समग्र तटकरे ३ : पत्रकार हेमंत जोशी

समग्र तटकरे ३ : पत्रकार हेमंत जोशी 

शरद पवारांचे कार्यकर्ते आणि माझी दोन्ही मुले, आम्हाला म्हणजे पवारांना राजकारणातून आणि मला पत्रकारितेतून निवृत्तच होऊ देत नाहीत, मग तरुण राहण्यासाठी तरुण दिसण्यासाठी तरुण असण्यासाठी तुम्ही आम्हाला तरुण म्हणण्यासाठी, आम्हाला काय काय करावे लागते या वयातही, उगाच त्यातून चावट अर्थ काढू नका, अहो, तरुण राहण्यासाठी आम्हाला औषधे गोळ्या घ्याव्या लागतात, पथ्यपाणी करावे लागते, नेमका आहार घ्यावा लागतो, सकाळी उठून बदामाचा शिरा खावा लागतो आणि रात्री झोपतांना कपाळाला झंडू बाम चोळून घ्यावा लागतो, हे मला म्हणायचे सांगायचे होते. उगाच गम्मत केली, माझी मुले अजून खूप नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी कर्तबगार निघालेत. मी तर नेहमीच सांगत आलो कि शारदरावांना राजकारणातून केव्हाच निवृत्त होता आले असते कारण अजित पवार त्यांच्याही दहापट पुढे होते पण ऐन मोक्याच्या वेळी अजितदादांनी काहीही गरज नसतांना माती खाल्ली मस्ती केली सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला त्यातून एवढेसे तोंड करून घेतले आणि कर्करोगानंतरही पित्याप्रमाणे असलेल्या शरद पवारांना कमला लावले ते आजतागायत…..

बघा आता जसे देशात तशी राज्यात अलिकडल्या सहा महिन्यात अचानक राजकीय वातावरण बदललेले आहे, जिएसटी आणि नोटबंदी हे दोन विषय भाजपच्या अंगलट आल्याने येथे राज्यातही मागल्या तीन चार वर्षात तुकड्यातुकड्यात विभागलेले मुस्लिम आणि बौद्ध मते जे मोठ्या प्रमाणावर मतदानाच्या दिवशी बाहेर पडतात ते पुन्हा एकगठ्ठा मतदान भाजपा विरोधात करू लागले असल्याने विशेषतः या राज्यातही भाजपासाठी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरलेला आहे, या राज्यात या एकगठ्ठा मतदानाचा मोठा फायदा काँग्रेस ला होऊ शकतो, त्याचा मोठा फटका आणि झटका राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना भाजपा युतीला देऊ शकतात, हि वस्तुस्थिती आहे. त्यादृष्टीने शरद पवार पुढल्या काही महिन्यात नक्कीच सुनील तटकरे यांना बदलून त्या जागी दिलीप वळसे पाटलांना आणून बसवतील अशी माझी माहिती आहे, त्यांच्या मनात जयंत पाटलांना देखील प्रदेशाध्यक्ष करायचे होते पण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने जयंत पाटलांनी अलीकडे काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, ते पवारांना रुचले नाही, आणि जयंत पाटलांनी ठेवलेल्या शर्ती आणि अटी भाजपा नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीसांना मान्य नसल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाचे भिजत घोंगडे ठेवण्यात आले. शिवाय जयंत पाटलांना शरद पवारांनी मोठ्या अपेक्षेने मुंबईचे पालक मंत्री केले होते, मुंबईत अगदी सहज शक्य असतांना जयंत पाटलांनी महापालिकेत आणि मुंबईत राष्ट्रवादी बळकट करण्यापेक्षा ते स्वतःचे विविध व्यवसाय मोठ्या खुबीने विविध मार्गांनी आणि मंत्री पदाचा वापर करून मोठे करण्यात गुंतले, त्यांच्या तिजोरीत त्यातून नक्कीच मोठी भर पडली पण त्यांचा पक्ष कमकुवत झाला आणि त्यांचे स्वतःचे कुटुंब देखील….

मंत्री असतांना ना जयंत पाटलांनी राज्यातले कार्यकर्ते त्यांना सहकार्य करून जोडले ना त्या सुनील तटकरेंनी, या दोघांना कधीही आर आर पाटील होता आले नाही, याउलट अजितदादा एवढे मिळवितात काय मग आपणही तेवढे मिळवू या स्वार्थी वृत्तीने ते जगले आणि शरद पवारांना या अशा दुसऱ्या फळीतल्या साऱ्याच खादाड मंडळींनी फसविले गंडविले बदनाम केले अडचणीत आणले, राज्याचेही मोठे नुकसान केले, अजित पवार एकटे जरी खमके असते करप्ट भ्रष्ट नसते तरी वेगळे चित्र आज दिसले असते कारण दुसऱ्या फळीतले सारेच्या सारे नेते या अजितदादांसमोर चळाचळा कापताना मी अनेकदा बघितले आहे, विशेष म्हणजे सुरुवातीला दादांची हि दादागिरी बघून शरद पवारांचे देखील उर अभिमानाने भरून यायचे पण हीच दादागिरी जेव्हा शारदरावांना देखील डोईजड ठरली त्यानंतर मात्र पवारांनी आपल्या या लाडक्या पुतण्यालाही जमिनीवर आणले, गप बैस तुझ्या गळ्याभोवतीचे फासे माझ्याच हातात आहेत हे अप्रत्यक्ष आणि खुबीने वेळोवेळी सांगून टाकले. थोडक्यात नको ते उद्योग करून म्हणजे अशा विचित्र विक्षिप्त वागण्यातून पुढे लवकरच अजितदादांनी स्वतःचा शोले मधला असरानी करून घेतला, माझा एकेकाळचा अतिशय आवडता नेता असा वाया गेल्याने निदान मला तरी खूप रडू आले होते….

मिस्टर सुनील तटकरे तुम्ही मंत्री असतांना रोहा विधानसभा किंवा रायगड , रत्नागिरी जिल्ह्यातले तेवढे मोजके कार्यकर्ते आणि नेते सोडून राज्यात इतरत्र राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी कसे कुठे किती कोणते कार्यकर्ते त्यांना सहकार्य करून जोडले, असा सवाल करून जर शरद पवारांनी त्यांना पुरावे मागितलेत तर हे तटकरे काठावर देखील पास होणार नाहीत हे खात्रीने सांगू शकतो. आणि रोह्याव्यतिरिक्त त्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी रस घेतला होता कि त्यांना वरचढ ठरू शकणारे भास्कर जाधव आणि शेकापचे जयंत पाटील नेतृत्वात वाढू देणे अडचणीचे होते म्हणून या दोन जिल्ह्यात मात्र कधी उदय सामंत यांना हाताशी धरून तर कधी जयंत पाटलांच्या घरात खानदानात फूट पाडून, भास्कर पाटलांना सतत अडचणीत आणून मंत्रिपद असेपर्यंत आपले महत्व तटकरे यांनी कधीही कमी होऊ दिले नाही, हि वस्तुस्थिती आहे आणि तटकरेंच्या मैत्रीच्या नादात अजित पवारांनी कार्यकर्ते राज्यभर जोडण्याची ताकद ठेवणारे भास्कर जाधव यांचे महत्व कमी करणे, आता तेच नेमके राष्ट्रवादीला अडचणीचे ठरले आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *