मी टू : पत्रकार हेमंत जोशी
दिवसभरात फक्त आणि फक्त टवाळक्या मग त्यात फेसबुक सर्फिंग, मित्रांना जमवून गप्पा गोष्टी, त्यांना उत्तम दर्जाची कॉफी पाजणे मधेच लहर आली कि बॅग उचलून एखाद्या देशात भटकून येणे असे आमचे टवाळखोर टाईमपास आयुष्य गेल्या कित्येक अनेक वर्षांपासून मागून पुढे सुरु आहे अर्थात जेवढ्या अधिक टवाळक्या तेवढे आमच्या धंद्यात म्हणजे पत्रकारितेत वृत्तपत्रात अधिक यश, त्यामुळे टवाळक्या करीत जगणे कंपलसरी झालेले आहे. पत्रकारिता म्हणजे वसा वगैरे शब्द उगाच वापरू नका, केव्हाच इतिहासजमा झाला हा वाक्प्रचार, एखादा दुसरा नाही म्हणायला सापडतो देखील पत्रकारितेचा वसा घेऊन फिरणारा पण ते प्रमाण अगदीच अत्यल्प बाकी आम्ही सारे मीडियावाले पक्के धंदेवाईक पण उत्तम अभिनयपटू म्हणजे उगाचच चेहऱ्यावर असे भाव जणू काही आम्ही टिळक आगरकरांचा वसा पुढे नेतोय…
अलीकडे मी टू च्या निमित्ताने संजय पाटील नामें फेसबुक फ्रेंड ने एक छान शायरी अपलोड केलेली आहे, मी टू वर एक शायर म्हणतो,
अकेले हम ही नहीं शामिल इस जुर्म में
नजरे जब मिली, मुस्कुराये तो तुम भी थे..
थोडक्यात “you too”
त्यावर माझ्या मित्राच्या मुलीने, फेस बुक फ्रेंड ने नागपूरच्या
अपूर्वा नानिवडेकरने फार सुंदर कमेंट पास केलेली आहे,
हम तो साफ दिल से मुस्कुराये थे वैसे,
तुमने समजा ऊसे न्योते जैसे…
गलती तो तुमने बस इतनी कर दी,
मेरी मुस्कान देख कर हद पार कर दी..
मला वाटते केवळ या दोन शायरींमध्ये मी टू चा नेमका अर्थ दडलेला आहे. मी टू चे वादळ जर असेच घोंगावत गेले तर भविष्यात न्याय देणारे अनेक न्यायधीश आणि तुरुंगात टाकणारे पोलीस यांच्यासहित स्वातंत्र्य पूर्वी काळात जसे जेल भरो आंदोलने केल्याने सारे तुरुंग तुडुंब भरायचे, ओसंडून वाहायचे तसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल म्हणजे असे एकही घर नसेल ज्या घरातला पुरुष तुरुंगात नसेल. थोडक्यात कोणतीही क्रांती वाईट नसते पण त्या क्रांतीतून आमच्या या देशात जी हात धुवून घेण्याची वाईट पद्धत रुळलेली आहे त्याची नेमकी खूप भीती वाटते आहे. जसे माहितीच्या अधिकाराचा चांगला उपयोग किती झाला हे नेमके सांगता येणार नाहीं पण चेहऱ्यावर देशभक्तीचा बुरखा पांघरून कित्येकांनी त्यातून प्रचंड आर्थिक
फायदे करवून घेतले, माहिती अधिकाराच्या भरवशावर जगणारे श्रीमंत झालेले असे जागोजागी कितीतरी माणसे मला तुम्हाला दाखवून देता येतील. आमच्यातले असे कितीतरी पत्रकार कि जे आधी माहितीच्या अधिकारात नेमकी माहिती मिळवितात त्यातली जुजबी माहिती छापून मोकळे होतात त्यानंतर हमखास तोडपाणी करून करोडो रुपये मिळवून मालामाल होतात…
जो दुरुपयोग माहितीच्या अधिकाराचा किंवा नोटा बंदीचा करून कित्येक नवश्रीमंत मालामाल झाले नेमके तेच मी टू चे होणार आहे कारण असे कितीतरी जोडपे किंवा स्त्रिया आहेत ज्यांचा श्रीमंत पुरुषांना आधी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने जाळ्यात ओढून नंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करणे किंवा आर्थिक लुबाडणूक करणे हा विशेषतः या पुण्या मुंबईत मोठा धंदा आहे. आता तर या धंद्याला तनुश्री प्रकरणातून बळकटी आल्याने अनेक पुरुषांचे त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होणार आहे पण ज्या पुरुषांनी विवाहानंतरही एखाद्या स्त्रीवर मनापासून प्रेम केलेले असेल तर अशांनी अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रेम मनापासून करणाऱ्या विशेषतः विवाहित स्त्री पुरुषांनी प्रेम करण्यापूर्वीच येणाऱ्या विविध अडचणींची संकटांची बदनामीची मानसिक तयारी करून ठेवणे गरजेचे असते, आपल्या या प्रेमप्रकरणातून भविष्यात आयुष्यात कोणती वादळे उभी राहणार आहेत आणि त्या संकटांना सामोरे जाण्याची आपल्यात हिम्मत आहे का याचा पुरेपूर बिचार करूनच स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या प्रेमात पडायचे असते..
नाकाने कांदे सोलण्याचा अधिकार गणपतराव देशमुखांसारख्या फार कमी नेत्यांना मुकेश अंबानी सारख्या फार कमी उद्योगपतींना अभय देशपांडे सारख्या फार कमी पत्रकारांना किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारख्या फार कमी शासकीय अधिकाऱ्यांना बहाल करण्यास हरकत नाही कारण इतर अनेक बहुसंख्य जवळपास सारेच मी टू प्रकरणी दोषी आहेत अडकलेले आहेत तुमच्या ते सहज लक्षात येईल. नाना पाटेकर प्रकरणातून हाऊसफुल ४ सोडणाऱ्या अभिनेता अक्षयकुमार सारख्या अभिनेत्यांनी तर अजिबात नाकाने कांदे सोलू नयेत, मी मागे एकदा त्यावर लिहिलेही होते कि माझ्या एका दिवंगत मित्राच्या देखण्या मुलीने झी च्या मालकांच्या खाजगी विमानाची एअर होस्टेसची नोकरी यासाठी सोडली होती कि त्या विमानाने वारंवार प्रवास करणारा अक्षयकुमार तिला कित्येकदा शारीरिक सुखाची मागणी करून मोकळा होत असे आणि हे प्रकरण अगदी अलीकडले आहे, फारसे जुने नाहीं, त्या मुलीची देवाला काळजी, आता ती एका मोठ्या विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून रुजू झालेली आहे. नाना पाटेकर असो अथवा अक्षयकुमार सारखे असे कितीतरी, केवळ चेहऱ्यावर सभयतेचे बुरखे पांघरून भागात नसते, आहोत तसे जसेच्या तसे समाजाला सांगून आधीच मोकळे व्हायचे असते म्हणजे अडचण होत नाही…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी