अशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

अशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

जी माणसे सार्वजनिक जीवनात विशेषतः कुठल्याही ग्लॅमरस क्षेत्रात असतात त्यांनी आपण आत बाहेर जसे आहोत तसेच लोकांना सामोरे जावे असे माझे विशेषतः मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांना कायम सांगणे असते पण दुर्दैवाने तसे फारच कमी लोकांच्या बाबतीत हे घडते, मीडिया मध्ये काम करणाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा संपूर्णपणे वेगळा असतो. गिरीश कुबेर यांच्या बाबतीत नेमके तेच घडले किंवा कायम घडत आलेले आहे कि ते इकडले तिकडले लिखाण किंवा संदर्भ जसेच्या तसे उचलून लिखाण करतात थोडक्यात मराठी वाचकांना ते उल्लू बेवकूफ येडे समजतात आणि मोठमोठाली वाक्ये फेकून स्वतःची विनाकारण लाल करून घेतात पण कुबेर यांना हे कदाचित माहित नसावे कि मराठी माणसाचे जेवढे मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून अफाट वाचन असते हि अशी चांगली सवय इतर फार कमी भारतीयांना असते असे माझे ठाम मत आहे म्हणूनच जेवढे समृद्ध लिखाण मराठीतून होते तेवढी भाषा समृद्धी मला कधीही हिंदीत आढळली नाही म्हणून चुकूनही मी कधीही गिरीश कुबेर यांच्यासारखे इकडले तिकडले उचलून किंवा बघून लिखाण करत नाही किंवा ते करण्याचा आगाऊपणा कुठल्याही मान्यवर लेखक लेखिकेने करू नये. पानिपतकार विश्वास पाटील सकाळी सकाळी अनेकदा जुहू चौपाटीवर मला फिरतांना भेटले कि मी त्यांना गंमतीने म्हणतोही कि जेवढी समृद्धी तुमच्या लिखाणातून जाणवते तेवढी तुमच्याशी बोलतांना ते जाणवत नाही त्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्या सख्या भावाने त्यांच्यावर केलेले आरोप नकळत खरे वाटू लागतात…

येथे मला स्वतःची लाल करवून घ्यायची नाही पण माझा सर्वात मोठा नातू आर्यवीर जोशी जेमतेम १३ वर्षांचा आहे आता तो आठवीला गेला आहे पण तो तिसऱ्या इयत्तेत होता तेव्हापासून त्याला वेगवेगळ्या विषयांवर इंग्रजी भाषेतली पुस्तके वाचण्याची एवढी सवय आहे कि तो जेवतानाही हाती पुस्तक घेऊन वाचत असतो. आजतागायत त्याने शेकडो पुस्तके वाचून हातावेगळी केलेली आहेत आणि हि अशी पिढी बहुसंख्य मराठींच्या घरातून जन्माला येत असते, असल्याने कुबेर सारख्या मान्यताप्राप्त लेखक लेखिकांनी असला वाङ्मय चौर्य करण्याचा मुर्खपाणा करू नये. अशा चौर्य काम करणाऱ्यांना मराठी माणूस हलकट नजरेने मग कायम बघायला लागतो. काही मंडळी तर कुबेरांच्या पुढे असतात म्हणजे इतरांकडून पैसे मोजून लिहून घेतात आणि स्वतःच्या नावाने छापून मोकळे होतात. एका गुजराथी पत्रकाराला तोडके मोडके मराठी येत असतांनाही तो दरवर्षी नियमित मराठी भाषेतली पुस्तके लिहून मोकळा होत असे. शेवटी मी नेमका शोध घेतला असता आमच्यातलाच एक अत्यंत लोभी हलकट दलाल आणि पैशांना हपापलेला पत्रकार त्या गुजराथ्याला पैसे घेऊन अशी विविध राजकीय विषयांवर नेत्यांवर पुस्तके लिहून देत असे. याउलट त्या गुजराथी व्यक्तीने त्याच्या मातृभाषेतून अशी पुस्तके लिहून एखाद्या पत्रकाराने ती मराठीमध्ये अनुवादित केली असती तर अधिक दर्जेदार पुस्तके बाहेर आली असती कारण त्या मराठी पत्रकारापेक्षा अनुभवाने व

डोक्याने तो गुजराथी कितीतरी अधिक पटीने हुशार तल्लख आहे असे माझे आजही मत आहे… लिखाणाचे वैशिष्ट्य असे कि जो लेखक असतो तो जसे बोलतो तसेच लिहीत असतो, ज्या लेखकाचे बोलणे आणि लिहिणे पूर्णतः  भिन्न आहे किंवा असते खात्रीने सांगतो अशी मंडळी एकतर गिरीश कुबेर यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणारी असते किंवा दुसऱ्यांकडून लिहून घेणारी असते आणि पैसे मोजून दुसऱ्यांकडून लिहून घेणारे मान्यवर जागोजाग आढळतात किंबहुना मला अशी अनेक माणसे माहित आहेत. लहानपणी आमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने कधीतरी एखाद्या श्रीमंत घरातल्या मित्राचा शर्ट मी घालून गेलो कि बघणार्यांच्या ते लगेच लक्षात यायचे तसे या लिहून घेणाऱ्यांचे असते म्हणजे त्यांचे बोलणे आणि लिखाण यात एवढी तफावत असते कि वाटते एखाद्या उच्चविद्याविभूषित मान्यवराने थेट एड्स झालेल्या रांडेशी जणू लग्न केले आहे. प्रत्येक मान्यवर लेखकाची स्वतःची अशी स्वतंत्र भाषा असते उदाहरण द्यायचे झाल्यास समजा उद्या अनिल थत्ते यांनी एखाद्याला असे आपले लिखाण विकले तर हे लिखाण अमुक एखाद्या उचल्याचे नसून ती भाषा समृद्धी बघून हे लिखाण हमखास अनिल थत्ते यांचेच आहे हे क्षणार्धात लोकांच्या लक्षात येईल किंवा येते, चोरी मग ती कोणतीही असो, केव्हाही वाईट…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *