच्यातल्या मतभेदांचा. वयानुसार नागपुरात दोघांचे मित्रपरिवारातले सदस्य नक्की वेगवेगळे असलेत तरी त्या दोघात एकमेकां विषयी सख्ह्या भावासारखे प्रेम आहे, गडकरी यांना हे शंभर टक्के माहित आहे कि उद्या जर ते राजकारणापासून जरी दूर गेलेत किंवा मुलीकडे अमेरिकेत कायमस्वरूपी निघून गेलेत तरी फडणवीस त्यांच्या मुलांची स्वतःचे कुटुंब असल्यासारखी काळजी घेतील, संघ परिवारातून घडलेले संस्कार, त्यातून एकमेकांविषयी जिव्हाळा आपोआप निर्माण होत असतो. चंद्रशेखर बावनकुळे यांची तुलना जर द्रौपदीशी केली तर हे नक्की कि गडकरी हे त्यांच्यासाठी अर्जुन आहेत त्यामुळे बावनकुळे यांचे गडकरी यांच्यावर नक्की काकणभर प्रेम अधिक असले तरी फडणवीस देखील बावनकुळेंसाठी साक्षात भीम आहेत. द्रौपदी भीमाच्या कुशीत शिरल्यानंतर तिला नक्की अर्जुनाची आठवण यायची पण भीमाला किंवा इतर भावंडांना तिने परमोच्च आनंद घेतांना दूर ढकलल्याचे त्या महाभारतात कुठेही उल्लेख नाही त्यामुळे बावनकुळे त्या दोघांनाही आपले वाटतात आणि द्रौपदी सारखी चतुर भूमिका निभावताना बावनकुळे कुठेही कमी पडले असे वाटत नाही. गडकरी नक्की निवडून येणार आहेत आणि त्यांना निवडून आणतांना या दोघांनी म्हणजे फडणवीस आणि बावनकुळेंनी घेतलेली मेहनत केलेले अथक प्रयत्न तोंडात बोटे घालण्यास भाग पाडतात…


महत्वाचे हेच कि यावेळी सोशल मीडियाचा म्हणाल तर दुरुपयोग म्हणाल तर प्रचार करण्यासाठी उपयोग भाजपाविरोधकांनी आक्रमक पद्धतीने करवून घेतला त्यांच्यासमोर भाजपा या लोकसभा निवडणुकीत फिकी पडली हे फडणवीस यांनी ध्यानात घेऊन त्याची येणाऱ्या विधानसभेला म्हणाल तर तयारी केली पाहिजे म्हणाल तर डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला पाहिजे. नागपूरची लोकसभा निवडणूक नितीन गडकरींना अडचणीची गेली ते पराभूत होतील अशा कंड्या अफवा बातम्या राजकीय वर्तुळात विशेषतः सोशल मीडियावर पद्धतशीर पसरविल्या गेल्या पण ते सारे खोटे आहे खोटे होते एवढेच तुम्हाला येथे काही पुरावे सादर करून सांगू शकतो. फडणविसांच्याही बाबतीत बावनकुळे यांच्या सारखेच म्हणजे सध्या त्यांचे अफेअर अगदी जोरात मोदी आडनावाच्या शक्तीशी सुरु आहे पण त्यांनी आपल्या बालपणापासून असलेल्या गडकरी आडनावाच्या म्हणाल तर राजकीय प्रेयसीकडे दुर्लक्ष केलेले आहे असे शंभर टक्के नाही. फडणवीस जेव्हा मोदी यांना फ्लाईंग किस देतात तेव्हा ते गडकरी यांना देखील डोळा मारून मोकळे होतात, एवढे मात्र नक्की आहे कि मोदी त्यांच्यासाठी अर्जुन आहेत आणि गडकरी भीमाच्या भूमिकेत आहेत…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *