मराठवाड्यातले लायक नालायक १ : पत्रकार हेमंत जोशी
कुठे थांबायचे ज्यांना कळले त्यांचे घर सावरते, ज्यांना कळत नाही त्यांचे घर उध्वस्त होते. मामांनी आणि बाबांनी भरमसाठ संपत्ती मिळविलेली असतांना जर गरिबांच्या सर्वसामान्यांच्या खात्याची मंत्री म्हणून भाजपा या स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या पक्षाची या राज्याची तरुण महिला मंत्री आणि नेत्या म्हणून ग्रामविकास खात्यात पुढल्या पिढीने देखील धुडगूसच घालायचा ठरविला असेल वरून जात हे दादागिरीचे अस्त्र म्हणून वापरायचे ठरविलेलेच असेल तर पंकजा, तुम्ही मला माझ्या कुटुंब सदस्यासारख्या असे मानून हेच सांगतो कि वाममार्गाने मिळविलेले पैसे क्षणिक सुख देतात पण कायमचे दु:खी करूनच वर पाठवतात, त्यावर महाजन मुंडे कुटुंब हे उदाहरण बोलके आहे आणि पुरेसे आहे. मोठ्यांना लुटा पण गरिबांना सोडा, ज्यांना हे जमत नाही त्यांचा वक्त चांगला असू शकतो पण अंत नक्की वाईट असतो…
एक मूर्खपणा येथे नेहमीप्रमाणे करतो म्हणजे स्वस्तुती करतो, जेव्हा माझी व माझ्या पत्रकार लेकाची पत्रकारितेवर संपूर्ण पकड आली तेव्हा म्हणजे १०-१२ वर्षांपूर्वी मी त्याला विचारले कि देशासाठी राज्यासाठी लढायचे कि घरासाठी कमवत सुटायचे, कारण कामवायचेच असते तर दरदिवशी संध्याकाळी घरी येतांना आम्ही दोघे अगदी सहज ५० लाख रुपये घेऊन आलो असतो, प्रत्येक आठवड्याला अगदी सहज अडीच तीन कोटी रुपये कमावले असते कारण ज्याच्या हाती काठी लेखणी किंवा सत्ता ती त्याने एकदा का या राज्यात वाईट कामासाठी वापरायचे ठरविले कि पैसे मिळविणे फारच सोपे असते, गरिबांच्या तोंडचा घास काढून स्वतः पंचपक्वान्ने खाणे कठीण नसते. तो म्हणाला, लढूया, तुम्ही मिळविलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करूया मग तेच केले आता आमचे बरे चालले आहे आणि हो, एखाद्याने जबरदस्तीने साखर तोंडात घातली कि ती कडू लागत नाही म्हणजे दक्षिणा हाती पडलीच तर ती आम्ही फेकून देत नाही पण त्याचसाठी पत्रकारिता असे आमच्या हातून घडत नाही…
जे मागच्या पिढीने केले तेच जर नेत्यांची पुढलीही पिढी करणार असेल तर या देशाचे हे असे वाटोळे होणे थांबणे शक्य नाही. मिळविलेले वाममार्गाने पैसे नाही हो पचत, मराठवाड्यातलेच निवृत्त झालेले एक शासकीय का प्रशासकीय अधिकारी जे मला ठाऊक आहेत, या गृहस्थाने कधीही राज्याच्या भल्याचा विचार ते नोकरीत असतांना केलाच नाही, हुद्दा आणि जात या भरवशावर करोडो रुपये मिळविले आणि निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांची दलाली थांबलेलीच नाही पण त्यांनी या धामधुमीत कधी स्वतःच्या घराकडे लक्षच दिले नाही, बायको म्हणजे मुले जन्माला घालायची मशीन, त्यामुळे ४-५ मुले मुली जन्माला घातले पण त्यांना वेळ दिला नाही, संस्कार दिले नाहीत, मुले मुली तारुण्यात आले पण बेधुंद जगताहेत, मुलगा व्यसनी आहे, मुली लग्न करायला तयार नाहीत त्यातून नैराश्याने ग्रासलेल्या बायकोकडे आजही या करप्ट गृहस्थाला घरी वेळ द्यायला वेळ नाही, जेव्हा आपण शेवटच्या प्रवासाला निघतो तेव्हा आपले कसे चुकले कुठे चुकले हे आठवते पण तोवर वेळ निघून गेलेली असते…
www.vikrantjoshi.com
परभणी जिल्ह्यातले तीन दिग्गज नेते म्हणजे माजी मंत्री गणेश दुधगावकर त्यांचे भाचे-जावई माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर माझ्या चांगल्या परिचयाचे, आजही काठी न टेकवता जेव्हा केव्हा गणेश दुधगावकर मंत्रालयात भेटतात किंवा या वयातही एखाद्या लहान बालकासारखे रामप्रसाद बोर्डीकर दुडू दुडू पळतांना फिरतांना धावपळ करतांना न थकता भेटतात दिसतात कौतुक वाटते. आता बोर्डीकरांच्या पुढल्या पिढीला, ज्येष्ठ कन्येला म्हणजे मेघनासाकोरे बोर्डीकर यांना राज्याच्या राजकारणात मोठी झेप घ्यायची आहे, वडिलांची राजकीय परंपरा पुढे न्यायची चालवायची आहे. हरकत नाही, मात्र मेघनाने एक चांगले केले, आधी लग्न केले, नवरा मोठ्या हुद्द्यावर आहे पण डाऊन टू अर्थ आहे, मेघनाने सर्वप्रथम आपल्या मुलांना मोठे केले पण त्याचवेळी त्यांनी परभणीत देखील लक्ष ठेवले, सामाजिक सार्वजनिक भान राखले, राजकारण कमी समाजकारणाला अधिक प्राधान्य दिले आणि आपले स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले, बघूया मेघना नेमक्या कशा आहेत ते आणि मराठवाड्यातली इतरही काही, तरुण नेते…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी