मराठवाड्यातली राजकीय घाण आणि अशोक चव्हाण :
कुस्तीचा जंगी मुकाबला बघण्यासाठी इकडे तिकडे कुठेही जाण्याची गरज नाही, तिकीट काढा आणि नांदेड जिल्ह्यात जाऊन मुक्काम करा, तेथे अनेक राजकीय कुस्त्या यादिवसात रंगलेल्या असल्या तरी पाहुण्याच्या काठीने साप मारण्यात नांदेड जिल्हावासी यशस्वी ठरले आहेत, लोह कंधार विधानसभा आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशा शिंदे विरुद्ध मेहुणे प्रतापराव चिखलीकर असा रंगलेला जंगी कुस्त्यांचा सामना बघतांना आपोआप टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्यांची बरसात कानावर पडते, ज्या अशोक चव्हाणांचा कायम दुस्वास प्रताप पाटील चिखलीकरांनी केला, तेच अशोकराव जर चिखलीकर आणि भाजपाच्या बाजूने पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला नसते तर 59 हजार मतांनी पराभूत झालेले हेच चिखलीकर दिड ते दोन लाखांच्या फरकाने शंभर टक्के पराभूत झाले असते. यादिवसात चिखलीकर भाजपामध्ये असणे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, तसेही ते एकाच पक्षात फारसे टिकून न राहणारे अत्यंत चंचल वृत्तीचे नेते त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर लवकरच भाजपातून बाहेर पडताहेत, त्यांच्या नावाने नांदेड जिल्ह्यात सततची होणारी अगदी उघड चर्चा प्रत्यक्षात उतरण्यासाठी म्हणे भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच यादिवसात देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, चिखलीकरांनी एकदा का भाजपा सोडली कि भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गुलाल उधळत म्हणतील, सुंठेवाचून खोकला गेला…
प्रशासकीय शासकीय नोकरीत असतांना बक्कळ कमवायचे आणि निवृत्तीनंतर राजकारणात उतरायचे, आमदारकी किंवा खासदारकी लढवायची हि पद्धत अलीकडे चांगलीच फोफावलेली, रूढ झालेली बेशरम माणसाच्या ढुंगणावर जर झाड उगवले तर तो सावली झाली म्हणतो नेमके हे असेच राजकारणात उतरून लगेचच निवडणुका लढविणाऱ्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रात अलीकडे अनेकदा घडणारे त्यात चूक मतदारांची त्यांच्या गांडू वृत्तीची कारण थेट भ्रष्ट अधिकारी तुमच्यासमोर लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहतो आणि आपण त्याला डोक्यावर घेतो, असा आपला मूर्ख स्वभाव, त्यामुळे उद्या रिक्त असलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघसटून याच श्यामसुंदर शिंदे यांचा एकेकाळचा गांड दोस्त आणि अत्यंत वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार याने दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या रिक्त झालेल्या जागेवर लोकसभा तेही महायुतीकडून लढविली तर मला त्यात अजिबात नवल वाटणार नाही किंबहुना भाजपा महायुतीकडून देखील उत्तम संस्कारांची अपेक्षा ठेऊ नये, श्यामसुंदर शिंदे देखील फारसे वेगळे नव्हते, सरकारी नोकरीतले ते देखील असेच मोपलवार पद्धतीचे वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी, नोकरीतून बाहेर पडले आणि आमदारकी तेही थेट अस्तित्व महत्व संपलेल्या शेकापतून लढले आणि निवडून देखील आले कारण मराठी मतदारांची अतिशय वादग्रस्त अशी मानसिकता, त्यांना उमेदवार जेवढा बदनाम किंवा बदमाश, अधिक भावतो, शिंदे झटपट आमदार झाले, येणारी विधानसभा कदाचित यापुढे त्यांची पत्नी आणि प्रताप पाटील चिखलीकरांची बहीण आशा या लढवतील आणि निवडून येतील, उद्या लोकसभेला नांदेड लोकसभेतून मोपलवार निवडून आले तरीही फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका, आपण मराठी हे असेच बावळट, ते दाऊदला देखील निवडून आणतील…
एक फुल दो माली चित्रपटात नायिका साधनाला संजयपासून दिवस जातात आणि लग्नाआधी संजय गायब होतो म्हणून नाईलाजाने दिलदार वृत्तीचा डॉक्टर बलराज सहानी बाळाला जन्म देणार्या साधनाशी लग्न करतो, अशोक चव्हाणांचा देखील हुबेहूब बलराज सहानी झालाय, कारण तेच इतर अनेक नेत्यांसारखे म्हणजे अशोक चव्हाण भाजपामध्ये आले नसते तर 100 टक्के त्यांचाही अनिल देशमुख अगदी सहज झाला असता, ते तुरुंगात खितपत पडले असते, केवळ बदनामी टाळण्यासाठी मिळविलेले अमाप पैसे वाचविण्यासाठी आणि तुरुंगात न जाण्या ते भाजपात आले पण नांदेड जिल्ह्यातली किंवा संपूर्ण मराठवाड्यातली भाजपाची ताकद फारशी वाढली नाही मात्र यापुढे जर अशोक चव्हाण भाजपात कायम टिकले तर नक्की नांदेड आणि मराठवाड्यातली भाजपाची ताकद झपाट्याने बाळसे धरू शकते त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी कि भोकर विधान सभा त्यांची कन्या श्रीजया नक्की लढविणार आहे आणि श्रीजया अगदी सहज आमदार होतील अर्थात हे घडले तर अशोकराव भाजपातून नक्कीच बाहेर पडण्याचा विचार करणार नाहीत. गेली दोन वर्षे स्वतः श्रीजया भोकर विधानसभा बापाच्या संगतीने पिंजून काढताहेत, त्यांच्या सोबतीला माजी आमदार मातोश्री अमिता अशोक चव्हाण सतत असल्याने ऐन तारुण्यातली अतिशय परिपकव महिला नेत्या म्हणून श्रीजयाकडे बघितल्या जाते, कौतुकाने पहिल्या जाते. राजकारण हा पुढल्या कित्येक पिढ्यांची सोय करणारा धंदा झालाय, चव्हाण हे असेच पिढीजात राजकारणी, इतरांनी फक्त सतरंज्या उचलायच्या आणि मिळेल ते हाती घेऊन हळूच पळ काढायचा. आणखी एक नव्याने भर असे म्हणायचे आणि गप बसायचे एवढेच काय ते आपल्या हातात असते…
पत्रकार हेमंत श्रीराम सुशीला जोशी.