अति म्हणून युतीची माती : पत्रकार हेमंत जोशी
एखाद्या हॉटेलचे असे असते कि तेथे केव्हाही जा, प्रचंड गर्दी असते, वाट पाहावी लागते. मग ग्राहक पर्याय शोधायला लागतात, येथे गर्दी आहे, या हॉटेलच्या तुलनेत दुसरे कोणते हॉटेल बरे, असा विचार करून ते दुसऱ्या हॉटेलचा पर्याय निर्माण करतात. दिसायला नेटनेटक्या पोरीच्या मागे लागणारी अनेक टाळकी असतात, हि मिळणे शक्य नाही मग आम्ही पुरुष पर्याय शोधतो. आणखी एक उदाहरण, बायको सोडून मैत्रीण पाळणारे अनेक, बहुतेक, पण पुढे पुढे होते काय आमच्यातल्या बहुतेकांना असे वाटायला लागते कि मैत्रिणीपेक्षा बायकोच बरी मग त्यांची पावले आपोआप घराकडे वळतात. आणि मैत्रिणींना देखील तेच वाटते कि मित्रापेक्षा नवराच सोयीस्कर, थोडक्यात वाट विसरलेल्या स्त्रिया देखील काही काळानंतर नवर्याकडे, घराकडे वळतात…
सध्या या राज्यातल्या कमांडेड आणि डिमाण्डेड शिवसेना भाजपा युतीकडे बघून मला हि उदाहरणे आठवलीत. जो उठतो तो एकतर शिवसेनेत जातो किंवा भाजपा मध्ये तरी, अर्थात भाजपाला देखण्या तरुणीसारखी अधिक डिमांड आहे. भाजपाचे मंत्रालयात दलाली करणाऱ्या विविध देखण्या तरुणींसारखे सध्या झालेले आहे. मंत्रालयात दलाली करणाऱ्या सुंदर आणि उफाड्या तरुणींना प्रचंड डिमांड आणि मागणी असते. अनेक अधिकारी आणि मंत्री मग या दलाली करणाऱ्या तरुणींचा बहुतेकवेळा फुटबॉल सारखा उपयोग करवून घेतांना नेहमीच दिसतात म्हणजे आपला कार्यभाग उरकल्यानंतर दुसऱ्याकडे हा चेंडू ढकलायचा असे त्यांच्यात सतत सऱ्हास सुरु असते. मंत्रालयात येणाऱ्या ज्या तरुणींनी आपले शरीर विकले नाही त्यांनाच काही अंशी राजकीय भवितव्य असते अन्यथा त्यांचे काही खरे नसते, थोडाफार पैसा त्यांना त्यातून मिळतो देखील पण असे वैभव कायम टिकणारे नसते, हेही मी जवळून बघत आलो आहे. विशेष म्हणजे मंत्रालयात स्वतःचे शरीर गहाण ठेवून कामे करवून घेणाऱ्या तरुणींच्या नवऱ्यांची पण त्यांना साथ असते…
विषय भरकटला. वर जी उदाहरणे दिलेली आहेत ती युतीसंदर्भात येथे सांगायची आहेत. अलीकडे या राज्यात आधी काँग्रेसशी किंवा काँग्रेस विचारांशी कित्येक पिढ्या सलगी ठेवणार्या अनेकांना बहुतेकांना अचानक शिवसेना, भाजपा किंवा युती आवडायला लागलेली आहे पण या नेत्यांचे हे बायको सोडून मैत्रिणीच्या प्रेमात क्षणिक पडलेल्या नवऱ्यासारखे आहे हे जर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अन्य सेना भाजपा नेत्यांच्या लक्षात आले नाही आणि वेळीच त्यांनी या येणाऱ्यांना निदान काही काळासाठी वेटिंग वर ठेवले नाही तर अचानक आलेली हि सूज म्हणजे पिळदार शरीर आहे असे समजून जे वर्षानुवर्षे जवळ आहेत त्यांना दूर करणे म्हणजे स्वतःच्या पायावर युती धोंडा मारून घेते आहे हेच शंभर टक्के माझे सत्य विधान आहे ज्याची नजीकच्या भविष्यात युतीच्या नेत्यांना खात्री पटल्याशिवाय राहणार नाही…
www.vikrantjoshi.com
अत्यंत महत्वाचे म्हणजे येऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीत सेना भाजपा आणि मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत हे उद्धवजी आणि माननीय मुख्यमंत्री या दोघांच्याही बोलण्यातून आणि देहबोलीतून ते सिद्ध झालेले आहे. पण गेल्या पाच वर्षात सेना, भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये आमदारकी लढविण्याची अनेक कित्येक नेत्यांनी तयारी केलेली असल्याने आणि तयारी केलेल्या प्रत्येक नेत्याला इच्छुकाला युतीला उमेदवारी देणे शक्य नसल्याने जमा झालेले पुन्हा एकवार मोठ्या संख्यने फुटून त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या राजकीय पार्टीला जवळ केल्यास मला
त्यात वावगे आणि आश्चर्य वाटणार नाही. त्यापेक्षा सेना किंवा भाजपाने त्यांच्याच पक्षातल्या इच्छुकांना ताकद दिली असती तर मैत्रिणीला सोडून पुन्हा बायकोकडे, या पद्धतीचे वातावरण युती मध्ये निर्माण झाले नसते…ज्यांना अजिबात चारित्र्य नाही, केवळ पैसे लुटायचे आणि आपला तेवढा मतदार संघ सांभाळून या राज्याला खड्ड्यात ढकलायचे या नीच हलकट थर्डग्रेड विचारांच्या नेत्यांना जवळ घेऊन प्रसंगी आपल्या पक्षात घेऊन त्यांचे जे लाड युतीने चालविले आहेत ती तात्पुरती सूज आहे ज्याचा फायदा पुन्हा एकवार बारीक नजर ठेवून असलेल्या शरद पवार यांनाच होणार आहे. बाहेरच्या काही भामट्या प्रस्थापितांना आपल्या पक्षात संधी देऊन येणाऱ्या विधान सभा निवडणुका एकहाती जिंकायच्या, २२० संख्याबळ कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे हे उद्धव आणि देवेंद्र यांचे स्वप्न या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरते कदाचित पूर्ण होईलही पण भामट्या प्रस्थापितांना बाहेरच्या नेत्यांना जवळ न करताही, युतीमध्ये त्यांना न घेता देखील मेरिटवर युतीला येणारी विधानसभा अगदी सहज जिंकता आली असती हि काळ्या दगडावरची रेघ आहे, तेच सत्य आहे…
जेव्हा एखादया निवडणुकीत होते तेव्हा युतीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाला त्यांच्यातल्या प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे अजिबात शक्य नसते, उमेदवारीच्या संख्येला मर्यादा आहेत, असतात, यावेळी तर इच्छुकांची फार मोठी संख्या आहे. एक उदाहरण देतो. परभणी जिल्ह्यातले मोठे राजकीय प्रस्थ म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर. ते ज्यांच्या बाजूने त्यांना निवडणूक मग कोणत्याही असोत, जिंकणे सहज शक्य असते असे हे परभणी जिल्ह्यातले लोकमान्य नेतृत्व. रामप्रसाद जेवढे परभणी जिल्ह्यात लोकप्रिय, त्यांच्या तोडीस तोड त्यांची विवाहित कन्या, मेघना साकोरे. याच मेघनाताईंनी या जिल्ह्यातून आमदारकीची निवडणूक लढविण्याची भाजपातर्फे मोठी तयारी केलेली आहे. आता त्या जेथून निवडणूक लढविणार म्हणतात, ती जागा जर सेनेकडे गेली तर गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघ बांधण्यासाठी कष्ट घेणाऱ्या भाजपाच्या या प्रभावी महिला नेत्याने काय करावे? या राज्यात आघाडीकडे उमेदवार नाहीत आणि युतीमध्ये उमेदवारांची नेत्यांची इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे ज्याचे दुष्परिणाम सेनाभाजपा युतीला भोगावे लागू शकतात असे निदान आज तरी वाटते. त्यावर तोडगा असा, निदान यापुढे तरी युतीबाहेरच्या नेत्यांना थारा न देणे आणि दिलाच तर वाट पाहावी लागेल, असे
त्यांना स्पष्ट शब्दात सांगणे तरच युतीचे काही खरे आहे अन्यथा आज जे आघाडीचे झाले तेथे एक दिवस युती देखील असू शकते. सावध असावे…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी