गुलाब रुते सैनिकांना : पत्रकार हेमंत जोशी


गुलाब रुते सैनिकांना : पत्रकार हेमंत जोशी 
माहिजी किंवा चौफुल्याला जाऊन वेश्यागमन करण्यास हरकत नसते पण अमुक रांड माझी बायको आहे हे सांगणाऱ्याचे नक्की वाटोळे होते तद्वत राजकारणाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी लुटारू फसवा भामटा भ्रष्ट सुनील झंवर आमचा मित्र आहे हे सांगणे म्हणजे रांडेला अगदी उघड माझी बायको आहे हे सांगण्यासारखे. अर्थात असाही एक नेता याच जळगाव जिल्ह्यात मी बघितला आहे जो जिल्ह्याच्या गलिच्छ राजकारणात पडण्यापूर्वी पूर्वापार गर्भश्रीमंत होता आणि राजकारणात पडल्यानंतर मारवाडी असूनही तोट्यात घाट्यात आला आर्थिक अडचणीत सापडला, मनीष ईश्वरलाल जैन हेच ते महाशय ज्यांना कोठून अवदसा आठवली आणि एकनाथ खडसे यांच्याशी थेट पंगा घेऊन मनीषभाई निखिल खडसे विरोधात त्यांनी विधान परिषद लढवली, मनीष निवडून आले पण सूडाच्या राजकारणासाठी कुप्रसिद्ध असलेला हा जळगाव जिल्हा, पुढे खडसे यांनी मनीष यांना अनेक बाजूंनी अडचणीत आणून आर्थिकदृष्ट्या मोठे संकट त्यांच्यासमोर उभे केले अर्थात मनीष यांना त्यांच्या जामनेर च्या राजकीय विरोधकांविषयी म्हणजे गिरीश महाजन यांच्याविषयी किंवा अगदी एकनाथ खडसे यांच्याविषयी कोणताही राग नाही किंवा बदला घ्यावा असेही त्यांच्या मनात नाही, सध्या ते व्यवसायातले पूर्वीचे यश खेचून आणण्या मनापासून भिडले असल्याचे सतत जाणवते… 

जळगाव जिल्ह्यातले सर्वाधिक वाईट असे राजकीय चित्र कि ते दिवंगत मधुकरराव चौधरी असोत कि प्रतिभाताई पाटील, सुरेशदादा जैन असोत अथवा एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील किंवा गिरीश महाजन, सत्तेच्या राजकारणात यशस्वी होण्या तमाम नेत्यांनी या जिल्ह्यातील पार ओवाळून टाकलेल्या गुंडांना किंवा दलालांना जवळ केले, मोठे केले, त्यांना मानसन्मान दिला, विविध पदे वाटली त्यामुळे जिल्ह्यातली गुंड प्रवृत्ती व लुटारू वृत्ती वाढत गेली आणि सामान्य माणूस व सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र होते तेथेच राहिले, गुंड प्रवृत्तीचे तेवढे खूप मोठे झाले. जळगाव जिल्ह्यातले सर्वसामान्य दरवेळी नव्याने उदयाला आलेल्या नेत्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून होते पण त्यांच्या पदरी कायम निराशा पडली. जळगाव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ, ती झटकून टाकण्या आता हेच शिवसैनिक चिमणराव पाटील किंवा त्यांच्यापेक्षा नेतृत्वात अधिक सरस ठरू पाहणाऱ्या आमदार किशोर पाटील त्याहीपुढे जाऊन मुक्ताईनगर चे नवनिर्वाचित आमदार आणि शिवसेनेचेच चंद्रकांत पाटील यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेऊन आहेत. हेच ते चंद्रकांत पाटील ज्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधान सभा लढवली आणि थेट एकनाथ खडसे यांच्या कन्येला रोहिणीला पराभूत केले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा गुलाबराव पाटील यांच्या ऐवजी आमदार चंद्रकांत पाटलांच्या हाती सोपवावी अशी थेट मागणी जो तो शिवसैनिक करतो आहे अन्यथा पुढल्या काहीच महिन्यात जिल्ह्यातले विशेषत: मराठा समाजाचे शिवसैनिक आणि अन्य अनेक, एकनाथ खडसे राष्ट्रवादीकडे खेचून नेण्यात शंभर टक्के यशस्वी ठरतील… 

याच जिल्हयातले सुरेशदादा जैन, ईश्वरबाबू जैन, मनीष जैन, दिवंगत जे. टी. असे काही नेते असेही आहेत किंवा होते जे निर्व्यसनी होते व स्त्री कार्यकर्त्यांच्या बाबतीत सभयता पाळणारे सुसंस्कृत सेफ नेते म्हणून ओळखले गेले आहेत. गुलाबराव, तुम्ही छातीवर हात ठेवून या नेत्यांसारखे, आम्ही पण सदाचारी, हे सांगू शकता का किंवा माझ्यावरही सुसंस्कृत वागण्याच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांचे संस्कार आहेत, तुम्हाला हे भाषणातून सांगणे जमेल का? बघा कसे जमते ते. सुनील झंवर यांच्या घराशी घरोबा महत्वाचा कि लुटल्या गेलेल्या सर्वसामान्य लोकांच्या बाजूने तुम्ही कि तुम्ही देखील गिरीश महाजन यांच्याच पंक्तीला बसणारे, आता हि भूमिका तुम्ही उघड व्यक्त करणे अत्यंत महत्वाचे अन्यथा झंवर या नालायक दलालाला जवळ करणाऱ्या जिल्ह्यातल्या महानालायक नेत्यांच्या पंक्तीला एक तुम्हीही, हे दृश्य शिवसेनेला नक्की काळिमा फासणारे ठरेल, असे घडता कामा नये. हाच तो सुनील झंवर, एकदा मी गिरीश महाजन ते मंत्री असतांना त्यांना भेटण्या बंगल्यावर गेलो असता आणि आम्ही गप्पा मारण्यात दंग असतांना मध्येच कोलमडला आणि आमच्यात जसा सामील झाला, क्षणार्धात जेव्हा मी त्याला बाहेर जाण्यास सांगितले, बघून महाजन अवाक झाले. असले दलाल मंत्रालयात आसपास जरी दिसले तरी माझी सटकते मग ते दलाली करणारे हरामखोर पत्रकार असलेत तरी…. 

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *