अभिमन्यू उद्धव कोंडीत शिवसेना अडचणीत : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 

त्या दोघांनाही राजकारणातली सायकल चालवता येते पण शरद पवार नावाचा सायकलपटू तेही पुण्यातल्या रस्त्यांवरून थेट दोन हात सोडून सायकल चालवू शकतो पण उद्धव ठाकरेंना मात्र गर्दी नसलेल्या रस्त्यावरून सायकलला दोन्ही हात घट्ट पकडून देखील धड सायकल चालविणे अशक्य झाले आहे त्यामुळे शरद पवारांनी राज्यातल्या राजकारणात सध्या सर्वाधिक बाजी मारली आहेच पण त्याचवेळी त्यांनी त्यांचे एकेकाळचे तगडे स्पर्धक भाजपा व देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना व उद्धव ठाकरे या दोघांनाही एकाचवेळी एकाच खिंडीत गाठून मोठ्या खुबीने निदान सध्या तरी चारी मुंड्या चित करून ठेवलेले आहे त्यातल्या त्यात अगदी नाका तोंडात पाणी गेल्यानंतरही फडणवीस पट्टीचे स्विमर असल्याने चिखलातल्या पाण्यात कसेबसे पोहोताहेत पण उद्धव यांच्या पार नाकातोंडात पाणी गेलेले असल्याने उद्धव यांची आजची अवस्था फक्त आणि फक्त महाभारतातल्या अभिमन्यू सारखी झालेली आहे नव्हे ती तशी पवारांनी त्यांची हि अभिमन्यूवस्था करून ठेवलेली आहे, शिवसेना आणि भाजपा दोन्हीं पक्ष आणि पक्षी या बिलंदर कलंदर नेत्याने एकाच दगडात ठेचून त्या दोघांनाही जखमी करून पवार आरामात आरामखुर्चीवर रेलून गालातल्या गालात हसताहेत आणि उद्धव यांच्या हातून वेळ निघून गेलेली असल्याने त्या अभिमन्यूसारखे मोठ्या चक्रव्यूहात अडकलेल्या आणि चारी बाजूंनी बदमाश हितशत्रूंपासून पूर्णतः कोंडीत पकडल्या गेलेल्या एकेकाळच्या या एकेकाळच्या धूर्त व यशस्वी नेत्याची म्हणजे उद्धव ठाकरे यांची मोठी गोची झालेली आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे हे या राज्यातले पुढले शंभर टक्के लालूप्रसाद यादव असतील हे जे राष्ट्रवादीच्या प्रभावी नेत्यांकडून इतरांना अनेकदा विश्वासात घेऊन किंवा शपथा देऊन सांगितले जाते, उद्धवजी हे असेच निर्णय घेत राहिले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सांगण्याला अर्थ आहे असाच अर्थ त्यातून निघेल किंवा काढावा लागेल. फक्त उद्धव ठाकरे हे एकाचवेळी राजकारणातून संपले आणि तुरुंगात जाऊन बसले हे भलेही लालूंच्या राज्यात सहन केले गेले असेल पण येथे उद्धव आजही बऱ्यापैकी मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत असल्याने त्यांच्यावर इतकी मोठी नामुष्की ओढवेल वाटत नाही पण काही सांगताही येत नाही. शरद पवार नेमके कसे व कोणाचे हे उद्धव यांना अजिबात न कळल्याने त्यांनी स्वतःहून स्वतःचा अभिमन्यू करून घेतला असे माझे ठाम मत आहे. ज्या उद्धव सेनेची या महाराष्ट्राला बहुसंख्य जात्यंध मुसलमानांपासून वाचविण्या जी राज्याची गरज होती विशेष म्हणजे मुसलमान नेत्यांनी आणि शरद पवारांनी या नेत्याच्या नेतृत्वातली आधी हवा काढून घेतली आणि मुंबई पूर्णतः बाटविण्याच्या असंख्य जात्यंध मुसलमानांच्या हालचालींना आपोआप जोर आला…
भाजपातलेच बहुसंख्य असंख्य अनेक म्हणतात अनेक सांगतात कि भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक आमदार मंगलप्रभात लोढा हे आजतागायत कायम आपल्या नेतृत्वाचा मोठ्या खुबीने फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यवसायासाठी वापर करीत आले आहेत थोडक्यात त्यांनी बलाढ्य भाजपा केवळ स्वतःच्या धंद्यासाठी वापरून घेतलेली आहे ते आजही तिला वापरून घेताहेत. भाजपाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बांधकामाच्या धंद्यात भला मोठा तुकडा कमवायचा आणि त्यातला अगदीच छोटासा तुकडा भाजपावर फेकून आपला व्यावसायिक कार्यभाग मोठ्या युक्तीने आणि खुबीने उरकून घ्यायचा असेही जे मंगलप्रभात लोढा यांच्याविषयी वारंवार सांगितले बोलले जाते त्यात कितपत सत्य आहे हा तसा एखाद्याचा मोठा अभ्यासाचा विषय आहे पण ज्यांनी कोणी लोढा यांना बघितलेले असेल त्यांचे व माझे त्यांच्याविषयी बनलेले मत नक्की सारखे असेल म्हणजे मंगलप्रभात हे या राज्यातले सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतले एक हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणताही नवखा असे सांगू शकणार नाही एवढे त्यांचे राहणीमान साधे व शांत आहे. असे वाटते जर या महिन्यात त्यांच्या बायकोने साडी घेतली तर पुढल्या वर्षी याच महिन्यात लोढा स्वतःसाठी नवा शर्ट विकत घेत असतील एवढे त्यांचे राहणीमान साधे आहे म्हणजे सकाळी खिचडीवर फोडणी आणि संध्याकाळी त्याच खिचडीला फोडणी देऊन लोढा कुटुंबीय कसेबसे दिवस काढत असतील, आला दिवस पुढे ढकलत असतील असे नक्की त्यांच्याकडे बघणार्याला वाटत असावे पण हेच लोढा त्यांच्या धंद्यातले बाप माणूस म्हणूनच ओळखले जातात नव्हे ते या धंद्यात साऱ्यांना तेही जगभर पुरून उरतात एवढे मोठे ते बांधकाम व्यावसायिक आहे त्यामुळे त्यांच्याकडे या राज्याने कधीही सामान्यांचे नेते म्हणून कधी फारसे सिरियसली बघितलेच नाही, पक्का धंदेवाला म्हणूनच भाजपा सहित साऱ्यांनी त्यांच्याकडे याच पद्धतीने बघितले आहे आणि लोढा यांनीही आपला स्वतःचा विधान सभा मतदार संघ वगळता इतरत्र फडणवीस किंवा शेलार यांच्यासारखी सामान्यांचे नेते अशी आपली इमेज जोपासली किंवा वाढवली नाही पण याच मंगलप्रभात लोढा यांनी अलीकडे पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवशेषणात मुंबईतल्या बहुसंख्य जात्यंध मुसलमानांची जी आई बहीण घेतली त्यांच्या त्या भाषणावर मी सर्वांदेखत शंभर वेळा किमान त्यांच्या पाया पडायला तयार आहे, लोढा तुस्सी ग्रेट हो, ज्यांनी म्हणून त्यांचे ते त्या दिवशीचे सभागृहातले आवेशपूर्ण जोशपूर्ण भाषण ऐकले असेल तेव्हा हेच म्हटले असेल एवढे ते भाषण विखारी प्रभावी ठरले आहे कारण लोढा यांनी तसे मुद्दे त्याठिकाणी त्यादिवशी पुराव्यांसहित मांडलेले आहेत…
अपूर्ण : हेमंत जोशी

Comments 1

  1. Avatar अनिकेत अनिल मांद्रेकर says:

    आपण जे शरद पवारांच गुणगान गात आहात, की शरद पवारांनी फडणवीस आणि ठाकरे यांच्या नाकातोंडात पाणी आणल, यापैकी उद्धव ठाकरेंच्या नाका तोंडात पाणी गेल असेल, पण फडणविसांच्या गेल आणि ते चांगले स्वीमार असल्याने टिकले म्हणणं चुकीच वाटते. फडणवीस हे पहिल्यापासूनच चांगले स्वीमार होते आणि आहेत, त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर शरद पवारांच राजकारण जवळपास संपवल. 2019 ला फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून शरद पवार वर आले. माझ तर उलट म्हणणं आहे की फडणवीसानी शरद पवारांच्या नाका तोंडात पाणी घातल, किंवा त्यांच्या गेल. कारण 2019 पर्यन्त जे शरद पवार दिल्लीत जास्त आणि महाराष्ट्रात कमी असत तेच आज महाराष्ट्र सोडून एक किंवा दोन दिवसाच्या वर दिल्लीत जात नाहीत. संसदेच्या अधिवेशांनालाही दांडी मारतात. ते फक्त फडणविसांच्या दहशती मुले. कारण पवार कितीही मुरब्बी राजकरणी असले तरी आजच्या घडीला फडांविसनी शरद पवारांना महाराष्ट्रात जखडून ठेवले आहे. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल.
    उलट विरोधी पक्षनेते असून फडणवीस निवांत फिरत आहेत. राहील उद्धव ठाकरेंच, त्यांची 2014 ची राजकीय प्रगल्भता त्यांनी 2019 ला धुळीला मिळवली. आणि स्वता च्या पायावर धोंडा मारून घेतला. दुसर 2014 पासूनच पवार शिवसेना आणि भाजपा युती तोडण्याचा प्रयत्न करत होते. 2014 साली शिवसेनेला खर वाचवल असेल टीआर फडांवीसनी. त्यांनी शिवसेनेला सत्तेत घेतलं नसत तर शिवसेना तेव्हाच फुटली असती आणि संपली असती. हे स्वता पवारांनी वेगळ्या शब्दात संगितले आहे. फक्त पवारांचा तो डाव 2019 साली शिवसेनेच्या मूर्खपणामुळे यशस्वी झाला. जर शिवसेना युतीत राहिली असती तर कदाचित मान राहिला असतं. आज सुद्धा सचिन वाजे प्रकरणात फडांविसामुळे शिवसेनेच्या नाकातोंडात पाणी गेल आहे, आणि त्याचे एकत्रित सरकार असल्याने राष्ट्रवादीला पण थोड्या फार प्रमाणात फटके बसत आहेत. म्हणूनच शरद पवारांना लोकल प्रश्न अस म्हणत दोन ते तीन दिवस मॅरथॉन मीटिंग घ्याव्या लागल्या. म्हणजेच चांगले पट्टीचे स्वीमर असलेले शरद पवार सध्या गटांगळ्या खात आहेत. आणि शिवसेनेच तर काय विचारायलाच नको. कारण सचिन वाजे प्रकरण जेवढे जास्त ताणले जाईल तेवढे शिवसेनेला जास्त त्रासाच होणार आहे. त्यातून शिवसेना स्वत:च सरकारमधून बाहेर पडेल का? त्यावेळी तुम्ही जे म्हणताय की राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र सरकार बनवतील, तर माझ म्हणणं आहे, शिवसेना फुटेल, 38-40 आमदार एकत्र फोडले जटिल, त्यासाठी नारायण राणे आणि चमुला कदाचित कामाला लावलेही असेल. आणि राष्ट्रवादीचे महत्व महाराष्ट्राच्या राजकरणात वाढलेले असले तरी राष्ट्रवादी भविष्यात विरोधी पक्षात असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *