अण्णा सामंत : पत्रकार हेमंत जोशी

अण्णा सामंत : पत्रकार हेमंत जोशी 

अण्णा सामंत आणि अण्णा नायक दोघेही एकदम डेंजरस दोघेही दाट कोकणातले. रात्रीस खेळ चाले मधल्या अण्णांना बघून जशी भल्याभल्यांची फाटते ते तसेच पाली रत्नागिरीचे अण्णा सामंत, यांचाही वयाच्या पंचाहत्तरीनंतर देखील तोच धाक तसाच दरारा. भल्याभल्ल्यांची याही अण्णा सामंतांसमोर अण्णा नायकासारखी फाटते, अण्णा सामंत एकदम फटकळ पण तेवढेच प्रेमळ. त्यामुळे अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यत अण्णा सामंतांचा प्रचंड आदरयुक्त दरारा. त्याची दोन्ही मुले तसे त्यांच्या क्षेत्रात एकदम टगे पण चाळीशी उलटून गेलेली मुले अण्णा सामंतांसमोर मात्र आजही काही चुकीचे सांगायला किंवा बोलायला असलेल्या प्रेमापोटी आदरापोटी घाबरतात. अण्णा नायक हे पात्र खुनी आणि विकृत त्याच्या नेमके उलटे अण्णा सामंत ते विकृत तर कधीही नव्हते आणि जेथे पोटच्या दोन्ही मुलांना त्यांनी रागाने कधी चापटी मारली नाही तेथे खुनाखुनी कोसो दूर. एक मात्र शंभर टक्के खरे आहे कि अण्णा सामंत यांचा आजही या वयातही प्रचंड धाक आणि दरारा आहे कारण या वृद्धावस्थेत देखील ते स्वतः थांबायला थकायला तयार नाहीत, सतत आजही कार्यव्यस्त त्यामुळे त्यांना भेटणाऱ्यांकडून देखील नेमके काम नेमके उत्तर त्यांना हवे असते…

अण्णा उर्फ रवींद्र सामंत हे रत्नागिरीतले, यशस्वी कंत्राटदार बांधकाम व्यावसायिक किरण सामंत व शिक्षण मंत्री उदय सामंत या दोघा दिग्गजांचे पिताश्री. उदय सामंत हे खासदार विनायक राऊत यांचे प्रचंड विश्वासू आणि उजवे हात त्यामुळे राऊतांचे मतदार हमखास सांगतात आम्हाला कायम वाटते जणू आम्हाला एकाच लोकसभा मतदार संघांत दोन दोन खासदार मिळालेले आहेत तोच बोलबाला तेच बोलणे अण्णा सामंत, किरण सामंत आणि उदय सामंत या तिघांच्याही बाबतीत. हे तिघेही स्वतःचे

व्यवसाय कामधंदे सोडून ज्यापद्धतीने जनताभिमुख झाले आहेत जो तो म्हणून तेच सांगत सुटलाय, आम्हाला एक नव्हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकाचवेळी तीन तीन आमदार लाभले आहेत. अण्णा उर्फ रवींद्र सामंत, किरण सामंत आणि उदय सामंत हे तिघे एकाचवेळी एकाच मतदार संघात आमदार असल्यासारखे रत्नागिरीकरांना फील येते. हे तर पुराणातल्या महाभारतातल्या द्रौपदीसारखे झाले आहे ऐकून वाटत राहते….

हे माझ्या एकट्याचे यश आहे असे उदय सामंत स्वप्नातही म्हणणे अशक्य कारण सतत चार टर्म त्यांची आमदारकी, आणि तीन वेळा नामदारकी. हे प्रचंड यश नक्की माझ्या एकट्याचे नाही, मी किरण भैय्या आणि अण्णा एकत्र आहोत, एकमेकांच्या घट्ट हातात हात घेऊन आहोत म्हणून सतत मी आमदार आहे आज नामदार आहे यशस्वी नेता आहे, उदय ज्यालात्याला प्रत्येकाला हे हमखास सांगत सुटतात असतात. मित्रांनो, या घराला त्या तटकरे मुंडे यांच्या घरासारखी घराण्यासारखी दृष्ट न लागो. जसे तटकरे घराणे एकमेकांवर आज सूड उगवायला आसूड ओढायला उत्सुक अधीर असते ते कधीही सामंतांकडे न घडो. एकत्र यशाची चव चाखण्यासारखी असते, थोडेफार वाद होत असतात पण भूमिका निस्वार्थी असली कि घराण्याचा तटकरे होत नाही. एक गम्मत सांगतो, मला वाटायचे ज्या एका मुद्द्यावर उदय सामंत यांच्याशी कधीतरी प्रेमातून वादावादी होते तो मी एकमेव असावा पण असे काही नाही. जी तक्रार माझी नेमकी तीच तक्रार किरण सामंत यांचीही म्हणजे जेव्हा नेमके एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर अनेकांना आम्हाला उदय यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलायचे असते तेव्हा ते तो हाती घेऊन त्यावेळी बोलतील, अजिबात शाश्वती नसते आणि जे किरण सारख्या अति महत्वाच्या घरातल्या व्यक्तीच्या बाबतीत घडते ते तुमच्या आमच्या बाबतीत घडणे सहज शक्य आहे आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे अनेकदा उदय सामंत यांची अवस्था एकाचवेळी पाच पाच पिल्लांना जन्म देणाऱ्या फिमेल प्राण्यासारखी असते, त्यांना एकाचवेळी अनेकांनी असेकाही घेरलेले असते कि अशावेळी उदय सारेकाही विसरतात आणि त्या घोळक्यातले एक असतात आणि एकमेव असतात. जवळच्या अनेकांची अवस्था मात्र त्यांच्याबातीत सहन होत नाही आणि सांगताही येत नाही…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *