फडणवीसांची प्रेयसी २ : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीसांची प्रेयसी २ : पत्रकार हेमंत जोशी 


एखाद्या नेत्याचे स्त्रीलंपट नसणे आणि निर्व्यसनी असणे समाजाला खूप काही देऊन जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यातलेच एक, ते सुसंस्कृत सुस्वभावी नेते असल्याने कुटुंबाला दिलेले दिवसभरातले काही क्षण व्यतिरिक्त ते सदासर्वकाळ अगदी ते राजकारणात उतरल्यापासून समाजाला देत आले आहेत, आता तर ते मुख्यमंत्री असल्याने खूप मोठा हातभार राज्याची प्रगती साधतांना होतो. मुख्यमंत्र्यांची प्रेयसी असे जे मी गमतीने म्हटले तो रोख अर्थातच मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर होता, हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही असे मला वाटते. फारतर असे म्हणता येईल, शेट्टींची प्रेयसी माननीय मुख्यमंत्र्यांनी पळविली त्यातून राजू शेट्टी यांचा सुनील शेट्टी झाला, हि वस्तुस्थिती आहे आणि हि पळवापळवी राजकारणात नेत्यांकडून अनेकदा घडलेली आहे, सांगलीच्या बापूंची प्रेयसी दादांनी पळविली, हा इतिहास तर मराठींना तोंडपाठ आहे किंवा आघाडी सत्तेत असतांना साताऱ्यातल्या दादाची प्रेयसी बारामतीच्या दादाने पळविल्यानंतर त्या दोन दादांमध्ये आलेले वितुष्ट आजही कायम आहे. फडणवीसांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, सभोवतालची माणसे निवडतांना भावनेच्या आहारी त्यांची अनेकदा चूक होते असे मला वाटते, भविष्यात हि अशी चुकीची निवडलेली माणसे, नेतेच त्यांना डोकेदुखी ठरतील असे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या अनेकांना वाटते. सदाभाऊ खोत यांना जवळ करण्याचे काहीही एक कारण नव्हते, त्यांना मंत्री केल्याने राज्यातला शेतकरी वर्ग खूप खुश होईल असे अजिबात घडणारे नव्हते याउलट नेतृत्वाच्या बाबतीत अतिशय मर्यादा असलेल्या सदाभाऊ यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्री करून जे अवास्तव महत्व खोत यांना दिले, तेच दुःख राजू शेट्टी यांना अधिक तीव्रतेने झाले, त्यातून शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे करून शेतकऱ्यांच्या मनातून उतरत चाललेले राजू शेट्टी पुन्हा उगाचच मोठे झाले. खोत आणि शेट्टी दोघेही पुढल्या वर्षभरात संपले असते त्यांचा आपोआप भय्यू महाराज झाला असता पण घडले नेमके उलटे, मंत्री झाल्याने खोत यांचे महत्व वाढले आणि त्यांना मंत्री केल्याने दुखावलेले शेट्टी आंदोलनातून एकवार पुन्हा मोठे झाले, त्यांची लोकप्रियता नकळत फडणवीसांमुळे हि अशी वाढली…..

अर्थात असे मुख्यमंत्र्यांकडून अनेकदा घडते म्हणजे जे प्रवीण दरेकर त्यांना ज्या शिवसेनेने घडविले मोठे केले वाढविले आर्थिक समृद्ध केले त्या शिवसेनेचे झाले नाहीत किंवा जे दरेकर शिवसेनेत असतांना एखाद्या धाकट्या भावासारखे त्याकाळी सेनानेते असलेल्या राज ठाकरेंनी प्रेम केले त्या राज यांच्यासंगे मनसेत टिकले नाहीत ते आतून विनोद तावडे गटाचे असलेले प्रवीण दरेकर एखाद्या कठीण प्रसंगी किंवा कायमस्वरूपी फडणवीस यांच्यासंगे किंवा भाजपामध्ये टिकतील असे कधीही होणार नाही, जेथे संधी तेथे आधी, हि त्यांची वृत्ती त्यातून सत्तेच्या माध्यमातून त्यांना आणखी आणखी मुंबई बँक लुटायची असल्याने, दरेकर उद्या फडणवीस यांना अडचणीचे ठरण्याचीच अधिक दाट शक्यता आहे, किंबहुना काल परवा लोकसत्तेच्या संजय बापटांनी दरेकर यांच्याविषयी जे बेकायदा दिले गेलेले कर्ज प्रकरण आहे, या अशा  भांगडीतूनच दरेकर यांना सत्तेच्या परिघात वावरणे जास्त सोयीचे असते. प्रवीण दरेकर यांनी एका बांधकाम आणि रस्ते विकासात असलेल्या कंपनीला दिलेले कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज, हे प्रकरण तसेही त्यांना नजीकच्या काळात अडचणीचे पुन्हा एकदा ठरणार आहे. जो बँक लुटतो तोच का अध्यक्ष केल्या जातो, डोके फुटायची वेळ येते नाही का….

सदाभाऊ खोत किंवा प्रवीण दरेकर इत्यादी संधीसाधू नेत्यांविषयी मनात फारसा राग नाही, वाईट देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वाटते कि नकळत त्यांच्या सभोवताली नको असणाऱ्या नेत्यांची गर्दी वाढली आहे, माणसे ओळखण्यात ते कधीकधी कमी पडतात असे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या अनेकांना वाटते. अलीकडे भाजपचे एक पदाधिकारी बोलण्याच्या ओघात तेच म्हणाले, कि मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्या नंतर मी आणि आमच्या भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार तमीळ सेल्वन ताटकळत बाहेर उभे होतो आणि ज्या प्रसाद लाड यांना भाजपाच्या तमीळ यांनी विधान सभा निवडणुकीत पराभूत केले होते ते लाड थेट दार ढकलून मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये सलाम घेत घुसले. हंस चुनेगा दाना दुनका कौवा मोती खायेगा, असे माननीय मुख्यमंत्र्यांकडून अजिबात घडता कामा नये. संधी साधू नेते क्षणिक जवळ येतात आणि लगेच दूर होतात, त्यांना सुरुवातीपासूनच त्यांची जागा दाखवणे योग्य ठरते, तामिळ सेल्वन आपला माणूस आहे, लाड किंवा दरेकर कायमस्वरूपी कधीही आपले होऊच शकत नाही आणि त्यांना मोठेपण दिल्याने भाजपाची राज्यात मुंबईत मोठी भरभराट होईल असे अजिबात नाही, हे असे व्यापारी वृत्तीचे संधीसाधू नेते तुमच्याकडे नसतांनाच भाजपा सत्तेत आलेली आहे आणि तसेही वरकरणी हि अशी माणसे आम्ही केवळ तुमचे, असा आभास निर्माण करीत असतात, त्यांना तसेही मनातून मिस्टर फडणवीस तुम्ही राजकारणातून संपावे आणि तावडेंसारखे त्यांचे मित्र तुमच्या गादीवर बसावेत असे वाटत असते, आपण मुख्यमंत्री आहेत, यंत्रणा कामाला लावून मी लिहिलेले कसे आणि कितपत सत्य आहे, नक्की जाणून घ्यावे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *