भय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी

भय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी 

आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मातून शांती मिळेल, भडकलेली तरुण डोकी शांत करता येतील या उद्देशाने बहुजन समाजाने बुवा बाबा महाराज संत अध्यात्मिक गुरु सद्गुरू इत्यादी विविध रूपातून १९९० च्या दशकात अचानक उदयाला आलेल्या उदय उर्फ भय्यूजी देशमुख यांस सद्गुरूस्थानी स्वीकारले, भय्यू महाराजांना, या देखण्या तरुणाला बहुजन समाजाने त्याकाळी देव म्हणून डोक्यावर घेतले पण आज त्याच देवाने डोक्यावर मुतून ठेवले, भ्रमनिरास केला असे जो तो म्हणू लागला आहे. सर्वसामान्य बहुजन समाज भय्यू महाराजांच्या अतिनिकट आहे, ते महाराष्ट्राच्या कोणत्याही, कुठल्याही गावात असोत त्यांच्या सभोवताली बहुजन स्त्री पुरुषांचा विशेषतः तरुण वर्गाचा गराडा पडलेला असतो हे जेव्हा बहुजन समाजातल्या चतुर नेत्यांच्या लक्षात आले, पुढे सामान्य बहुजन दूर कुठेतरी उभे राहू लागले आणि चाणाक्ष नेत्यांनी भय्यू महाराजांना आता मस्त वापरून घेऊ केवळ या स्वार्थी हेतूने आधी हेरले मग घेरले, जेथे तेथे फक्त आणि फक्त पुढारी कंत्राटदार भ्रष्ट अधिकारी व्यापारी इत्यादी सामान्य बहुजनांना नकोसे झालेलेच नेमके त्यांच्या सभोवताली दिसायला लागले पण या बदमाशांचे बाप भय्यू महाराज आहेत, होते हे समजलेच नाही, त्यातून महाराजांना वापरून घ्यावयाच्या ऐवजी पुढे महाराजांनीच मीडियासहित साऱ्यांना वापरून घेतले. भय्यू महाराजांचे एक वैशीष्ट्य असे कि ज्या त्या प्रत्येक बड्या धेंडाला वाटते भय्यू महाराजांना त्याच्या एवढा जवळचा कोणीही नाही त्या जाळ्यात आमचे मीडियावाले देखील फसले आणि अडकले पण सांगणार कोणाला, शेवटी हळूहळू आम्ही मीडियावाले त्यांच्यापासून हाक ना बोंब, पद्धतीने दूर गेले, हात चोळत बसले. विश्वंभर चौधरी म्हणजे पोटतिडकीने सामाजिक व्रत घेतलेला या राज्यातला एक आदर्श पुरुष, ते देखील इतरांना जसे भय्यूमहाराज दत्त जयंतीला इंदोरला बोलावून आपले शक्ती प्रदर्शन दाखवतात, त्यांनाही तेथे बोलावून घेतले, पण रात्री जेव्हा कव्वालीच्या कार्यक्रमात लेडीज बार मध्ये जसे पैसे अंगावर उधळतात, भय्यू महाराजांसहित तेथे जमलेल्या मस्तवाल लोकांनी पैसे उधळायला सुरुवात केली, चौधरी यांनी कपाळावर हात मारून घेतला, आणि ज्याच्या त्याच्या बाबतीत नेमके हेच घडते, सुरुवातीला ज्याला त्याला काही काळ या भय्यू महाराजांची भुरळ पडते, मोठमोठ्या लोकोपयोगी योजना ऐकल्यात कि हे असे दिग्गज त्यांच्या काही काळ आणखी प्रेमात पडतात, नंतर जेव्हा भय्यू महाराज म्हणजे केवळ लिम्लेटची गोळी आहे, तोंडात असेपर्यंत छान वाटते नंतर काहीच नाही, त्यांच्या लक्षात येते, कोणतीही दैवी शक्ती त्यांच्यात नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते, वाईटपणा न घेता जो तो दिग्गज त्यानंतर महाराजांना फक्त हसून दाद देतो आणि दुरून गम्मत बघतो… 

तुम्हाला बहुजनांमधला सामान्य माणूस मनापासून कंटाळला आहे, हे जर महाराजांनी इतर रिकामे उद्योग सोडून बहुजनांच्या भ्रष्ट नेत्यांना, व्यापाऱ्यांना, कंत्राटदारांना, अधिकाऱ्यांना छान समजावून सांगितले असते आणि त्यातून अण्णा हजारेंच्या पावलावर पाऊल पद्धतीने त्यांनी निस्वार्थ समाजसेवा बहुजनांची केली असती तर भय्यू महाराज हे आधुनिक संत तुकडोजी किंवा गाडगे बाबा ठरले असते. स्वतःच स्वतःला राष्ट्रसंत बिरुदावली चिटकवून अमुक एखादा ‘ युवराष्ट्रसंत ‘  ठरला असता तर मी देखील माझे नाव बदलवून ‘ शरद पवार ‘ असे करवून घेतले असते. भय्यू महाराजांच्या लोकप्रियतेचा ग्राफ ज्या वेगाने खाली घसरला, या लग्नानंतर तरुण स्त्रिया मग त्या बहुजन असोत कि अन्य, भय्यू यांना देव मानायचे किंवा नाही यावर अतिशय गांभीर्याने विचार करतील त्यानंतर फारतर चवीपुरते बहुजनांचे दिग्गज भय्यूमहाराजांशी तेवढ्यापुरते भलेही मधुर संबंध ठेवतील पण पूर्वीचे ते किचन मध्ये थेट प्रवेश, असलेले स्थान यापुढे नक्कीच भय्यू महाराज गमावून बसतील, इतर बोलत नाहीत, मी स्पष्ट मत मांडून मोकळा होतो कारण माझा हा मित्र जेव्हा असा आपल्या चंचल स्वभावातून मिळालेले संतपद गमावून बसतोय, बघून वाईट वाटते, मिळालेले प्रचंड यश नको ते उद्योग करून भय्यू महाराज गमावून बसले आहेत अशावेळी मोहन भगवंतांसारख्या दिग्गजांनी नेमकी माहित घेऊन त्यांच्याकडे उठबैस करावी असे माझे मनापासून सांगणे आहे…

याबाबतीत अगदी मनापासून दाद द्यावी, मनापासून कौतुक करावे, मनातून शतश: आभार मानावेत, धन्यवाद द्यावेत ते त्या शरद पवार आणि अजित पवार यांचे, या दोघांच्या जवळ जाण्याचा भय्यू महाराज यांनी आटोकाट प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी कधी सुनील तटकरे तर कधी पवारांच्याच घरातल्या आपासाहेब पवारांच्या पुढल्या पिढीला वारंवार सांगण्यात आले कि शरदराव, अजितदादा यांनी देखील या बुवाला बहुजनांचा संत म्हणून डोक्यावर घ्यावे आणि गावभर आपल्या सांगे मिरवून आणावे, पण या राज्यात कोण किती पाण्यात हे ज्या पवारांना तंतोतंत ठाऊक असते, त्यांना भय्यू नेमके कसे इत्यंभूत लक्षात आले होते त्यामुळेच शरदराव त्यांच्यापासून चार हात कायम दूर होते आणि अजितदादा किंवा सुप्रिया या दोघांनीही तेच केले, भय्यू महाराज सोडून बोला, हे दोघेही सांगून मोकळे झाले…..

भय्यू महाराजांना काय वाटते आम्ही सारे च्यू आहोत कि ते सांगतील आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवून मोकळे होऊ. हे काय जाहीर लग्न समारंभ करण्याचे त्यांचे वय आहे, पन्नाशीला आलेल्या संत, सद्गुरू, युवराष्ट्रसंताने हे या पद्धतीने लग्न करायचे असते तेही तरणी सुस्वरूप पोटची पोरगी घरात असतांना वरून रोमँटिक फोटो टाकून, आम्ही वाट्टेल ते करू पण तुम्ही खपवून घ्या, त्यातून श्रीमान भय्यू कोणताही चांगला मेसेज या समाजात जात नाही उलट भय्यू म्हणजे तथाकथित संत आसाराम यांची कार्बन कॉपी आहे कि काय, लोक हि अशी चर्चा करून मोकळे होतात….

क्रमश :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *