ईश्य ! हमें करोना : पत्रकार हेमंत जोशी

ईश्य ! हमें करोना : पत्रकार हेमंत जोशी 

करोनाच्या संकटात महामारीत अनेक मृत्यूला गाठतील पण करोनाचे संकट टळल्यानंतर भारतीयांसमोर अचानक लोकसंख्या वाढीचे मोठे संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे कारण भारतीयांना काही काम नसले कि आपली लोकसंख्या झपाट्याने वाढते हा इतिहास आहे. अगदी परवा मी नागपुरातल्या माझ्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या हेमंत नानिवडेकर या उद्योगपती मित्राला देखील हेच म्हणालो कि हेमंतराव सध्या तुम्ही घरातच असता जरा सांभाळून अन्यथा आदित्यला लहान भाऊ किंवा बहीण झाली अशी बातमी काही महिन्यांनी आमच्या कानावर पडायला नको, अनेक घरातून नक्की ८-९ महिन्यांनी पूर्वीचे ते दृश्य हमखास बघायला मिळणार आहे, बाळंपणासाठी एकाचवेळी सासू आणि सुना माहेरी निघाल्या आहेत हे ते दृश्य बघायला मिळणे आता अनेक वर्षानंतर सहज शक्य होणार आहे असे एकंदरीत गॉसिपिंग माहितीवरून माझ्या ते लक्षात आले आहे. माझा एक पत्रकार मित्र आणि बांधकाम खात्यातील एक अभियंता मित्र सिंगल आहेत, त्यांनी म्हणे या दिवसात पुरुष नोकरांना घरात डांबून ठेवल्याचे त्यांच्या भागातल्या पोलिसांनी माझ्या कानावर घातले आहे. देवाची कृपा कि पुरुषाला पुरुषापासून दिवस जात नाहीत. फार पूर्वी एकदा का शेतीची कामे आटोपलीत कि आमच्या विदर्भातले शेतकरी कित्येक महिने घरातच बहुतांश वेळ पडून असायचे, शेतीही सुपीक त्यातून घरी आणि शेतात दोन्हीकडे पीक भरपूर यायचे, एकेकाला पूर्वीच्या काळी ६-७ मुले विशेषतः स्त्रीला वयाची पन्नाशी येईपर्यंत सहज असायची, ८-१० वर्षे त्याकाळी बायका अगदी म्हाताऱ्या होईपर्यंत दरवर्षी पोटुशी असायच्या.  हे यापुढे नक्की पुन्हा एकवार बघायला मिळणार आहे. म्हणजे आमचे मित्र आशिष मोहदरकर यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी गोंडस बाळाला जन्म दिला, हि गुड न्यूज तुमच्या कानावर सहज पडू शकते. अनेक वयस्क मित्र मैत्रिणी तुम्हाला अशा गुड न्यूज नक्की देणार आहेत…

केवळ सामजिक भान ठेवण्यासाठी म्हणून करोनाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात ज्यांना काम पडू शकते अशा जवळपास ५०० मित्र मैत्रिणींना मी मेसेज केला होता नंतर जाहीर देखील लिहून टाकले कि ज्यांना म्हणून या दिवसात काही अडचण आली तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा, जे जे करणे शक्य आहे ते सहकार्य अगदी मनापासून माझे असेल. अनेकांनी काही छोटी मोठी कामे सांगितलीत, बहुतेकांना एकतर इकडून तिकडे जायचे होते किंवा तिकडून इकडे मुंबईत यायचे होते, सुरुवातीला ते करणे मला शक्य झाले. पण असे १०-१२ मित्र निघालेत कि ज्यांनी मला दारू बाटल्या उपलब्ध करून देण्याचे काम सांगितले. नशीब मी आता मुंबईत राहायला आहे, पूर्वीसारखा जर मी जळगावच्या बळीराम पेठेत राहायला असतो तर या मित्रांनी मला तेही काम सांगितले असते. यातला गमतीचा भाग सोडा, पण व्यसनाच्या का म्हणून एवढे अधीन असावे कि तुम्हाला त्या दारू सिगारेट किंवा गुटक्याशिवाय जीवन जगणे अशक्य व्हावे. तुमच्या बायका जर दारू सिगारेट किंवा गुटका या व्यसनांच्या आहारी असतील तर ठीक आहे पण त्यांना ती व्यसने नसतील तर त्या तुमचा रोज एक बलात्कार सहन करतात असे तुम्हाला वाटत नाही का, मग कशाला म्हणून त्या मुसलमानांना दोष देता कि त्यांच्या बायका रोज नवर्याचा एक बलात्कार सहन करतात. व्यसनांनी तुमचे ते तोंड आधीच गलिच्छ दुर्गंधीतून संडासमय झालेले, कसले नर्कमय जगणे असल्या घाणेरड्या पुरुषांच्या बायकांचे, शी शी शी…

खरोखरी सरकारने सतत तीन दिवस दारूची दुकाने उघडून द्यावीत आणि समजा अमुक एक बाटली पाचशे रुपयांना मिळत असेल तर ती दुप्पट किमतीला विकावी. त्या तीन दिवसात बाटल्यांची किंमत दुप्पट करून या जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा सदुपयोग करोना महामारी रिलीफ फंड साठी म्हणून उपयोगात आणावा. एवढी रक्कम सरकारकडे त्या तीन दिवसात जमा होईल कि सरकारला त्यानंतर कोणाही पुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. व्यसनाधीन माणसे शिस्तीत रांगा लावून दारूचा साठा करून ठेवतील आणि सरकारची देखील आर्थिक चिंता दूर होईल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *