हे वागणं बरं नवं : पत्रकार हेमंत जोशी



हे वागणं बरं नवं : पत्रकार हेमंत जोशी 

हि जी काय हल्ली जात्यंधांची एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे ती मूठभर मराठींना विकृत आनंद देणारी आणि बहुसंख्य मराठींच्या हृदयाला यातना देणारी डोक्याला झिणझिण्या आणणारी मनाला बोचणारी डोक्याला ताप ठरलेली असंख्य अनंत वेदना देणारी तद्दन फाल्तुक मूठभरांच्या मनाची विकृती आहे, अत्यंत लज्जास्पद हा प्रकार आहे. जातीपातींवरून एकवेळ आम्ही समस्त मराठींनी अमराठींविरुद्ध अस्तित्व संपण्याच्या भूमिकेतून संघर्ष केला असता किंवा समस्त मराठींनी जर येथल्या पाकड्या विचारांचे काही मुसलमान आहेत ज्यांच्या मनात आम्ही १५ कोटी शंभर कोटींना पुरून उरू असे आहे असते, अशा धर्मांध आणि पाक विचारसरणीला धरून चालणाऱ्या काही मुसलमानांविरुद्ध जर बंड केले असते तर त्या भूमिकेचे सर्व मराठी थरातून समर्थन लाभले असते कौतुक झाले असते पण हे काय, सारे राहिले बाजूला आणि आम्ही मराठीच आपापसात लढतो भांडतो आहे. मूठभर नेत्यांनी चिथावणी द्यायची आणि चेल्यांनी मग ब्राम्हण आपले खरे शत्रू असे समजून त्यांना जगणे नकोसे करायचे वरून ब्राम्हण तरुणांनी देखील असेच मनातल्या मनात धुमसत रहायचे आणि शिवाजी दूरचे केवळ सावरकर आपले, मानायचे समजायचे  हे जे काय हल्ली सुरु आहे त्याचे मोठे वाईट परिणाम दुष्परिणाम अनेकांना भविष्यात भोगावे लागणार आहेत विशेषतः अशावेळी वारीस पठाण यांच्यासारखे तुम्ही संघटित नाहीत म्हटल्यावर तुटून पडतील आणि तुम्ही मात्र स्वतःचे आपापसातल्या भांडणातून नक्की मोठे नुकसान करवून घेणार आहेत हे लक्षात घ्या…

हा जो शरद पवार यांचावर टाकलेला फोटो सुरुवातीला मला ज्या ब्राम्हण व्हाट्सअप ग्रुपवरून आला, मी त्याक्षणी तो ग्रुप ब्लॉक केला कारण जे शरद पवार यांना जवळून ओळखत नाहीत अशाच कोणातरी विकृताने हे कृत्य केले आहे. अमुक एखाद्या भूमिकेवरून हिम्मत ठेवून तुम्ही पवार यांच्याशी पंगा घ्या पण शरद पवार कींवा देवेंद्र फडणवीसकुटुंबाविषयी असे विकृत लिखाण व फोटो टाकणे म्हणजे मराठींनी विकृतीला आणि संडास वृत्तीला बिलगल्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे जे चित्र अतिशय आणि घाणेरड्या विचारांचे पाईक आहे असे येथे मुद्दाम सांगावेसे वाटते. आणि पवारांनी देखील त्याचवेळी आपण कसे या दिवसात म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी चुकीचे वागतो आहे, चुकीच्या विचारांना प्रोत्साहन देतो आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. ब्राम्हण आणि मराठे असे भांडण पेटवून देणाऱ्यांना सांगावेसे वाटते कि सर्वांनी एकत्र येऊन जे पाक विचारांचे मुसलमान आहेत त्यांना तोंड द्यायला हवे अन्यथा अतिशय वेगाने झपाट्याने मुसलमानांची  वाढणारी लोकसंख्या पुढल्या पंचवीस वर्षात मराठींना हिंदूंना जीव नकोस करणारी ठरेल. केवळ मूठभर मतांच्या राजकारणासाठी शरद पवारांनी महाआघाडीने पाक विचारांच्या काही मुसलमानांचे लांगुलचालन करणे योग्य ठरणारे नाही. अत्यंत म्हणजे या देशातले हिंदू आपलेच आहे असे मुसलमानांना का वाटत नाही त्यावर देखील कृती घडणे गरजेचे आहे…


www.vikrantjoshi.com

ज्या काही मंडळींविषयी शरद पवार यांच्या मनात नफरत आहे ती या अशा फोटो टाकण्याने त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या इतर नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात असलेला राग आणखी आणखी वाढत जाईल, धुमसत राहील याउलट महात्मा गांधी पद्धतीने आम्ही तुमच्यापेक्षा कसे वेगळे नाही हेच ब्राम्हणांनी पवार किंवा तत्सम ब्राम्हणद्वेष्ट्या किंवा ब्राम्हणांविषयी मनात राग असणाऱ्या इतरांना पटवून देण्याची हि नाजूक वेळ आहे. अहो, मी किंवा माझा पत्रकार मुलगा दिवसभर सतत राज्यातल्या तमाम नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या सान्निध्यात वावरत असतो, एकही क्षण असे जाणवत नाही कि त्यांच्या मनात आमच्याविषयी द्वेष आहे, नफरत आहे किंवा राग आहे. विशेषतः पवारांचे  समर्थक किंवा त्यांचे प्रसंगी कुटुंब सदस्य देखील आमच्याशी अतिशय प्रेमाने आदराने वागतात विशेषतः त्या सर्वांचे आजही देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनापासून प्रेम आहे त्यांचे ते कायम कौतुक करतात आदराने त्यांच्याविषयी बोलतात. कृपया आदरणीय शरद पवार यांच्याविषयी असले घाणेरडे विकृत प्रकार यापुढे करू नका त्यातून काहीही साध्य होणार नाही याउलट एकमेकांविषयी अधिकाधिक राग वृद्धिंगत होईल. काही बाबींकडे दुर्लक्ष्य करूया आणि शरद पवार या राज्याचे भले करणारे साधणारे नेते म्हणून बघूया. असे फोटो फक्त विकृतांना आवडतात, चांगल्या मनोवृत्तीचे हे लक्षण नाही…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Comments 2

  1. Gamma Pailvan says:

    This comment has been removed by the author.

  2. Gamma Pailvan says:

    नमस्कार हेमंत जोशी.

    आता असं बघा की समजा शरद पवारांच्या मागे सर्व मराठीजनांनी आपल्या सदिच्छा एकदिलाने उभ्या केल्या. तरीपण त्यातनं पुढे काय निष्पन्न होणारे? सुप्रिया सुळे शाहीनबागेत जाऊन घटनाविरोधाची भूमिका घ्यायचीये ती घेणारंच ना? मग मराठी लोकांच्या सदिच्छा फुकट गेल्या म्हणायच्या ना? निदान लोकं तरी असंच समजतात.

    लोकांच्या मनांत शरद पवारांबद्दल राग आहे. सासरचे लोकं सुनेला नीट नांदवत नसले की सुनेची कशी कुचंबणा होते. आपल्याला धड काय हवंय ते कळंत नाही, कोणाला काही सांगता येत नाही, पण काय व्हायला नकोय त्याची यादी मात्र तयार असते. पवारांच्या बाबतीत अशीच काहीशी अवस्था मराठी माणसाची होते. मग तो राग असा कुठूनतरी बाहेर पडतो.

    बाकी, 'पवारांचं वैयक्तिक रीत्या ब्राह्मणांशी वैर नसणं' या तथ्यात काही दम नाही. पवारांचं सार्वजनिक वर्तन ब्राह्मणद्वेषीच राहिलं आहे. तसं पाहायला गेलं तर महमदआली जिना हे टिळकांचे शिष्य होते. निदान ते तरी तसंच मानीत. पण त्यांचं सार्वजनिक वर्तन भारताच्या फाळणीस कारणीभूत झालं.

    कशावरून पवारांचं सार्वजनिक वर्तन ब्राह्मणांच्या वंशविच्छेदास कारणीभूत होणार नाही? याची खातरी कोणी द्यायची? पवारांनी? की आजून कोणी?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

Leave a Reply to Gamma Pailvan Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *