गोंधळात गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी

गोंधळात गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी 

सतत बसता उठता राज्याच्या राजकारणात नाक खुपसून बसलेले आमच्यातले प्रदीर्घ अनुभवी पत्रकार देखील सध्या पार गोंधळले आहे, लोकांची मानसिक अवस्था अचानक बदललेल्या राजकीय घडामोडी आणि समीकरणांमुळे जत्रेत हरविलेल्या लहान मुलासारखी झालेली आहे, हसावे कि रडावे हेच नेमके कोणालाही कळत नसल्याने अननुभवी जोडप्याचा जसा मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडतो आणि त्यांच्या कडून भलतेच घडते ती तशी अवस्था सतत राजकीय वलयात गुरफटलेल्या मंडळींची देखील झालेली असतांना सामान्य माणसांनी तर बदललेल्या राजकीय गोंधळाकडे निदान आणखी काही महिने पाठ

फिरवावी, आपापल्या उद्योग व्यवसाय नोकरीत लक्ष घालून जणू आपण या राज्यातलेच नाही या भूमिकेत शिरावे. मला खात्री आहे कधी नव्हे जी अस्थिरता या राज्यातल्या तमाम मंडळींना सतावते आहे ते वातावरण जानेवारी अखेरीस नक्की स्थिरतेकडे किंवा नेमके भविष्यात काय वाढून ठेवले आहे त्याकडे झुकलेले असेल…

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सुरुवातीला काही दिवस अनेकांनी त्यांना अंडरएस्टीमेट केले त्यातून त्यांना हिणविलें होते चिडविलेही होते पण फडणवीस नेमके कसे त्यावर लगेच आपले मत बनवू नका प्रकट करू नका असे त्याही वेळा मी ज्याला त्याला सांगत होतो  ज्यांनी ऐकले ते मजेत राहिले ज्यांनी त्यांना अंडरएस्टीमेट केले त्यांचे पुढे कसे वांधे झाले हा इतिहास ताजा असतांना अलीकडे पुन्हा नेमके तेच उद्धव ठाकरे यांच्याही बाबतीत घडते आहे, त्यांनाही अनेकांकडून अंडरएस्टीमेट केल्या जाते आहे, यांना काय समजते त्या मंत्रालयातले पद्धतीने त्यांच्याविषयी बोलल्या जाते आहे आणि हेही नेमके अतिशय चुकीचे आहे. नेमके मंत्रालय तेही मुख्यमंत्री या नात्याने त्यांना समजावून घेण्यास नक्की काळ जाणार आहे पण तो दिवस निदान मला तरी असे वाटते कि फार दूर नाही ज्यादिवशी उद्धव ठाकरे हे देखील मुख्यमंत्री यानात्याने वरचढ झालेले दिसतील. आणि त्यांची या पद्धतीने बदनामी, खुद्द उद्धव यांना हा प्रकार अजिबात नवीन नाही, जेव्हा त्यांनी वाटेतले सारे स्पर्धक  अत्यंत खुबीने बाजूला सारत शिवसेनेत पहिल्या क्रमांकाढे स्थान मिळविले तेव्हा देखील आजच्या पेक्षा कितीतरी अधिक असेच निगेटिव्ह बोलले जात असे…

लहानपणी शाळेतल्या ज्या मुलीस आपण सर्वाधिक वेंधळी बावळट म्हणून बघत असू पुढे लग्न व्हावे तर तिच्याशीच असे जे आपल्याला वाटते तसे उद्धव यांच्या बाबतीत तुमचे होईल याची खात्री वाटते. अर्थात शिवसेना प्रमुख म्हणून जे चालून जात होते ते तसे त्यांना मुख्यमंत्री या नात्याने वागून चालणार नाही, सर्वसामान्य जनता आणि भेटायला येणारे विविध थरातले मान्यवर इत्यादी जेव्हा केव्हा ठाकरे यांना भेटण्यास उत्सुक असतील नि नेहमीप्रमाणे जर त्यांच्या सभोवताली काही टगे वेटोळे करून बसतील तर मात्र उद्धवजींची लोकप्रियता देखील ओसरू शकते, असे त्यांनी वागू नये. केवळ सुरक्षतेच्या नावाखाली जर त्यांचे दर्शन दुर्लभ होणार असेल तर मतदार अतिशय शार्प असतो तो मग त्यांचा देखील गणपती बाप्पा मोरया करून मोकळा होईल. जी मोठी चूक एकेकाळी मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण यांनीं केली म्हणजे विटाळशी बाईसारखे ते त्याकाळी जसे अनेकांपासून दूर होते ते तसे उद्धव यांच्या बाबतीत जरासे देखील घडता काम नये. अतिशय उत्तम  मुख्यमंत्री आणि प्रशासक असूनही पृथ्वीराज लोकप्रिय नेत्यांच्या रांगेत स्थान निर्मण करू शकले नाहीत कारण त्यांचे दर्शन भल्याभल्यांना बहुतेकांना दुर्लभ होते. शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्धव यांना डोळ्यात तेल घालून चांगली माणसे सभोताली उभी करावी लागणार आहेत. सम्पर्काच्या बाबतीत त्यांना शरद पवार विलासराव देशमुख बॅरिस्टर अंतुले देवेंद्र फडणवीस मनोहर जोशी नारायण राणे पद्धतीने नक्की वागावे लागणार आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *