आम्ही उघडे कारण ते नागडे : पत्रकार हेमंत जोशी 

आम्ही उघडे कारण ते नागडे : पत्रकार हेमंत जोशी 
काहींना वाईटाची सवय झालेली असते जसे मोठ्या प्रमाणावर मधुमेह असलेला रोगी स्वतःच स्वतःच्या हाताने दररोज सुई टोचून घेतो किंवा निर्ढावलेली अनुभवी वेश्या ग्राहक खोलीत शिरताच एका झटक्यात नागडी होऊन ग्राहक मात्र कपडे काढतांना काहीसा लाजत असतांना तिचे त्याच्याशी अश्लील हावभाव व बोलणे सुरूही होते किंवा नियमित धंदा घेणाऱ्या बायका पोलिसांची धाड पडली कि पुढल्या क्षणी वाट न पाहता तोंड तेवढे ओढणी किंवा रुमालाने झाकून घेऊन आपणहूनच पोलिसांच्या गाडीत जाऊन बसतात तद्वत या राज्यातले सत्तेला लुटून लुबाडून खाणारे मग ते दलाल असतील सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी असतील किंवा विविध नेते मंत्रीगण असतील मीडिया असेल विशेषतः मीडिया मालक असतील सत्तेशी संबंधित जो तो, ते सारे आता असे काही निर्ढावलेले आहेत ज्यांची तुलना केवळ उघड्यावर धंदा घेणाऱ्या रांडांशी व्हावी. जाधव आडनावाचा या राज्याला गेली २५ वर्षे सतत मोठ्या प्रमाणावर पोखरणारा एक दलाल आहे त्याला तर म्हणे आयकर खाते ईडी इत्यादी चौकशा मागे नसतील तर करमत नाही म्हणे, अगदी अलीकडे दादरला त्याच्या घरी आणि त्याच्या विविध कार्यालयात ईडीची फार मोठी धाड पडली होती, या धाडीनंतर त्याच्या घरी या राज्याचे एक अत्यंत जबाबदार आणि फार मोठ्या हुद्द्याचे एक पोलीस अधिकारी अगदी राजरोस ईडी ची धाड पडल्यानंतर केवळ आठ दिवसांनी जवळपास अडीच तास गप्पा मारत बसले होते, जाधव व त्या अधिकाऱ्याच्या हसण्या बोलण्याचे आवाज अगदी खालपर्यंत आल्यानंतर त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या इतरांना आपण या राज्यात राहतो त्यावर त्यांना स्वतःचीच लाज वाटत होती, जाधव आणि तो पोलीस अधिकारी ईडीच्या मोठ्या धाडी नंतर केवळ आठ दिवसात असे गप्पा मारत तेही जाधव याच्या घरी बसून, मला राहवले नाही, मी एका वाहिनीच्या प्रमुखाला जो बऱ्यापैकी प्रामाणिक राहून प्रमुख म्हणून त्याची वाहिनी सांभाळतो त्याला सांगितले कि तुझी टीम लगेच जाधवच्या इमारतीमध्ये पाठव मोठी बातमी मिळेल, त्याने फोन खाली ठेवला मला वाटले तो कामाला लागला पण दिवसभरात त्यावर बातमी नाही बघून मी त्याला त्यावर विचारले असता तो अतिशय प्रामाणिक होऊन म्हणाला कि मला तेथे टीम पाठवणे अजिबात अजिबात शक्य नव्हते कारण माझे मालक आणि जाधव दोघेही एकाच व्यवसायात आहेत, एक चोर दुसरे चोर के घर चोरी नही करता, उक्तीनुसार दोघेही म्हणजे वाहिनी मालक व जाधव शासकीय लुटीच्या एकाच व्यवसायात असल्याने त्याला जाधव प्रकरण त्यादिवशी उघड करणे शक्य झाले नाही. बाहेरच्या राज्यातले मला माहित नाही पण या राज्यातली बहुतांश मीडिया मालक किंवा तेथे काम करणारी मंडळी त्यातल्या बहुतेकांचे हे असे शासनाशी संबंधित काळे धंदे आहेत आणि हे असे काळे धंदे करता यावेत म्हणूनच त्यांनी हाताशी मीडिया नावाचे जहरी वेपन ठेवलेले आहे, बघा थोडेफार पैसे सर्वांना लागतात पण लुटमारीत दलालीत आजकाल फार फार मोठ्या प्रमाणावर आमची मीडिया देखील असल्याने यापुढे या राज्याचे काही खरे नाही एवढेच मी तुम्हा वाचक मंडळींना अगदी ठासून सांगू शकतो आणि विनंती करतो कि येथून एकतर एवढे दूर व चांगल्या ठिकाणी निघून जा जेथे हा असा कुबट वास तुम्हाला अजिबात येणार नाही किंवा येथे राहून स्वतःला एवढे स्वावलंबी आणि स्वाभिमानी घडवा कि त्या त्या वेळेच्या सत्तेतल्या नालायकांचे तोंड देखील बघण्याची तुमच्यावर वेळ येऊ नये…
थोड्याशा वेगळ्या विषयाकडे वळतो. अलिकडल्या दहा वर्षात आपल्या या राज्यात बचत गटांच्या माध्यमातून विशेषतः हलाखीचे जीवन आधी जगणाऱ्या स्त्रिया बऱ्यापैकी पोटापाण्याला लागून स्वावलंबी झाल्या आहेत. या बचत गटांना जर अधिक आधुनिक आणि प्रोफेशनल पद्धतीने हाताळल्या गेले तर मला वाटते गुजराथ नंतर महाराष्ट्रातील स्त्रिया मोठ्या प्रमाणावर स्वावलंबी होऊन त्यांचे आर्थिक राहणीमान खूप खूप उंचावेल. याच पद्धतीची आयडिया काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात आली आणि स्त्रियांविषयी आदर असलेल्या माझ्या काही श्रीमंत मित्रांना मी सहभागी करून याचपद्धतीने स्त्रियांना सहकार्य करणे सुरु केले जसे या राज्यात कितीतरी स्त्रिया आहेत तरुण मुली आहेत कि ज्या त्यांच्या क्षेत्रात अनुभवी व जाणकार आहेत असतात पण आर्थिक क्षमता नसल्याने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करणे जमत नाही. अगदी अलीकडे माझी एक मैत्रीण एका मोठ्या क्लासेस ची व्यवस्थापक म्हणून प्रचंड अनुभवी होती पण तिची आर्थिक क्षमता नसल्याने तिला स्वतःचे कोचिंग क्लासेस काढणे शक्य होत नव्हते, तिने हे माझ्या कानावर घातल्यानंतर उज्जैनकर नावाच्या माझ्या एका मित्राशी त्या दाम्पत्याची भेट घालून दिली, उज्जैनकर याचे भांडवल म्हणजे त्यांची छोटीशी आर्थिक गुंतवणूक आणि तिचा अनुभव, दोघे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यात ते आता स्वतःचे कोचिंग क्लासेस काढून मोकळे झाले आहेत अर्थात यापद्धतीने मी व माझे काही उद्योगपती मित्र या उचापत्या कायम करीत असतो ज्या तुम्हीही करा आणि राज्यातल्या अनुभवी हुशार मेहनती महिलांना स्वावलंबी व श्रीमंत होण्यास मनापासून सहकार्य करा त्यातून तुमच्या व्यवसायात वाढ नक्की होते वरून अगदी छोट्या आर्थिक गुंतवणुकीतून एक किंवा अनेक कुटुंब पोटापाण्याला लावण्याचे तुम्हाला मोठे पुण्य मिळते. पण आम्ही तुम्हाला भांडवल मिळवून देतो असे सांगून गरजूंची फसवणूक करणारे अनेक सहस्त्रबुद्धे नाशिक पुणे ठाणे मुंबईत आहेत असतात या भामट्यांपासून देखील सावधगिरी बाळगून गरजूंनी पुढे जायचे असते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *