पुन्हा एकवार आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी

पुन्हा एकवार आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी 

आशिष म्हणजे उत्साह आशिष म्हणजे मित्र आशिष म्हणजे धमाल आशिष म्हणजे गप्पागोष्टी आशिष म्हणजे मनमोकळेपणाने वागण्या बोलण्याचे ठिकाण आशिष म्हणजे उत्सव मग तो गणपतीचा असो कि नाताळचा साजरा करतांना जातीने मस्ती करणारा इगो पद सारे काही बाजूला ठेवून साऱ्यात मिसळणारा नेता. आशिषशी बोलतांना जो कमी पडला तो तेथल्या तेथे संपला कारण आशिष व्यवसायाने निष्णात वकील असल्याने भेटणाऱ्याला क्षणार्धात गप्प करणारे त्याच्या मनातले नेमके काय 


सुरु आहे ओळखणारे तरुण तडफदार उत्साही डॅशिंग धडाकेबाज नेते, त्यांना जेव्हा एखाद्याने भेटायचे असते तेव्हा भेटणाऱ्याने तयारीनिशी जायचे असते, नेमके काय घडले आहे किंवा नेमके काय काम आहे सांगायचे असते, म्हणजे आशिष शेलार भेटणाऱ्याची समस्या अडचण खालची मान वर न करता सोडवून मोकळे होतात, ते जरी भाजपाचे यशस्वी नेते असले तरी समस्या अडचण काम घेऊन येणार कोण आहे कुठल्या विचारांचा आहे कोणत्या जातींधर्माचा आहे असे काहीही न बघता भेटणार्या प्रत्येकाला आमच्या या कॉस्मोपॉलिटन मतदार संघात सहकार्य करून मोकळे होतात म्हणून ते समोर विरोधक कोणीही असला तरी शेलार निवडून येतात…


शेलारांच्या या विधान सभा निवडणुकीनिमित्ते एक आवाहन असे करावेसे वाटते कि विरोधकांच्या कोणत्याही प्रलोभनाला न भुलता, बळी न पडता अमुक एखादा विरोधी उमेदवार समजा भेटायला जरी आला तरी त्याला थेट सांगून मोकळे व्हा कि तुमचे ठरले आहे यावेळी तर उच्चांकाने आशिष शेलार यांना तुम्हाला निवडून आणायचे आहे. मतदारांनी स्वतःची किंमत ओळखली पाहिजे, आपले अमूल्य मत काही मतदार अमुक एखाद्या दूरदृष्टी नसलेल्या उमेदवाराच्या भूलथापांना भुलून देऊन मोकळे होतात. एक उमेदवार मत मागण्यासाठी एका बुजुर्ग वृद्ध व्यक्तीजवळ गेला आणि म्हणाला, बाबा,हे घ्या १००० रुपये आणि यावेळी मलाच मतदान करा. यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, बेटा, मला पैसे नकोत, तुला माझे मत हवे असेल तर एक काम कर, मला एक गाढव आणून दे. उमेदवाराला मत पाहिजे होते म्हणून तो गाढवाच्या शोधात निघाला…


www.vikrantjoshi.com


शोध घेऊनही त्याला २० हजार रुपयांच्या खाली कुठेही गाढव काही मिळाले नाही. तो त्या वृद्धाकडे माघारी फिरून आला नि म्हणाला, बाबा, गाढवाची किंमत तर खूप जास्त आहे. स्वस्तातील गाढव कुठेही मिळत नाही त्यामुळे मी आपल्याला गाढव देऊ शकत नाही. यावर तो वृद्ध व्यक्ती त्या चलाख उमेदवाराला म्हणाला, मला मत मागून माझी लाज काढू नका, गाढवापेक्षा माझी किंमत कमी करू नका. तुमच्या नजरेत हि १००० रुपये माझी किंमत गाढवापेक्षाही कमी आहे. जेव्हा गाढव २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत विकत मिळत नाही, मी तर एक माणूस आहे, मी का म्हणून स्वतःला एक हजार रुपयात विकून मोकळे व्हावे. मतदार मित्रहो, गाढवापेक्षाही आपली किंमत कमी करून स्वतःला क्षणिक मोहापायी विकू नका. आशिष शेलार हे योग्य उमेदवार आणि दमदार आमदार कसे हे ज्याला त्याला नेमके समजावून सांगा, पटवून द्या म्हणजे त्यांची प्रचार करतांना शक्ती आणि वेळ दोन्हीही वाचेल आणि आपल्याला तोग्य उमेदवार निवडून आणण्याचे समाधान मिळेल…


आशिष शेलार यांचा अख्खा विधानसभा मतदार संघ मुंबापुरीत अशा ठिकाणी वसलेला आहे जेथे जगातले कोणीही आले तरी त्याला या मतदारसंघातून एकदा तरी ये जा करणे आवश्यक ठरते. त्यामुळे छोट्या छोट्या कामातून हा मतदारसंघ देखणा सुशोभित सुंदर विलॊभनीय आकर्षक कसा दिसेल त्यावर डॅशिंग शेलार जातीने मतदारसंघाच्या अगदी छोट्या छोट्या कामात देखील स्थानिक नगरसेवकांच्या मदतीला धावून जातात. अगदी अलीकडे विशेषतः दौलत नगर परिसर जो वर्षानुवर्षे काहीसा सुशोभीकरणाच्या दृष्टीने दुर्लक्षित होता, शेलारांनी आमदार होताच त्या परिसरात विशेषतः पदपथ, कारंजे, बगीचे, इत्यादी ज्या पद्धतीने उभे केले त्यातून या परिसराचे संपूर्ण रूप पालटले आहे. आमच्या परिसरातल्या जुहू गार्डन सारख्या बगिच्यात तर पब्लिक प्रसंगी पैसे मोजून तिकीट काढून प्रवेश घेतात आणि सहलीचे नेहमीचे ठिकाण म्हणून त्याकडे बघतात. अत्यंत वर्दळीचा हा मतदारसंघ तरीही रहिवाशांना आणि जगातल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना सुखसोयी कशा पुरविल्या जातील याकडे हिंदुस्थानचा मोठा तिरंगा फडकाविणाऱ्या म्हणजे सौंदर्याची दृष्टी असलेल्या आशिष शेलारांचे कायम लक्ष असते…

क्रमश: हेमंत जोशी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *