गदर्भ विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी

गदर्भ विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी 

विदर्भावर विदर्भाच्याच लोकांचे मतदारांचे प्रेम नाही अशी माझी अलीकडे खात्री पटलेली आहे. तुम्हाला हे माहित आहे किंवा नाही कि मी एकटा गेली कित्येक वर्षे लिखाणातून इतरांची आय बहीण घेत असतांना अतिशय हिमतीने विदर्भाची बाजू यासाठी घेत असतो कि माझा जन्म विदर्भातला आहे माझे जेमतेम शिक्षण विदर्भातच झाले आहे म्हणून विदर्भाच्या मातीशी बेईमानी करायची नाही मी अगदी सुरुवातीलाच ठरविलेले आहे. समोर साक्षात मृत्यू आला काय किंवा कोणताही हरामखोर गुंड तगडा नेता उभा राहिला काय, डगमगून जायचे नाही हेही मी ठरविलेले आहे. जात पात मी मानत  नाही जरी माझ्या ब्राम्हण या जातीचा मला अभिमान असला तरी, त्यामुळे समोरचा कोणत्याही जातींधर्माचा असला तरी अजिबात घाबरून पळून जायचे नाही हे देखील मी ठरविले आहे. विदर्भातल्या तमाम मंडळींना मी येथे यासाठी गदर्भ म्हटले आहे कि त्यांनी यावेळी विधान सभा निवडणुकीत शेण खाल्ले जे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांनी न खाता ते सारेच्या सारे शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले…

जसे यावेळी मशिदीतून त्यांच्या मतदारांना सांगितले गेले कि महाराष्ट्रात इस्लाम खतरेमे है, तसे यावेळी संघवाले स्वयंसेवक एकत्र आले नाही तर मुस्लिम मतदार एकत्र आले आणि आपले गट तट विसरून त्यांनी त्या त्या ठिकाणच्या आपापल्या उमेदवारांना अतिशय नियोजनपूर्वक निवडून आणले. उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाकडून उभा असेल पण मुस्लिम असेल तर त्यांनी आपले एकही मत फुटू न देता त्या त्या ठिकाणच्या मुस्लिम उमेदवाराला मतदान केले भरघोस मतांनी बहुसंख्यने निवडून आणले म्हणजे मराठवाड्यातून अब्दुल सत्तार थेट शिवसेनेतर्फे उभे होते, मोगलांसाठी शिवाजी महाराज जसे काफर होते तेच मुस्लिमांचे शिवसेनेच्या बाबतीत म्हणणे असते तरीही मुस्लिमांनी अब्दुल सत्तार यांना एक गठ्ठा मतदान केले निवडून आणले. कालपर्यंत अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे काँग्रेसी अब्दुलभाई तेथून बाहेर पडले आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आले तरीही निवडून आले कारण तेथील मुस्लिम मतदारांनी आमच्या विदर्भातल्या मतदारांसारखी घोडचूक केली नाही जी केलेली चूक आज फडणवीसांना भोगावी लागते आहे…

ज्या विदर्भ विकासासाठी शेतकऱ्यांसाठी सामान्य मतदारांसाठी जनतेसाठी देवेंद्र फडणवीस सतत पाच वर्षे झटत  होते त्या देवेंद्र फडणवीसांना आमदारांच्या रूपात विदर्भ मतदारांनी गिफ्ट देऊन युतीच्या  विशेषतः भाजपच्या उमेदवारांना निवडून आणून देवेंद्र फडणवीसांचीही मान उंचवायला हवी होती पण तसे अजिबात घडले नाही, जातीपातीच्या राजकारणात आजही अडकलेले वर्हाडी मतदार फडणवीसांचे भाजपचे उमेदवार पाडून मोकळे झाले त्यांनी केवळ विदर्भातले भाजपाचे उमेदवार पाडले नाही तर थेट नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरात देखील भाजपाला धोका दिला, भाजपाचे उमेदवार पराभूत केले आणि जे निवडून आले तेही काठावर जेमतेम मतांनी निवडून आले. ज्या नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीसांनी राज्यात देशात नेतृत्व करतांना अगदी उघड कायम विदर्भाची बाजू घेतली आणि आपल्यावर कायम दादागिरी करणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या तगड्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांना जेरीस आणले, मुख्यमंत्रीपद आणि विविध मोठमोठ्या विकासाच्या योजना अक्षरश: खेचून आणल्या त्या फडणवीसांच्या किंवा गडकरींच्या मागे आम्ही वर्हाडी मतदारांनी उभे न राहणे म्हणजे बेईमानी करणे आणि गाढवासारखे वागणे आहे असे मी येथे जाहीरपणे सांगतो आहे. जसे राज्यातले मुस्लिम एकत्र आले तसे जर फडणवीसांसाठी  वर्हाडी मतदार एकत्र आले असते तर आज जी विदर्भाला फडणवीसांना मान खाली घालावी लागते आहे तसे अजिबात घडले नसते…

क्रमश: हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *