लाज वाटते : पत्रकार हेमंत जोशी

लाज वाटते : पत्रकार हेमंत जोशी 

काही पत्रकारांना काही समाजसेवकांना काही डोळस अभ्यासू नागरिकांना हे सतत वाटत असते कि या राज्यात प्रत्येक विविध राजकीय पक्षात जे डाकूंच्या रूपात आणि वेशात बहुसंख्य नेते सरकारी शासकीय प्रशासकीय अधिकारी दलाल पत्रकार मीडिया पर्सन नेते आमदार खासदार या मंत्री इत्यादी वावरताहेत त्यांचा येनकेनप्रकारेण खात्मा व्हावा किंवा असे काहीतरी घडावे कि त्यांना कायमची जरब बसावी पण असे कलियुगात अजिबात घडत नसते, कलियुगात मला वाटते केवळ भारताला मिळालेला तो मोठा शाप आहे. लाज वाटते घ्रुणा  येते त्या नागरिकांची मतदारांची कि जे डाकूच्या वेशात आवेशात भूमिकेत सदैव असणाऱ्या वावरणाऱ्या  नेत्याना अधिकाऱ्यांना मंत्र्यांना पाठीशी घालतात, त्यांच्या पाठीशी राज्यातले देशातले सारेच अंध नागरिक उभे राहतात. अमुक एक नेता आमचे भले करतो भलेही  तो राज्याचे देशाचे वाटोळे करणारा असेल हे तर असे झाले कि माझा नवरा रात्री अंथरुणावर मला बिलगून झोपतो ना मग भलेही तो बाहेर दिवसभर चार बायकांसंगे संभोग करून येत असेल, म्हणणाऱ्या बायकोसारखे…

पार पडलेल्या विधान सभा निवडणुकीत नेमके काय घडले तर आपले उमेदवार कसे निवडून येतील हे केवळ राज्यातल्या भाजपाचे  लक्षात आले नाही, त्याचा फायदा इतर साऱ्याच पक्षातल्या उमेदवारांना झाला त्या त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी करवून घेतला. मला हे नक्की माहित आहे कि एकनाथ खडसे यांना नेमके सहकार्य करणे शेवटी शेवटी देवेंद्र फडणवीसांच्या देखील हाती उरले नसावे, भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींपुढे लोटांगण घालून देखील किंवा त्यांना सॉरी म्हणून देखील किंवा माझ्या हातून झालेल्या चुका नक्की पुन्हा होणार नाहीत हे सांगून देखील जळगाव जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर असलेल्या लेवा पाटील समाजाचे लाडके नेते एकनाथ खडसे यांचे काहीही सांगणे, मागणे त्यांच्या पक्षश्रेठींनी अजिबात ऐकले नाही त्यामुळे एकनाथ खडसे यांचे वैयक्तिक किती राजकीय नुकसान झाले त्यावर येथे फारसे महत्व न देता किंवा फारशी त्यावर तुम्हाला माहिती न देता मी एवढेच सांगतो कि खडसे यांना अडगळीत टाकणे त्यातून जळगाव पंचक्रोशीत भाजपाचे मोठे नुकसान झाले, पुढे काही वर्षे भरून न येणारे मोठे नुकसान झाले…


www.vikrantjoshi.com

अशा अनेक बायका असतात कि त्यांना जरा जरी घरात कोणी किंवा नवऱ्याने रागावले तर त्या थेट रस्त्यावर येऊन गोंधळ घालतात परिणामी घर आणि आपण स्वतः बदनाम होऊन मोकळ्या होतात. भाजपा श्रेष्ठींचे एकनाथ खडसे यांना टाळणे त्यांना डावलणे त्याचवेळी एकनाथ  खडसे यांचे एखाद्या गोंधळ  घालणाऱ्या बाईसारखे मीडिया समोर येऊन तोंडसुख घेणे त्यातून घडले असे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या खडसे समर्थकांनी विशेषतः  लेवा पाटील ज्ञातीने भाजपाला जळगाव पंचक्रोशीत अजिबात सहकार्य केले नाही मतदान केले नाही त्यामुळे काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर यांच्या मेव्हण्याला मलकापूर मतदार संघात म्हणजे मुक्ताईनगरला लागून असलेल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लेवा पाटलांनी मतदान केले आणि सतत निवडुणन येणाऱ्या उमेदवाराला म्हणजे भाजपचे चैनसुख संचेती यांना पराभूत केले. जातीय समीकरणानंचा नेमका फायदा फुंडकरांच्या मेव्हण्याने घेतला वरून त्यांना लेवा पाटलांनी मनापासून मतदान केले आणि निवडून आणले. जर एकनाथ खडसे यांना त्या परिसरात मोठेपणा देउन अपमानित न करता प्रचारात उतरविले असते तर वेगळे चित्र उभे राहिले

असते….

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे आपापसातील मोठे वैर त्यामुळे भाजपाचे अगदी सहज निवडुन येऊ शकणारे रावेर मतदारसंघातून हरिभाऊ जावळे पराभूत झाले तसेच या दोघांच्या वादात व समस्त गोंधळात स्वतः रोहिणी खडसे पराभूत झाल्या आणि चैनसुख संचेती तर धक्कादायक पद्धतीने पराभूत झाले. भाजपा संघाची माणसेच उमेदवारांना घेऊन बुडाले…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Comments 1

  1. Avatar SHAILESH PALKAR says:

    हे अगदीच्च ऊघडं ऊघडं केलंत सरजी

Leave a Reply to SHAILESH PALKAR Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *