गायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी

गायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी 

नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे जलदगती महामार्ग उभा केला आणि बघता बघता पुण्याचा महाकाय महापालट झाला. दुर्लक्षित मराठवाडा आणि विदर्भाचे खऱ्या अर्थाने प्रगत पुणे करायचे असेल तर हे काम पुन्हा एखाद्या विदर्भवीरानेच हाती घेणे जरुरी होते, परमेश्वर कृपेने ते घडले गडकरी यांच्यानंतर राज्याचे लक्ष देवेंद्र फडणवीसांनी वेधून घेतले आणि त्यांनीही समृद्धीचे आव्हान स्वीकारले, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर आत्तापर्यंत समृद्धीचे काम जवळपास संपत देखील आले असते अर्थात या कामात आघाडीने विशेषतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी खोडा घातला असे अजिबात कोठेही घडले नाही याउलट त्यांनी समृद्धी महामार्ग काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आवश्यक ते फंड्स उपलब्ध करून दिले. समृद्धी चे आव्हान जसे फडणवीसांनी स्वीकारले त्याच ताकदीने हि जबाबदारी प्रशासकीय अधिकारी कामातला वाघ माणूस राधेश्याम मोपलवार यांनीही स्वीकारली. मी तर असे म्हणतो जोपर्यंत समृद्धी महामार्ग पूर्णतः दृष्टीक्षेपात येत नाही तोपर्यंत राधेश्याम मोपलवार आणि त्यांचे सहकारी बांधकाम खात्याचे सचिव अनिल गायकवाड या दोघांनाही तेथून हटवू हलवू नये. अर्थात गायकवाड मोपलवार या दोघांच्या कामाची ताकद मंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी अतिशय जवळून न्याहाळली आणि बघितली असल्याने ते उद्धवजींना चुकीचा निर्णय घेऊच देणार नाहीत आणि उद्धव ठाकरे देखील तशी चूक नक्की करणार नाहीत…

जसे समृद्धी चे काम गायकवाड आणि मोपलवार हि जोडगळी लीलया पूर्णत्वाकडे घेऊन जाईल तोच विश्वास मला जेव्हा याच अनिल गायकवाड यांनी दिल्लीत ज्या महाप्रचंड महाराष्ट्र सदनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली, तेव्हाही मी भुजबळांना तेच म्हणालो होतो जे मोपलवार यांना गायकवाड समृद्धी साठी त्यांच्याकडे रुजू झाले तेव्हा कि माझा हा अतिशय लाडका मेहनती बुद्धिमान दिलदार मितभाषी कवी मनाचा एकपाठी मित्र जे काम हाती घेतो ते तो लीलया पूर्ण करतो यशस्वी करूनच दाखवतो सांगितले होते ते तसेच भुजबळांना देखील मी म्हणालो होतो कारण जसे मी राधेश्याम मोपालवारांना चांगला मित्र आणि प्रगल्भ अधिकारी म्हणून त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या कारकिर्दीपासून जसे अगदी जवळून बघतो ओळखतो ते तसेच अनिल गायकवाडांना देखील मी एक मित्र म्हणून आणि यशस्वी अभियंता म्हणून ओळखतो बघतो, पुढे नेमके तेच घडले. शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे महाकाय स्वप्न म्हणजे दिल्लीतले महाराष्ट्र सदन उभे करण्यात गायकवाड यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. पण नको त्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध तयावेळी करण्यात आल्या आणि खऱ्या अर्थाने चोर सोडून त्यावेळी संन्याशाला सजा झाली, गायकवाडांना २०१५ मध्ये लाचलुचपत खात्याने कुठल्याशा प्रकरणी अडकवले, खरे दोषी सहीसलामत दूर राहिले आणि गायकवाड यांना काही काळ निलंबित करण्यात आले…


www.vikrantjoshi.com

अगदी अलीकडे अनिलकुमार गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष म्हणून सिद्ध केले आहे हे एका अर्थाने चांगले घडले पण सार्वजनिक बांधकाम खात्यातील जो मुख्य अभियंता या राज्याचा केव्हाच सचिव म्हणून नावारूपाला आला असता त्या अनिलकुमार यांच्या आयुष्यातले तब्बल पाच वर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजविण्यात आणि नको ते अपमान सहन करण्यात गेले. देवाकडे देर आहे पण अंधेर नाही त्यामुळे खिशातला शेवटचा आणा संपेपर्यंत लोकांना अनेकांना हजारोंना मदत करणारा विशेष म्हणजे घरात राजकीय प्रभावी पार्शवभूमी असतांना देखील अन्यायग्रस्त ठरलेला हा कित्येकांचा दुवा मिळविणारा कलंदर शेवटी नेमका न्यायालयाने योग्य न्याय देऊन लोकांसमोर आणला. छगन भुजबळ यांचा बांधकाम मंत्री म्हणून कार्यकाळ आणि त्यांचा सर्वार्थाने गैरफायदा घेणारे मलाईवर ताव मारून मोकळे झाले कुठेही सापडले नाहीत पण अनिलकुमार गायकवाड बळीचा बकरा ठरले. त्यांनी मनात आणले असते तर न्यायालयापुढे खऱ्या दोषी मंडळींना ते उभे करू शकले असते पण येथेही ते मैत्रीला आणि अंगच्या दिलदार वृत्तीला जागले आणि पुढे पाच वर्षे अन्याय अपमान कोर्ट कचेऱ्या सहन करीत गेले. देवाने आणि न्यायालयाने त्यांना सच्चाईचे बक्षीस दिले आहे. गायकवाड आता लवकरच अधिकृतरीत्या राज्याचे बांधकाम खात्याचे सचिव म्हणून पुढल्या कामगिरीवर पुन्हा निघतील, रुजू होतील..

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *