उदय तानपाठक : पत्रकार हेमंत जोशी

उदय तानपाठक : पत्रकार हेमंत जोशी

पत्रकार उदय तानपाठक हे एक धमाल व्यक्तिमत्व आहे, तो गावमित्र आहे, तो आम्हा सर्वांना सार्यांसमोर वाट्टेलते बोलतो, आम्ही सारेच त्याचे बोलणे ऐकून घेतो, त्याचे बोलणे विनोदातून मर्मावर बोट ठेवणारे असते, आमच्या कडे त्यावर काहीही उत्तर त्याक्षणी नसते. उदयशी बोलायचे असेल तर रांगेत यावे लागते, आपला नंबर लागला कि त्याच्याशी बोलता येते, तो पुढारी दैनिकात सुरुवातीपासून एकाच पदावर आहे, त्याचे ते पद आहे, मालक जाधवांच्या मांडीला मांडी लावून बसणे. जसे पुण्यातल्या पुणेकर बाईला विधान परिषदेतल्या तिच्या मालकाशिवाय मध्यंतरी तीन चार वर्षे करमत नव्हते तसे उदयला त्याच्या मालकाशिवाय करमत नाही आणि मालकांना उदयशिवाय. ज्यांना त्याची थट्टा करता येते ते करू शकतात, पण त्या हिंमतीचे मला वाटते माझ्यासारखे फारतर एखादे दोन असावेत…

का कोण जाणे पण दैनिकातून अधून मधून, या मुलांचे पालक कोण, या मथळ्या खाली जे लहान मुलांचे फोटो छापून येतात, त्यातली जवळपास ९० टक्के बालके शंभर टक्के उदयच्या चेहऱ्यावर का असतात, हे आजपर्यंत आम्हाला न उलगडलेले कोडे आहे, उदय त्याच्या कार्यालयातून निघाल्यानंतर वास्तविक त्याच्या घरी म्हणजे मुलुंडला फारतर एक तासात पोहोचायला हवा, पण कार्यालयातले सांगतात, असे कधीही घडत नाही, घरी पोहोचायला त्याला खूप खूप तास लागतात पण त्या बालकांचे चेहरे आणि उडायचे मधेच गायब होणे, कृपया वाट्टेल तो अर्थ काढू नका. पत्रकार अभय देशपांडे म्हणतो, हात दाखवा गाडी थांबवा, हि संकल्पना परिवहन मंडळाला उदयमुळेच सुचली, कार्यालय ते घर, मित्रांना गाडीत घ्यायचे, गाडीतच गप्पांचा फड नंतर एकेकाला त्यांच्या निवासस्थानी सोडून शेवटी मुलुंडला प्रस्थान, त्याचे हे असे नित्याचेच वागणे. हालत डुलत घरी जाणार्या पत्रकारांना घरी, थेट बेडरूमपर्यंत सेफ सोडणे, तेथेही तो अशांच्या कुटुंबाटल्यांचे आशीर्वाद घेऊन मोकळा होतो. उदयकडे न्याहाळून बघा, मला नाही वाटत, महाविद्यालयात स्त्रीपात्र रंगविताना त्याने कधी पॅड वापरले असतील…

श्रीमान राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेणे तेही प्रकट, म्हणजे मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांनी बोलणे खाण्याची मानसिक तयारी ठेवणे अतिशय आवश्यक असते, तुम्हाला ते आठवत असेलच कुठल्याशा निवडणुकीदरम्यान राजसाहेबांनी त्या मराठी वाहिनीवर मुलाखत घेणार्याचीच कशी ऐशी तैशी करून ठेवली होती. परवा उदय तानपाठक आणि संदीप प्रधान यांनी त्यांची मुलाखत घेतली, संदीपला आयोजकांनी का निवडले, नेमके कळले नाही, कदाचित ब्राम्हणांसमोर एका सीकेपीची मुलाखत घेतांना किमान एकतारी सीकेपी हवा, हा विचार त्यांच्या डोक्यात आला असावा. पण उदय तानपाठक तेथे असणे आवश्यकच होते, कारण हे व्यक्तिमत्व पत्रकार असूनही साऱ्यांना जसे भावते तसे राज यांनाही मनापासून भावते. उदय याची अमुक एखाद्याशी ओळख करून देतांना सावधगिरी बाळगावी लागते, कारण पुढल्या काही दिवसात उदय ओळख करून दिलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर असतो आणि आपण पायाशी म्हणून उदय आपल्याकडे येतोय असे कळल्यानंतर प्रसंगी माझ्यासहित एखादा फिल्मी हिरो सुद्धा आपल्या प्रेयसीला लपवून ठेवेल, एकदा का उदयने तोंड उघडले किआपले तोंड बंद होते आणि समोरचा क्षणार्धात उदयमय होतो कायमसाठी, आपल्या हाती फक्त हात चोळत बसणे असते…

उदय म्हणजे माहितीचे भांडार आहे, या राज्यात कुठे काय मस्त मस्त खायला मिळते, याची त्याच्याकडे इत्यंभूत माहिती असते, कारण तो ब्राम्हण आहे त्यामुळे उत्तम खवय्या आहेच. असे म्हणतात तो आणि आमचे बंधुराज जेव्हा केव्हा भेटतात, म्हणे बोलणे फक्त खाण्यावर होते आणि तेही एखाद्या उत्तम ठिकाणी खाता खाता, खोटे वाटत असेल तर पत्रकार धर्मेंद्र जोरे यांसी विचारावे, जोरे यांचे मांसाहारी ज्ञान या दोन ब्राम्हणांमुळेच वाढले, असे जोरे मोठ्या कौतुकाने सांगत असल्याचे कळते…

तुमच्या ते लक्षात आलेच असेल, उदय सतत हसतो आणि समोरचा मग अजित पवार असोत कि पृथ्वीराज चव्हाण म्हणजे किंग अंकल मधले त्या जॅकी श्रॉफ सारखे एखादे कधीही न हसणारे किंवा क्वचित कधीतरी स्माईल देणारे कॅरेक्टर जरी असले तरी त्यांना तो हसवतो, हसवत ठेवतो, पोट दुखेपर्यंत सर्वांना हसवतो. मनातल्या मनात उदय अनेकदा रडत असतो पण लोकांना मात्र आपले रडू दुःख कळू न देता त्यांना जगण्याचा आणि हसण्याचा आनंद देतो. त्याचे आई वडिलांवर श्रावण बाळासारखे प्रेम होते, वडिलांची त्याने एकट्याने केलेली सेवा, मला वाटते आजही स्वर्गात ते त्याचे वडील उठल्यानंतर सर्वप्रथम उदय यास नक्की दुवा देत असतील नंतरच पुढल्या कामाला लागत असतील. मनातले सांगतो, आज सत्य ते सांगतो, अमुक एखाद्याची जेव्हा मी खूप खूप तारीफ करतो त्याआधी मोठी किंमत त्याच्याकडून मी वसूल केलेली असते, होय, उदयदेखील त्यांच्यातलाच एक, त्याने माझे यापूर्वी अनेकदा मोठे काम केले आहे, ते म्हणजे मला खूप खूप हसवण्याचे आणि माझया एखाद्या लिखाणावर मला तेथल्या तेथे खडे बोल सुनावण्याचे. तो चुकून जेव्हा केव्हा मला माझ्या लेखांवर दाद देतो, खरोखरी असे त्याक्षणी वाटते कि आपण आयएएस ची परीक्षा पास झालोय…मूल अभ्यास करीत नसेल तर एखादा त्याला शिकवणी आणि बायकोच्या पाठी काही क्षण सोबतीसाठी जशी एखादी पेड मॅडम ठेवतो तसे अमुक एखाद्या घरात जर अमुक एखादे पात्र अजिबात हसणारे नसेल तर उदय सरांची शिकवणी लावून तर बघा, नाही ते पात्र पुढल्या काही दिवसात खदाखदा हसायला लागले तर मला पत्रकार 

म्हणू नका, नालायक पुरुष संबोधून मोकळे व्हा. एक मात्र नक्की मला उदयच्या सुटलेल्या देहाची आणि पत्रकार राजन पारकर याच्या लग्नाची नेहमी काळजी असते. माझ्या ओळखीच्या मुलीशी लग्न कर आणि सार्या चिंता माझ्यावर सोड, हे मी नेहमी राजनला सांगत आलोय, कोणीतरी समजवा रे त्याला…

अगदी अलीकडेच मी त्याला म्हणालो, बरे झाले अनिल थत्ते यांनी गगनभेदी बंद केले आणि तू स्वतःचे पाक्षिक काढले नाही, मला आपोआप बिनबोभाट विनायसे यश मिळाले, स्पर्धक नसल्याने. उदयची पत्रकारिता दुर्दैवाने कोणी फारशी सिरियसली घेतली नाही हे त्याचे दुर्दैव, त्याने दिलेली बातमी वित्तम बातमी ठरते आणि त्याचे लेख, मुलाखती सारेच्या सारे लिखाण पुनःपुन्हा वारंवार अनेकवेळा वाचावेसे वाटते…

उदयच्या ओळखी त्याची लेखणी, त्याचे ज्ञान, हे माझ्याकडे असते तर आज मी किमान पाचशे कोटींचा मालक झालो असतो, अर्थात असे काही पत्रकार त्या मंत्रालयात आहेत ना त्यांचे शिक्षण आहे, ना त्यांच्या दैनिकाला खप आहे ना त्यांनी कधी कुठले गाजलेले लिखाण केलेले आहे, तरीही ते पाचशे कोटींचे मालक यासाठी आहेत कि त्यांची वृत्ती दलाली करण्याचीच आहे, हरामखोरी त्यांच्या नसानसात भिनलेली आहे, असे समोर जरी दिसलेत तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात पोहोचते, सारे गूण सदगुण असूनही उदय फक्त ‘ खाऊन पिऊन ‘ सुखी आहे, माणूस मस्त आहे, जगतमित्र आहे…

तूर्त एवढेच!

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *