तटकरे आणि फटकारे : पत्रकार हेमंत जोशी

तटकरे आणि फटकारे : पत्रकार हेमंत जोशी 

जे गणेश नाईकांच्या, मोहिते पाटलांच्या, सातारातल्या भोसलेंच्या, नागपुरात अनिल आणि रणजित देशमुखांच्या, लोढा कुटुंबात, महाजनांच्या, मुंडेंच्या, ईश्वरलाल जैन सारख्या कित्येकांच्या घरी घडले ते रोह्यातल्या तटकरेंच्या घरी घडायला नको होते, राम लक्ष्मणासारखी जोडी फुटली कि पुढले नुकसान मोठे होते मोठे असते. घरातली उभी फूट म्हणजे भावाभावातली भांडणे किंवा त्यांच्यातले वितुष्ट त्यांना एकमेकांना अतिशय हानिकारक असते. दोन ताकदी दोन भागात विभागल्या गेल्या कि एका काडीचे जसे पटकन दोन तुकडे करता येतात ते तसे त्यांच्या बाबतीत घडते. तेच काड्यांच्या एकत्र गठ्ठयाला मात्र तोडणे इतरांना किंवा कोणालाही तेवढे सोपे नसते. आता तटकरेंच्या घरातले काम त्यांच्या विरोधकांसाठी सोपे झाले कारण वरकरणी जरी आता याक्षणी दिसत नसले तरी मी जे स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आहे आणि स्वतःच्या कानांनी ऐकले आहे, अलिकडल्या काही दिवसात बघितले आहे, एवढेच सांगतो, तटकरे बंधूंचे आपापसात फाटले आहे, अनिकेतच्या म्हणजे सुनील तटकरे यांच्या मुलाच्या विधान परिषद निवडणुकीनिमित्ते अनिल सुनील यांचे आधीच दुरावलेले संबंध आता अधिक फाटले आहेत म्हणून वाईट वाटले आहे….


यात अनिल आणि सुनील या दोघांचेही चुकलेले आहे विशेष म्हणजे अनिल तटकरे यांनी न फाटण्या थोडे मन मोठे केले असते तर अधिक बरे झाले असते पण दुर्दैवाने ते घडले नाही. सुनील यांच्या अनिकेत पेक्षा अनिल यांचा अवधूत राजकीयदृष्ट्या अधिक बलवान आणि बळकट आहे यात शंका नाही त्यामुळे अवधूत किंवा मलाच विधान परिषदेला पुन्हा एकदा संधी द्या असा आग्रह धरणार्या अनिल तटकरे यांनी जर थोडे मन मोठे ठेवून राजकारणात प्रसंगी राजकारणात बहिणीपेक्षा देखील अधिक  कमजोर कमकुवत असलेल्या अनिकेतला घट्ट जवळ घेऊन अवधूत सारखी माया दिली असती तर अधिक बरे झाले असते कारण अवधूत हा जर सुनील तटकरे सतत पाठीशी असतील तर तटकरे घराण्यातल्या संभाजी आहे किंवा अनिल यांचे धाकले चिरंजीव संदीप देखील तसे वस्ताद आहेत किंवा अवधूत पेक्षा कमी कमी नाहीत अर्थात सध्या तरी संदीप व्यवसायात व्यस्त असल्याने, शैक्षणिक संस्था सांभाळत असल्याने त्यांचे येथे राजकारणात नावही घेणे तसे चुकीचे ठरेल त्यामुळे अनिल किंवा अवधूत यांचे राजकीय पुनर्वसन करणे तसे सुनील तटकरे यांना फारसे कठीण नसते त्यामुळे अनिल तटकरे यांनी अद्यापही फारसे न तुटलेले संबंध पुन्हा घट्ट करावे आणि जुळलेल्या तारांचे प्रदर्शन त्यांनी अगदी जाहीर करावे, तटकरे बंधू यांच्यात वैमनस्य आलेले नाही किंवा फूट पडलेली नाही हे जर सर्वत्र दिसले तर विरोधक नक्की अस्वस्थ होतील आणि घाबरूनही जातील कारण अनिल यांचे धाडस आणि सुनील यांचे राजकारणातले अति सुपीक डोके एकत्र असले रे असले कि विरोधकांचे ते मोठे नुकसान असते. पण सुनील यांची साथ नसेल तर अनिल यांची ताकद भडकलेल्या हत्ती सारखी असेल म्हणजे ते कोठेही उभे राहतील आणि स्वतःचे माथे आपटून घेऊन राजकीय नुकसान करवून घेतील…


एकच उदाहरण देतो त्या नारायण राणे यांचे. सध्या राणे भाजपामध्ये आहेत, आत्ता आत्ता कुठे ते या पक्षात पकड घेऊ लागलेले असतांना तिकडे कोकणात सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्ते काय घडले ते उघड आहे. मागला पुढला कोणताही विचार न करता, प्रसंगी संभाव्य राजकीय नुकसानीचा विचार न करता भाजपच्या नारायण राणे यांनी थेट उघड जाहीर पाठिंबा ते अनिकेतला देऊन ते मोकळे झालेले आहेत आणि हे सुनील तटकरे यांचे कसब आहे, ते काहीही करू शकतात. फक्त आणि फक्त सुनील तटकरे यांच्या अंगवळणी पडलेल्या पटवापटवीच्या स्वभावामुळे हे घडलेले आहे. पटवापटवीत सुनील एवढे तरबेज आहेत कि त्यांना जर अमुक एखादी निवडणूक लढविताना पाकिस्थांच्या अध्यक्षांची जरी प्रचारासाठी गरज पडली तरी ते त्यात यश मिळवून मोकळे होतील…


समजा उद्या जर साठीच्या सुनील तटकरे यांच्या हृदयात बसली किंवा मनात आले कि त्यांना त्यांच्या या उतारवयातले तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आलीया भट सोबतीने राहणे अधिक चांगले ठरेल, माझे वाक्य लक्षात ठेवा, सुनील तटकरे यांना एकांतात फक्त पंधरा मिनिटे आलिया संगे द्या, त्यांच्यासंगे आलिया आली नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका काहीही म्हणा वाटल्यास अश्लील म्हणा किंवा राजेश शृंगारपुरे, रेशम टिपणीस म्हटले तरी चालेल. पुढे जाऊन सांगतो, अनिल आणि सुनील यांचे संबंध या विधान परिषद निवडणुकीनिमित्ते बिघडू नयेत किंवा पूर्वीसारखे सुमधुर व्हावेत राहावेत यासाठी दस्तुरखुद्द नारायण राणे यांनी वडीलकीच्या भूमिका घेतलेली आहे आणि त्याचेच बक्षीस म्हणून २७ मे राजी नारायण राणे यांच्या एका मोठ्या स्वप्नवत उदघाटन सोहळ्याला भाजपाच्या या राज्यातल्या टॉपच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून थेट मंचावर शरद पवार देखील बसणार आहेत….


राणे यांचे समजावून सांगणे त्यातून हे नक्की घडलेले आहे निदान अनिकेतच्या विधान परिषद निवडणुकीत अनिल आणि अवधूत तटकरे जाहीर बापबेटे विरोधात गेले असे घडणार नाही पण तदनंतर मात्र अनिल सुनील पुढे किती एकत्र असतील हे तसे सांगणे अवघड आहे, दोघांनी म्हटल्यापेक्षा अनिल तटकरे यांनी यापुढे सुनील यांच्या संगे निदान राजकारणात तरी एकत्र न येण्याचे नक्की ठरविले असावे. जर उद्या अमुक एखादे महत्वाचे पद शरद पवारांनी अनिल तटकरे यांना पोटाशी धरून दिले तर अनिल यांचा राजकीय आत्मा काहीसा थंड शांत होईल अन्यथा पुढे सुनील यांची राजकारणातली डोकेदुखी वाढल्याचे तुम्हाला नक्की दिसेल, हे जे घडले ते घडायला नको होते. निदान या निवडणुकीत तरी शरद पवारांच्या साक्षीने अनिल यांनी थेट बारामतीला पवारांच्या घरी दिलेले वचन मोडू नये. पण अनिल थेट पवारांवरही नाराज असल्याने नारायण राणे यांना मध्यस्थी करावी लागलेली आहे….

तूर्त एवढेच!!


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *