मुख्यमंत्र्यांचे मित्र २ : पत्रकार हेमंत जोशी

मुख्यमंत्र्यांचे मित्र २ : पत्रकार हेमंत जोशी 

आपला मित्र आणखी खूप खूप पुढे जावा त्याचे हात आज आभाळाला टेकले आहेत उद्या ते आकाशाला टेकावेत हीच मनीची सदिच्छा ठेवून मुख्यमंत्र्यांचे हे अतिशय जवळचे मित्र, बालमित्र श्रीयुत आल्हाद राजे स्वतःला त्यांच्यापासून चार हात दूर यासाठी ठेवतात कि आपल्या कुठल्याही वागण्याने, बोलण्याने त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या प्रगती मध्ये बाधा येऊ नये पण जेव्हा केव्हा ते दोघे एकमेकांना भेटतात, तो क्षण म्हणे बघण्यासारखा असतो, दोन मित्रांमधली खरी उत्स्फूर्तता त्यावेळी तेथे दिसते अन्यथा शायना एन सी किंवा प्रकाश मेहता यांच्या सारखे असे कितीतरी कि झालाय ना आपला मित्र या राज्याचा मुख्यमंत्री, मग लाटून घ्या जेवढे फायदे लाटून घेता येतील, त्यातून फडणवीस यांना जेवढे त्यांच्या विरोधकांपासून सावध राहावे लागत नाही तेवढी अधिक सावधगिरी त्यांना या अशा संधीसाधू स्वार्थी हलकट वृत्तीच्या सहकारी किंवा मित्रांपासून बाळगावी लागते….

अर्थात जे असे आल्हाद राजे यांच्यासारखे साधे सरळ भोळे सीधे साधे मित्र असतात त्यांची गणना त्यागात नव्हे तर येड्यात केली जाते, हा माणूस कसा मूर्ख आहे असे त्यास कधी तोंडावर सांगितल्या जाते तर कधी पाठीमागे अशांना हिणविल्या जाते, आल्हाद यांना हि अशी टीका अनेकदा सहनही करावी लागते पण तरीही मित्राच्या पोझिशनचा गैरफायदा घेणे निदान या जन्मी तरी मला शक्य नाही ते स्पष्ट सांगून मोकळे होतात, असे फार कमी असतात ज्यांना आल्हाद राजे यांच्या सारखे निरपेक्ष मनाचे मित्र लाभतात…

आपण ज्यांच्या निकट आहोत, ज्यांचे निकटवर्ती आहोत, त्यांचे आपल्यामुळे फायदा सोडा पण नुकसान होणार नाही याची वास्तविक प्रत्येक मोठ्या माणसाच्या जवळच्या नातलगांनी आप्तांनी मित्रांनी काळजी घ्यावी. हि अशी काळजी श्रीमान उद्धव ठाकरे यांचे एक निकटवर्ती सहकारी खासदार आणि सामना वृत्तपत्राचे दैनिकाचे संपादक श्रीमान संजय राऊत अजिबात का घेत नाहीत हे मला न पडलेले कोडे आहे आणि उद्धव हे देखील त्या जाहिरातीप्रमाणे, दाग अच्छे लागते है पद्धतीने कायम काही त्रासदायक मंडळींना किंवा ज्यांच्यामुळे अनेकदा मानसिक त्रास होतो अशा संजय राऊत यांच्या सारख्या मंडळींना खुले आम बिलगून चिपकून बसले आहेत, डोक्यावर घेऊन बसले 

आहेत, अर्थात आपल्या सूचनांना महत्व दिले जाईल असे अजिबात नसते, जी माणसे सेनेला त्रासदायक हानिकारक आहेत असे आपणास वाटते ते त्यांना वाटत नाही, अंतर्गत काही राजकीय किंवा भावनिक बाबी अशा असतात ज्यामुळे संजय राऊत हे बोट पुढे केल्यानंतर त्यावर फुंकर न मारता उलट कडकडून चावणार आहेत हे उद्धव यांना माहित असूनही ते आपले बोट प्रेमाने पुढे करतात, नक्की त्यात अनेक राजकीय भावनिक गुपिते दडलेली असतात…

अलीकडे सामना वृत्तपत्रातून जैन समाज किंवा जैन मुनी आणि मनी हा मीरा भायंदर महापालिका निवडणुकीनिमित्ते गाजलेला विषय असो, सामना वृत्तपत्रातून संजय राऊत यांनी घेतलेल्या कोणत्याही भूमिकेवर उद्धव नाराज झाले, कधी कानावर पडले नाही. राऊत लिहून मोकळे झाले कि मीरा भायंदर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मनी आणि मुनीचा वापर करून सत्ता काबीज केली, त्यांच्या या लिखाणावर आक्षेपार्ह असे नक्कीच काही नाही, नसावे पण जे राऊत भाजपाकडे किंवा मेहता यांच्याकडे बोट दाखवून मोकळे झाले आहेत त्या राऊतांच्या माणसांनी विशेषतः आमदार प्रताप सरनाईक यांनी निवडून आणलेल्या २२ जागा केवळ तिळगुळ वाटून किंवा हातावर खाडी साखर ठेवून निवडून आणल्या आहेत असे राऊतांना सांगायचे असेल तर या पद्धतीला दुसऱ्याची ती रांड आणि आपली ती कीप, हे एखाद्या वेश्येच्या आईने केलेल्या स्टेटमेंट सारखे आहे. पार पडलेल्या मीरा भायंदर महापालिका निवडणुकीत प्रताप सरनाईक यांचा अक्षरश: बळीचा बकरा त्यांच्याच पक्षातल्या एकनाथ शिंदे यांनी केल्याचे हळूहळू बाहेर पडू लागले आहे. जो उठायचा सकाळी सकाळी पैसे घेण्या प्रताप सरनाईक यांना गाठून त्यांना सलाम ठोकून मोकळा व्हायचा, शिंदे यांनी या निवडणुकीत फारशी आर्थिक रसद पुरविली नाही उलट काही स्थानिक धनाढ्य मंडळींना या निवडणुकी निमित्ते सरनाईक यांना आर्थिक सहकार्य करायचेही होते पण त्यांना खुणेने ठाणे जिल्ह्यातील एका प्रभावी नेत्याने सांगून टाकले, गरज नाही, प्रताप यांच्या पाठी उभे राहण्याची, आणि हा सर्वाधिक प्रभावी नेता कोण, हे वेगळे सांगण्याची येथे आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. या निवडणुकीनिमित्ते सरनाईक यांची जी आर्थिक कोंडी झाली किंवा जो काय महाकाय खर्च झाला, आता म्हणे ते खाजगीत सांगताहेत कि भविष्यातल्या माझ्या एखाद्या स्वतःच्या निवडणुकीवरही यापुढे मला उभे राहणे शक्य होईल, वाटत नाही, त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना नेमके हेच हवे होते, म्हणजे सरनाईक आर्थिकदृष्ट्या डबघाईला यायला हवेत हे त्यांना मनोमन वाटत होते, तेच घडले. ठाणे जिल्ह्यात एकहाती शिवसेना ठेवणार्या एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरवा म्हणून नक्कीच उद्धव ठाकरे यांचा प्रताप सरनाईकांवर वरदहस्त असतो पण जे अनंत तरे यांचे झाले तेच आता सरनाईक यांचे होते आहे, तरे त्या दिवंगत आनंद दिघे यांच्यासमोर टिकले नाहीत, कायम अडगळीत पडले, कदाचित हे असे नजीकच्या काळात प्रताप सरनाईक यांचेही होईल, राहून राहून वाटते…

असो, येथे विषय प्रताप सरनाईक किंवा त्यांचे पक्षांतर्गत विरोधक मंत्री एकनाथ शिंदे हा नाही, विषय मित्र सहकारी सखा हा असा आहे आणि उद्धव यांचे एक सहकारी खासदार आणि पत्रकार संजय राऊत अनेकदा कित्येकवेळा नको तेवढी चुकीची भूमिका घेऊन त्यांच्या नेत्याला किंवा शिवसेनेला कसे अडचणीत आणून सोडतात, हा आहे. मनीचा आधार पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेनेही घेतला म्हणजे तीन बोटे स्वतःकडे असतांना संजय राऊत यांनी सोडलेले टीकास्त्र विनाकारण डोकेदुखी ठरले. सारे जैन भाजपा संगे असे अजिबात नाही किंवा नव्हते, असे कित्येक होते जे आपल्या या जैन समाजाला निक्षून सांगायचे, शिवसेनेपासून दूर जाणे नको, पण आता नको ते घडले, सामनातले लिखाण जैन समाजाला अपमानित करून गेले, काहीतरी नक्कीच गंभीर घडले आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *