लोकसभा आखाडा : पत्रकार हेमंत जोशी


लोकसभा आखाडा : पत्रकार हेमंत जोशी 

जवळपास महिन्याभराच्या गॅपनंतर लिखाणाला सुरुवात करतोय. वास्तविक एखाद्या राजकीय परिघात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत धामधुमीत अधिकाधिक लिहायचे सोडून आहे त्या नियमित लिखाणापासून दूर पळणे म्हणजे एखाद्याने मधुचंद्राच्या राती नववधूला पलंगावर एकटीलाच सोडून एखाद्या मंदिरात देवाच्या मूर्तीसमोर बसून २१ व्या अध्यायाचे पारायण करीत बसल्यासारखे किंवा पायलटने विमान कृ मेम्बरच्या हाती सोपवून सिनेमा टॉकीज मध्ये पाठीमागच्या सीट वर बसून लैंगिक अश्लील प्रकार करणाऱ्या जोडप्यासारखे विमानात अन्यत्र जाऊन बसण्यासारखे आणि आमचे हे खरेच असे आले कारण आमच्या घरी माझ्या तीन नातवांपैकी दोन नातवांचे उपनयन शुभकार्य होते, जे करायचे ते मनापासून त्यात व्यस्त होतो, लिखाणाकडे नको त्यावेळी दुर्लक्ष झाले म्हणजे ज्यावेळी पुत्रप्राप्तीसाठी संभोग आवश्यक असतो त्यादरम्यान हाती ‘ ब्रम्हचार्याचे फायदे ‘ हे पुस्तक हाती घेऊन वाचत बसलेल्या बावळट तरुणासारखे आमचे हे असे दुर्लक्ष झाले…

एखाद्याचा गेम आपल्याच माणसांनी कसा करायचा असतो हे फडणवीस मंत्री मंडळातील संभाजीराव पाटील निलंगेकरांकडून शिकण्यासारखे, मला तर त्यांच्यात अनेकदा थेट मराठवाड्यातले शरद पवार दिसतात म्हणजे संभाजी निलंगेकर एकदा का त्यांची सटकली कि ते कोणाचा राजकीय खात्मा खिमा गेम करतील नेम नसतो, त्यांच्या अगदी घरातले उदाहरणे मला देतील, नाव सांगत नाही पण आडनाव सांगतो, मिसेस राणे आडनावाच्या एक सोशल वर्कर आहेत, माझ्या जवळून परिचयाच्या आहेत, विशेष म्हणजे त्या संभाजी यांच्या सख्ह्या मावशी आहेत, त्यांना मी फार पूर्वी सांगितले होते कि गाढवाच्या मागून आणि संभाजी यांच्या पुढून म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, त्यांनी ऐकले नाही, आता त्या घरीच असतात, पापड लाटतात आणि वाळत घालतात….

जो नेता ऐन तारुण्यात हिंदी सिनेमाच्या हिरोसारखा पेटून उठतो आणि थेट मुख्यमंत्री म्हणून एकेकाळी विराजमान असलेल्या घरातल्याच शिवाजीराव यांचा राजकीय ‘ अफजल खान ‘ करतो त्यांचा राजकीय कोथळा बाहेर काढून ज्यांच्या नेतृत्वाचा कायमस्वरूपी काटा काढतो, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना राजकारणातून कायमचे नेस्तनाबुत करतो ते तरुण नेते, भाजपाचे संभाजी रस्त्यात आडवे येणाऱ्या कोणत्याही नेत्याचे अगदी ठरवून ‘ यशवंतराव चव्हाण ‘ करून मराठवाड्यातले किंवा भाजपामधले आधुनिक शरद पवार म्हणून कारकीर्द गाजवून सोडतात, त्यांचा हा राजकीय इतिहास यापुढे कायम ध्यानात ठेवूनच राजकारणाशी संबंधित त्यांच्या सभोवताली, स्पर्धेत असणाऱ्या अभिमन्यू पवारांसारख्या पॉवरफुल नेत्यांनी स्पर्धकांनी ध्यानात ठेवायलाच पाहिजे, समोरचा नेता मग तो थेट विलासराव देशमुखांच्या किंवा निलंगेकरांच्या जरी घराण्यातला घरातला असला तरी एकदा का संभाजी यांची सटकली कि आजोबा असोत का सख्खी मावशी, थेट घरचा रस्ता दाखवून मोकळे होतात…


मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे राजकीय महत्वाकांक्षी आहेत ते मंत्री आहेत पुढे त्यांना त्यांच्या घरातल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर किंवा त्यांच्या लातूर जिल्ह्यातल्या दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे, त्यांना मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आहे त्यासाठी त्यांना लातूर जिल्ह्यात नेतृत्वात नंबर वनवर यायचे आहे आणि हे करतांना समोरचा मग कोणीही असो, थेट देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात अभिमन्यू पवार जरी असलेत तरी संभाजी प्रसंगी अशा प्रभावी नेत्याला देखील पुरून उरतात, अभिमन्यू पवार यांची खडान्खडा माहिती जर आजही याक्षणी हवी असेल तर एकटे संभाजी पाटील निलंगेकर त्यासाठी पुरेसे आहेत. आर्थिक देउष्टया मंत्री झाल्यापासून त्यांनी सारे सुविचार बाजूला ठेवल्याने ते किंवा त्यांचे धाकले बंधू अरविंद, यापुढे थेट अमित देशमुख यांना सुद्धा एक दिवस सांगून मोकळे होतील कि आम्हीही श्रीमंत आहोत. लातूरमधून विधान सभा लढविण्याची तयारी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यकाला, भाजपा घराण्यातून आलेल्या अभिमन्यू पवार यांना, मला खात्री आहे, सर्वाधिक राजकीय दडपण असते ते फक्त आणि फक्त संभाजी पाटील निलंगेकर यांचे, हे निलंगेकर प्रसंगी आजोबाचा राजकीय खात्मा करतांना अकबराच्या भूमिकेत शिरून भल्याभल्यांना नोव्हेअर करणारे, अभिमन्यू पवार त्यास्तव तुम्हला कायम दडपणाखाली वावरतांना दिसतात, प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पाळी टाळून गेलेल्या तरुणीसारखा, बघा, अभिमन्यू यांचा कायम सतत चिंताक्रांत चेहरा असतो….


आता अत्यंत महत्वाचा मुद्दा, लोकसभा निवडणुकीतला, नेमके संभाजी पाटील कसे आणि किती डेंजरस हे ठाऊक असतांना देखील लातूरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड गाफील राहिले, विशेष म्हणजे त्यांचे मतदार संघाकडे झालेले दुर्लक्ष कायम मुंबई आणि दिल्लीतले वास्तव्य किंवा त्यांनी संभाजी पाटलांवर चुकून ठेवल्या गेलेला अति विश्वासच त्यांना नडला आणि सावध संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांचे आर्थिक सल्लागार उद्योगपती नवश्रीमंत शृंगारे यांना भाजपाची थेट लोकसभेसाठी उमेदवारी मिळवून दिली. जेव्हा जग जिंकायचे असते जेव्हा लढाई लढून जिंकायची असते आणि थेट रणांगणात आपला ‘ अर्जुन ‘ होणार नाही याची काळजी घ्यायची असते जी संभाजी पाटील निलंगेकर कायम घेत आले आहेत त्यातून रस्त्यात आडवा येणारा स्पर्धक मग तो प्रसंगी उद्या सख्खा भाऊ जाती असला भाजपाचे नेते, घरातले किंवा सुनील गायकवाड असोत कि शिवाजीराव पाटील निलंगेकर किंवा अभिमन्यू पवार, समोरचा राजकारणातून कायमस्वरूपी संपविण्याचे मोठे कारस्थान संभाजी निलंगेकर घडवून आणतात आणि लातूरातल्या देशमुखांसारख्या राजकीयदृष्ट्या एस्टॅब्लिश घराण्याला देखील अडगळीत टाकून मोकळे होतात, त्यामुळेच मला अनेकदा भीती वाटते ती भाजपाशी अतिशय एकनिष्ठ असलेल्या आणि आमदार होऊ पाहणाऱ्या अभिमन्यू पवार यांची, आज मोठे होऊ पाहणारे किंवा मोठे झालेले थेट मुख्यमंत्र्यांचे जवळचे साथीदार अभिमन्यू पवार यांचा डायरेकट सुनील गायकवाड करायला वेळ आल्यानंतर निलंगेकर संधी घालविणाऱ्यातले नाहीत, लै डेंजर माणूस प्लस त्यांना यश देखील मिळते म्हणजे शृंगारे यांना निलंगेकर नक्की निवडून आणणार्यातले, राजकारणातली त्यानिमीत्ते एक पायरी वर चढून लोकसभेनंतर ते भाजपामधले मोठ्या पदाचे दावेदार कसे, त्यांच्या श्रेष्ठींना सांगून मोकळे होतील….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Comments 4

  1. Unknown says:

    संघर्ष काय असतो हे संभाजी पाटील निलंगेकरांकडे बघून शिकायला मिळतं . अगदी लहान वयात राजकारण सुरु केलेल्या या नेतृत्वात तेव्हा पासून आज पर्यंत जनसामान्यांना सोबतीला घेऊन चालण्याची क्षमता आम्ही बरेच दिवस पासून पाहत आलोय.
    संभाजी पाटील निलंगेकरांचे नेतृत्वगुण, संघटन कौशल्य ,मृदू व स्मित भाषी स्वभाव सर्वांना नेहमीच आदराचा वाटतो.

  2. Unknown says:

    संपूर्ण मराठवाड्याला मायभूमी मानून संघर्ष यात्रा करीत मार्गक्रमण करणारा नेता म्हणजे आमचे संभाजीदादा निलंगेकर पाटील …!!
    लातूर जिल्याची शान ..!!!

  3. Unknown says:

    नावीन्यपूर्ण उपक्रमांना सतत चालना देऊन अभिनव उपक्रम राबवणारा दूरदृष्टी ठेऊन विकास कामे करणारा नेता म्हणजे संभाजीभाऊ.

  4. Unknown says:

    विकासाच्या विमानाचा पायलट म्हणजे संभाजीदादा पाटील निलंगेकर.
    वयाच्या २५व्या वर्षी सक्रिय राजकारण सुरु करून राजकारणात स्वकतृत्वावर स्वतःला सिद्ध करणारा भला माणूस आमचा दादा संभाजी पाटील निलंगेकर.

Leave a Reply to Unknown Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *