अस्वस्थ अपयशी शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी


अस्वस्थ अपयशी शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी  

शरद पवारांना राजकारणातल्या चार गोष्टी समजावून सांगणे म्हणजे कसे धावायचे व जिंकायचे हे पी.टी.उषाला विशाखा सुभेदारने समजावून सांगण्यासारखे किंवा पवारांना राजकारणातले ज्ञान पाजणे म्हणजे मशिदीत जाऊन एखाद्या मौलवीला आम्हाला येथे रामरक्षा म्हणू द्याल का असे विचारण्याससारखे किंवा राजकारण ते तसे नव्हे हे असे खेळायला हवे हे असे पवारांच्या कानात जाऊन सांगणे म्हणजे पत्रकार  मित्र विवेक भावसार याने एखाद्या उंटिणीच्या ओठांचा किस घेण्यासारखे इम्पॉसिबल टास्क तरीही येथे एक आगाऊपणा करावासा वाटतो आहे म्हणजे सिंहाच्या डोळ्यात मला प्रेमाने का होईना फुंकर मारून बघायची आहे किंवा वाघिणीला डोळा मारून आती क्या खंडाला विचारायचेच आहे. अजितदादा मंत्री नव्हते केवळ बारामतीच्या स्थानिक राजकारणात होते तोपर्यंत त्यानंतर पहिल्यांदा मंत्री म्हणून शपथ घेईपर्यंत हाच माझा राजकीय वारसदार असे शरद पवार खाजगीत सांगायचे आणि जाहीर ते तसेच भासवायचे तेव्हा विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या कन्या सुप्रिया हिस राजकारणात आणण्याचे उतरवण्याचे त्यांच्या अजिबात मनातही नव्हते पण ज्या पुतण्याला डोक्यावर घेतले ते अजितदादा आपल्यानेतृत्वालाच भविष्यात आव्हान देऊन मोकळे होतील, सु सु करून मोकळे होतील हे जेव्हा शरदरावांच्या ध्यानात आले त्यांनी मग एक दिवस हळूच सुप्रिया सुळे यांना येथे राज्यात आणून तिचे राजकारणातले महत्व आणि अस्तित्व त्यांनी वाढवायला घडवायला सुरुवात केली….


वास्तविक शरद पवारांना त्यांच्या कन्येला जय ललिता मायावती ममता बॅनर्जी इत्यादी महत्वाकांक्षी आणि यशस्वी महिला नेत्यांच्या रांगेत आणून बसवायचे होते पण सुप्रिया यांच्याबाबतीत हिंदी सिनेमासारखे झाले घडले तेही दस्तुरखुद्द शरद पवार पाठीशी असतांना म्हणजे काही तरुणी माधुरी दीक्षितसारख्या शेवटपर्यंत सिनेमात टॉपच्या अभिनेत्री किंवा लीड रोल मधेच टिकून राहतात काहींचे आगमन दणक्यात होते पण पुढे लवकरच त्यांचा शोमा आनंद, अंजली वळसंगकर, अरुणा इराणी होतो त्या कुठेतरी कमी पडतात आणि दुय्यम भूमिका स्वीकारायला लागतात. सुप्रिया सुळे यांचे पवारांना त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर हे असे होऊ द्यायचे नसेल तर  सध्या जे राज्यात कानाकोपऱ्यात मराठा विरुद्ध मराठेतर हि आग प्रत्येकाच्या मनात धुमसते आहे हि पडलेली फूट तातडीने स्वतः लक्ष घालून तसे वारंवार जनतेला आव्हान करून आणि कृतीतून देखील तसे दाखवून पडलेली दरी जोडण्याची फार मोठी गरज आहे अन्यथा पवारांच्या पाठी सुप्रिया यांना राज्यात मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल सुप्रिया यांचा विनायक मेटे शशिकांत पवार पुरुषोत्तम खेडेकर अजिबात होता कामा नये. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका पण सुप्रिया यांची  राजकारणातली सोलो अभिनेत्री न होणे हि शरद पवारांची मोठी खंत आणि फार मोठी काळजी आहे. सभा जिंकणे राज्यातल्या तरुण महिलांना एकत्र आणून राष्ट्रवादीत व्यस्त ठेवणे किंवा बचत गटांच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना मोठी आर्थिक ताकद देणे इत्यादी सारे तसे सुप्रिया यांना झक्कास जमलेले आहे पण मराठा व मराठेतर हि दरी निर्माण करण्यात जे पवारांकडे बोट दाखवले जाते त्यात राजकीय नुकसान सुप्रिया यांचेच होणार आहे…


www.vikrantjoshi.com


मराठा आणि ब्राम्हण किंवा मराठा आणि सवर्ण मराठेतर अशी दरी मराठा आरक्षणाच्या आधी या राज्यात कधीही नव्हती सर्वत्र अतिशय सलोख्याचे वातावरण असायचे विशेष म्हणजे मराठा समाज हाच आपला कप्तान आहे पद्धतीने सारेच मराठ्यांकडे बघायचे आणि त्यांना मोठा मान द्यायचे, गावातला प्रमुख पाटील हाच गावकऱ्यांना मोठा आधार वाटायचा त्याच्या पाठीशी गावकरी ठाम उभे राहायचे पण मूठभर नेत्यांनी हे वातावरण विनाकारण दूषित करून वादाची अस्वस्थतेची मोठी दरी आता या राज्यात निर्माण केलेली आहे व हे कलुषित दूषित वातावरण निर्मल स्वच्छ करण्याची मोठी जबाबदारी फक्त आणि फक्त शरद पवारच पार पाडू शकतात अन्यथा त्यांच्या पाठी त्यांच्या निवृत्तीनंतर राज्यातली जनता जातीय द्वेषाच्या राजकारणात नक्की होरपळून निघेल आणि त्याची नाराजी सुप्रिया यांनाच भोवण्याची दाट शक्यता आहे. पार्थ अजित पवारांना हवा तसा राजकीय पाया अद्याप रोवता आलेला नाही हि अजितदादांची मोठी काळजी व खंत आहे पण सुप्रिया यांच्या पेक्षा आजच म्हणजे शरदरावांच्या देखतच रोहित व अजित पवार सुप्रियाच्या रांगेत येऊन बसलेले आहेत, काही कालावधीनंतर सुप्रियाला सोडून स्वतःच्या हिमतीवर ते राजकारणात यशस्वी ठरतील आणि हे शरदरावांना नेमके माहित असूनही त्यांनी सत्तेच्या जवळ जाण्यासाठीचा क्षणिक विचार करून मराठेतर समाजाची मोठी नाराजी नक्की ओढवून घेतलेली आहे म्हणजे शरद पवार हे केवळ पश्चिम महाराष्ट्रातील लालची नेत्यांचे आणि केवळ विशिष्ट समाजाचे नेते हाच विचार कोकण मराठवाडा खान्देश व विदर्भातील जनतेच्या डोक्यात असतो पण आज पवार सत्तेत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिम्मत नाही पण या अशा वागण्यातून पवार यांच्या नंतर त्यांच्या मनातली एकमेव वारसदार बाजूला फेकल्या जाण्याची दाट शक्यता आहे एका महान मोठ्या लोकमान्य लोकप्रिय नेत्याच्या बाबतीत हे घडणे मोठे दुर्दैव ठरेल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी  


Comments 1

  1. Gamma Pailvan says:

    नमस्कार हेमंत जोशी.

    हा लेख विचारचक्रास चालना देऊन गेला. नुकतीच बाबासाहेब आंबेडकर राहत होते त्या राजगृह नामे घराची तोडफोड करण्यात आली ( बातमी : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rajgruha-vandalism-police-detain-one-suspect/articleshow/76863611.cms ). ही बातमी वाचल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला तो भांडारकर संस्थेत केलेल्या तोडफोडीचा. तेव्हाच जर या हलकट वृत्तीस चाप लावला असता तर आज राजगृहापर्यंत या किडीची मजल गेली नसती. या गलिच्छ किडीस खतपाणी घालून जोपासण्यास शरद पवारच जबाबदार आहेत. कोणास तरी त्याची किंमत मोजावीच लागते. महाराष्ट्रीय जनतेने ती मोजली. आता पाळी पवारांची आहे.

    आज भांडारकर संस्थेवर हल्ला करणारे ७२ गावगुंड मोठ्या दिमाखात न्यायालयातून मुक्त झाले. हे पाप कोणाचं? लोकं मेटे, खेडेकर वगैरेंना विचारंत नाहीत. लोकं ते पवारांचंच पाप मानणार.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

Leave a Reply to Gamma Pailvan Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *